आधुनिक वैवाहिक जीवनासाठी सर्वोत्तम सल्ला
“होय, तुम्ही ही मासिके घेऊन वाचलीच पाहिजेत,” शेजारच्या स्त्री ने मध्येच म्हटले. “यांनी ही मासिक वाचावीत अशी माझी का इच्छा आहे ते तुम्हाला ठाऊक आहे का?” अशी विचारणा त्या स्त्रीने मासिके सादर करणाऱ्या व्यक्तिला केली. “तुमच्या या प्रकाशनांबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. यांच्यामुळेच मला माझ्या पतींसोबत समेट करता आला. मी त्यांना सोडून देऊन सुमारे दीडवर्षभर माझ्या आईकडे राहिले होते. तुमच्या काही लोकांनी मजकडे भेट दिली व हे प्रकाशन देऊन गेले. ते मी नंतर वाचले. याच्यामुळेच मला पतीकडे परत जावे हे ठरविता आले. मी तुमच्या प्रकाशनांचे वाचन करीत असते आणि आता आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे.” या शिफारसीमुळेच घरमालकाने त्वरेने मासिके स्विकारली.
दी वॉचटॉवर आणि अवेक! या मासिकात कौटुंबिक समस्यांना अनुलक्षून पवित्र शास्त्र आधारित सल्ला नियमिरित्या दिला जातो. केवळ ७० रूपये पाठवा व तुम्हाला ही दोन्ही मासिके (महिन्याला चार अंक या प्रमाणे) एक वर्षभर येत राहतील.