वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 १/१ पृ. ८-९
  • येशू, “स्वर्गातून येणारी खरी भाकर”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशू, “स्वर्गातून येणारी खरी भाकर”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • “स्वर्गातून येणारी खरी भाकर”
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • सर्वांसाठी उपलब्ध असणारी “जीवनाची भाकर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • येशूने केलेला भाकरींचा चमत्कार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • तुम्ही सर्वकाळ जगू शकता—ते कसं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 १/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

येशू, “स्वर्गातून येणारी खरी भाकर”

सबंध दिवसभर बरीच कामे घडली. येशूने अद्‌भुत चमत्काराने हजारोंना जेवू घातले होते. लोकांनी त्याला राजा बनवावे यासाठी धरू पाहिले पण तो त्यांच्यामधून निसटला. त्याच रात्री तो गालील समुद्रात मोठे वादळ उसळले असता पाण्यावरुन चालत गेला; पेत्र मोठमोठ्या उसळलेल्या लाटातून त्याच्याकडे येत असता बुडू लागला तेव्हा येशूने त्याला वाचविले; त्याने वादळ शांत केले आणि शिष्यांना तारु फुटण्यापासून वाचविले.

दुसऱ्‍या दिवशी, गालील समुद्राच्या ईशान्येकडे येशूने ज्यांना अद्‌भुत चमत्काराने जेवू घातले होते तो लोकसमुदाय कर्फणहूमाजवळ आलेला आहे असे त्याला दिसले. येशूने त्यांना दटाविले व म्हटले की, आणखी मोफत जेवावयास मिळावे यासाठी ते त्याच्याकडे आले आहेत. तो त्यांना म्हणतो की, नाशवंत अन्‍नासाठी नव्हे तर सार्वकालिक जीवनासाठी राहणाऱ्‍या अन्‍नाच्या प्राप्तीस्तव काम करावे. यासाठी लोक त्याला विचारतातः “देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे?”

येशू सर्वात महत्त्वपूर्ण कामाचा उल्लेख करतो. “देवाचे काम हेच आहे की,” येशू म्हणतो, “ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्‍वास ठेवावा.”

परंतु, लोक, येशूने कितीही अद्‌भुत कृत्ये करून दाखविली तरी त्याच्यावर विश्‍वास ठेवत नाही. कालच त्याने ५,००० पुरुषांना व शिवाय स्त्रिया, मुले यांना अद्‌भुतरित्या भरवले होते, पण हे सगळे न मानता लोक त्याला विचारतातः “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की, जे पाहून आम्ही आपणावर विश्‍वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करिता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्‍ना खाल्ला. असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यांस स्वर्गातून भाकर खावयाला दिली.’”

चिन्हाखातर त्यांनी केलेल्या विनंतीला उत्तर देताना येशू त्या अद्‌भुत तरतूदी उगम कोण होता ते सांगतो. तो म्हणतोः “मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही; तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हला देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.”

आता मात्र लोक म्हणतातः “प्रभुजी, ही भाकर आम्हाला नित्य द्या.”

“मीच जीवनाची भाकर आहे,” असे येशू स्पष्टीकरण देतो. “जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्‍वास ठेवीत नाही असे मी तुम्हाला सांगितले आहे. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”

यावेळी यहुदी येशूविषयी कुरकुर करू लागतात; कारण “मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,” असे त्याने म्हटले होते. ते त्याच्या बाबतीत मानवी मातापित्यापासून झालेला एक पुत्र याखेरीज काहीही बघत नाही व यामुळेच नासारेथच्या लोकांप्रमाणेच हेही आक्षेप घेऊन म्हणतातः “ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना? तर मग, ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’ असे आता तो कसे म्हणतो?”

“तुम्ही आपसात कुरकुर करू नका,” येशू त्यांना सांगतो. “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहिले आहे की, ‘ते सर्व यहोवाने शिकविलेले असे होतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही; जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.”

आपले भाषण पुढे चालवून येशू पुन्हा म्हणतोः “मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्‍ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्‍या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.” होय, देवाने पाठविलेल्या येशूवर विश्‍वास ठेवण्याने लोकांना सार्वकालिक जीवन मिळू शकते. मान्‍ना किंवा इतर कोणतीही भाकर हे साध्य करू शकत नाही!

स्वर्गातून उतरलेल्या भाकरीविषयीचे हे संभाषण, लोक येशूला कफर्णहूमाजवळ भेटले तेव्हा सुरु झाले; पण ते येशू कफर्णहूमातील सभास्थानात शिक्षण देऊन संपेपर्यंत पुढे चालूच राहिले. योहान ६:२६-५१, ५९; स्तोत्रसंहिता ७८:२४; यशया ५४:१३; मत्तय १३:५५-५७.

◆ येशूने स्वर्गातून उतरणाऱ्‍या भाकरीविषयीचे बोलणे करण्याआधी कोणकोणत्या गोष्टी घडल्या होत्या?

◆ येशूने जे नुकतेच करून दाखविले होते ते लक्षात घेता चिन्ह दाखविण्याची केलेली विनंती का अयोग्य होती?

◆ येशूने, तो स्वर्गातून उतरलेली खरी भाकर आहे असा दावा केला तेव्हा यहुदी का कुरकुरु लागले?

◆ स्वर्गातून आलेल्या भाकरीविषयीची चर्चा कोठे झाली असावी?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा