वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ६/१ पृ. १५-२०
  • “नोहाच्या दिवसात होते” त्या सारखे दिवस

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “नोहाच्या दिवसात होते” त्या सारखे दिवस
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नीतीभ्रष्ट वातावरणात नोहाचा विश्‍वास
  • आधुनिकतावाद्यांनो, संभाळा!
  • “वाईटाचा द्वेष करा”
  • आणखी “इशारात्मक उदाहरणाकडे” लक्ष द्या
  • टिकविण्यासाठी बांधणी करा
  • जागृत राहण्याची निकड अधिकच वाढली आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तुम्ही आपल्या विश्‍वासाच्या द्वारे जगाचा धिक्कार करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • ईश्‍वरी भक्‍तीच्या लोकांसाठी मुक्‍तता समीप आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • तो “देवाबरोबर चालला”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ६/१ पृ. १५-२०

“नोहाच्या दिवसात होते” त्या सारखे दिवस

“पृथ्वी . . . जाचजुलमांनी भरली होती. . . . ती भ्रष्ट होती कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडविली होती.”—उत्पत्ती ६:११, १२.

१, २. (अ) कोणत्या प्रकारच्या हिंसाचाराचा आज यहोवाच्या साक्षीदारांना सामना करावा लागतो? (ब) कोणत्या परिस्थितीत देवाच्या लोकांना पुनरुत्थानाच्या आशेकरवी सांत्वन मिळाले?

जाचजुलूम! हिंसाचार! नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे आजही हिंसाचार नित्याचा दैनंदिन सराव बनला आहे. नोहाप्रमाणे खऱ्‍या देवाच्या समागमे चालणाऱ्‍यांनाही यापासून सुटका नाही. हे जगाच्या लक्षात अगदी प्रकर्षाने अलिकडेच आणून देण्यात आले. जुलै २१, १९८५ या दिवशी ऑस्ट्रेलियात सिडने येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात, देव व कुटुंब यांना दाखविलेली निष्ठा या विषयावरील पवित्र शास्त्रीय जाहीर व्याख्यान चालू असताना बॉम्बचा स्फोट होऊन ते उद्‌ध्वस्त झाले. यात एक साक्षीदार ठार झाला. ४० पेक्षा अधिक जणांना इस्पितळात दाखल केले गेले. हे सर्व त्यातून बरे झाले पण त्यांच्या शरीरावर अद्याप त्या हिंसाचारी कृत्याच्या खूणा आहेत. एका गुप्त पोलिसाने म्हटले: “सभागृहात ११० लोक होते आणि ही खरीच आश्‍चर्याची गोष्ट म्हणावी लागेल की सर्वच्या सर्व ११० जणांचा मृत्यु घडला नाही.”

२ पृथ्वीमध्ये इतरत्र, उत्तर आयर्लंड, लेबनन आणि एल साल्वेडोर या देशातही हिंसाचाराचे वारे नित्य वाहत असले तरी तेथेही यहोवाचे साक्षीदार “सुवार्ते”ची घोषणा करून आहेत, क्षेत्रकार्यात सहभागी असताना काहींना ठार व्हावे लागले. कित्येक देशात अपघात, भूकंप यासारख्या “अनपेक्षित घटना” घडून कित्येक मोलवान जीव हरपले गेले. अशावेळी यहोवाच्या लोकांना पुनरुत्थानाच्या आशेकरवी सांत्वन लाभले.—उपदेशक ९:११; १ थेस्सलनीकाकर ४:१३, १४.

३. (अ) अलिकडील घटना व लूक २१:१६ नुसार यहोवाच्या काही लोकांना काय घडू शकते? (ब) ‘मोठ्या संकट’ प्रसंगी देवाकडिल संरक्षणाचे कोणते अभिवचन आम्हाला आहे?

३ मेक्सिको येथे अलिकडेच घडलेल्या भूकंपात ठार झालेल्या ५,००० लोकात २३ साक्षीदार व त्यांच्या सोबत्यांना आपले प्राण गमवावे लागले. प्युरोटो रिको येथे पूर व डोंगराचा कडा कोसळून झालेल्या अपघातात ३०० गतप्राण झाले त्यात ७ साक्षीदार होते. याचा अर्थ हा आहे का की यहोवा आपल्या काही सेवकांना संरक्षण पुरविण्यात अपयशी ठरला? कदापि नाही! अपघात व विनाश यापासून आम्ही काही वेगळे नाही. छळाच्या बाबतीत येशूने आपल्या शिष्यांना आधीच सूचना देऊन ठेवली होती की “तुमच्यातील कित्येकांना (ते) जिवे मारतील.” नाझी हिटलरच्या हिंसाचारी हाती आमच्या शेकडों बांधवांना मरावे लागले. यहोवा या सर्वांची आठवण पुनरुत्थानसमयी करील. तरीपण भाकित असणारे “मोठे संकट” पृथ्वीला ग्रासेल त्यावेळी यहोवाच्या नावाचा धावा करणाऱ्‍यांना तो नक्कीच वाचवील. हे त्याने नोहाच्या काळी केले.—लूक २१:१६–१९; मत्तय २४:१४, २१, २२, ३७–३९; यशया २६:२०, २१; योएल २:३२; रोमकर १०:१३.

४. आजच्या काळाची स्थिती उत्पत्ती ६:११, १२ मध्ये वर्णिलेल्या परिस्थिती सोबत कशी जुळते?

४ १९१४ या वर्षापासून हिंसाचार सबंध गोलार्धभर पसरलेला आहे. या शतकाच्या युद्ध व संहार यामुळे लाखो लोकांना ठार व्हावे लागले. मानवजातीला वायु व समुद्रातील चाचेगिरी, दहशतवाद्यांनी केलेल्या दारूगोळा फेकीत, प्रचंड हत्त्या आणि आतरवंशीय द्वेष यांनी पिळून सोडले आहे. शिवाय अण्वस्त्र हत्यारामुळे तिला भेडसावून सोडले आहे. खरोखरी हे “कठीण दिवस” आहेत, यात “राष्ट्रे घाबरी होऊन पेचात” पडली आहेत. (२ तिमथ्यी ३:१–५, १३; लूक २१:२५) तरीपण यहोवाचे लोक आज अशा पीडेत राहात आहेत जिचा संबंध हिंसाचाराशी असला तरी त्यापेक्षा ती घातक आहे. ही पीडा मागे नोहाच्या काळी ४,३०० वर्षे जाते. ती काय आहे?

नीतीभ्रष्ट वातावरणात नोहाचा विश्‍वास

५, ६. (अ) सैतानाने मानव जातीस भ्रष्ट करण्याचे कसे आरंभिले? (ब) पण नोहा व त्याचे कुटुंब कोणकोणत्या बाबतीत जगापासून भिन्‍न ठरले?

५ एदेनातील बंडखोरी नंतर दियाबल सैतानाने “सबंध जगाला ठकविण्याचा” निश्‍चय केला आहे. (प्रकटीकरण १२:९) यहोवा देवाने पुरुषाला व स्त्रीला दिलेले लैंगिक सामर्थ्य वैवाहिक व्यवस्थेमध्ये सन्मान्यरितीने वापरून आपल्या जातीने “पृथ्वी भरून टाका”वी अशी आज्ञा केली होती. (उत्पत्ती १:२८; इब्रीयांस १३:४) पण दियाबलाने अस्वाभाविक लिंगाचाराद्वारे मानवजातीला दूषित केले. ते कसे काय? याकरता देवाच्या आत्मिक पुत्रांनी सैतानाला या बंडखोरीत साथ दिली. हे “दुरात्मे” झाले व सैतान त्यांचा “अधिपती” झाला. (लूक ११:१५) पण त्या दुरात्म्यांच्या कार्यहालचालीत कशाचा समावेश होता? ते पृथ्वीवर खाली आले, त्यांनी मानवी देहात स्वतःला रूपांतरित केले आणि सुंदर अशा मानवकन्यांशी विवाहबद्ध झाले. पण यापासून निष्पण्ण झालेला परिणाम मोठा भयप्रद होता!

६ त्या संयोगामुळे संकरीत संतति, धिप्पाड राक्षस जन्मले, जे अर्ध मानव व अर्ध दुरात्मे होते. हे नेफिलिम, मानवजातीचा घात करणारे “अधःपतित” होते. याबद्दल अहवाल सांगतो: “त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पाहा, ती भ्रष्ट होती कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडविली होती.” हिंसाचार व लैंगिक नीतीभ्रष्टता एवढी व्याप्त बनली होती की केवळ नोहाविषयीच असे म्हटले जाऊ शकते होते: “नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतीमान व सात्विक मनुष्य होता. नोहा खऱ्‍या देवाच्या समागमे चालला.” सबंध मानवजातीतून केवळ त्याने, त्याची बायको, त्याचे पुत्र व त्यांच्या बायका यांनीच विश्‍वास व ईश्‍वरी भय दाखविले. तद्वत हे उघड होते की नोहाच्या कौटुंबिक मालिकेने त्या काळच्या लैंगिक नीतीभ्रष्टतेने स्वतःला भ्रष्ट केले नव्हते.—उत्पत्ती ६:४, ९–१२, रेफरन्स बायबल, फुटनोट.

७. नोहाच्या काळी प्रदर्शित झाले त्याप्रमाणे यहोवा वाईटांचा व धार्मिकांचा कसा न्याय करतो? (पडताळा मत्तय २५:४०, ४५, ४६)

७ यहोवाने त्या हिंसाचारी, लैंगिक वेडापिसा झालेल्या व दुरात्मिक जगताचा नाश केला. महाजलप्रलय आणून त्याने वाईट होते ते सर्व काही झाडून टाकले. संकरित नेफिलिम आणि भ्रष्ट मानव विस्मृतीत गडप झाले पण माजी देवपुत्रांनी आत्मिक क्षेत्राकडे धूम ठोकली–देवाकडील न्यायदंडाची त्यांच्यावर होणारी अंमलबजावणीची वाट पाहणे हेच त्यांना मिळाले. तरीपण त्या जलप्रलयातून वाचलेले लोक होते! नोहा व त्याच्या कौटुंबिक सदस्यांचा बचाव झाला. तो का बरे? आपल्या विश्‍वासामुळे. तसेच तो, त्यांनी तारू उभारण्याची आणि त्या धिक्कारित जगास धार्मिकतेचा प्रचार करण्याची कृति करून व्यक्‍त केल्यामुळे.—२ पेत्र २:४, ५.

आधुनिकतावाद्यांनो, संभाळा!

८. नोहाचे दिवस आमच्या दिवसाशी कोणत्या अर्थी प्रतिछायित आहेत?

८ नोहाचा काळ आमच्या काळाची पडछाया होता. हे आम्ही कसे जाणतो? बरे, येशूने तसाच हिंसाचार, अधर्म व प्रीतीहीनता यांच्या वेळेबद्दल भाकीत केले होते जो “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही” असे “मोठे संकट”, ज्याच्या आम्ही उंबरठ्यावर उभे आहोत त्याच्या “चिन्हा”चा एक भाग असेल. त्याने असेही म्हटले: “त्या दिवसाविषयी व त्या घटके विषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही.” यानंतर तो म्हणाला: “नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांनी लक्षच दिले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.”—मत्तय २४:३–२१, ३६–३९.

९. जे “लक्ष देत नाहीत” त्यांना मिळणारा परिणाम आपण कसा चुकवू शकतो?

९ होय, “त्यांनी लक्षच दिले नाही.” पण तुम्हाला त्यांच्यासारखे होण्याची गरज नाही. प्रभू येशू स्वर्गातून प्रगट होईल व तो “जे देवाला ओळखीत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत” त्यांच्यावर सार्वकालिक नाश आणून देवाची दंडाज्ञा बजावील त्यावेळी तुम्हाला बचाव प्राप्त करून घेता येईल. (२ थेस्सलनीकाकर १:७, ८) ज्यांचे मुख्य लक्ष्य जीवनात स्वतःला संतुष्ट करीत राहणे आहे, एखादा प्रतिष्ठित व्यवसाय करणे व भौतिक संपदा मिळविणे आहे, पण देवाबद्दल मात्र कसलाच विचार राखणे नाही त्यांच्यासारखे तुम्ही होण्याची गरज नाही. “पोट हे त्यांचे दैवत” हे खरेपणाने म्हणता येईल.—फिलिप्पैकर ३:१९.

“वाईटाचा द्वेष करा”

१०, ११. (अ) देवाची मर्जी संपादण्यासाठी कोणते दुराचरण टाळले पाहिजे? (ब) कोणते चिलखत आम्ही परिधान करावे व का?

१० या अंतिम दिवसात, पुष्कळ लोकांचे जीवन लैंगिक विषय, या भोवती गुंफलेले असून ते लग्नाच्या फायद्यासह वा त्याविनाही राहतात. शिवाय पुष्कळ विवाहितांसाठी घटस्फोट किंवा फारकत हा विषय तर साधारण बनला आहे. येशूच्या शिष्यांच्या सरळ इशाऱ्‍यांचा अवमान करून बहुतेकांनी स्वतःला पुरूषगामीपणात बद्ध केले आहे. यांच्यापैकी काहींना “आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ” एड्‌स्‌ व इतर लैंगिक आजाराद्वारे प्राप्त होत आहेत. तरीपण अशा लोकांसाठी तारणाची आशा आहे. ज्या वेश्‍यांनी आपले कुकर्म करणे सोडले व ज्यांनी येशूवर विश्‍वास व्यक्‍त केला होता त्या स्त्रियांच्या बाबतीत येशू, त्याच्या काळातील गर्विष्ठ व पश्‍चातापहीन धर्मपुढाऱ्‍यांच्या विरुद्ध कसा संमतिकारक बोलला होता ते आठवा.—रोमकर १:२६, २७; २ पेत्र २:९, १०; यहुदा ६, ७; मत्तय २१:३१, ३२.

११ जे यहोवाचे लोक अनैतिक प्रथांनी डागलेले असतील वा त्यात पडण्याचा मोह होत असेल अशांनी आता जागे राहून देव पुरवीत असलेल्या पूर्ण चिलखतास धारण केले पाहिजे. (इफिसकर ६:११–१८) “नोहाच्या दिवसात होते” तसेच आजचे दिवस आहेत. दियाबल हा “गर्जणारा सिंह” आणि त्याचे नीतीभ्रष्ट दुरात्मे आता चोवीस तास अविरतपणे देवाच्या लोकांच्या मागे राहून, त्याना वेगळे करून पाशात धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही विश्‍वासात दृढ राहून या शत्रूंविरूद्ध खंबीर उभे राहिले पाहिजे.—१ पेत्र ५:८, ९.

१२. स्तोत्रसंहिता ९७:१०ची सूचना अनुसरणे का महत्वाचे आहे?

१२ तरीपण ही धक्कादायक गोष्ट आहे की यहोवाच्या संस्थेत जबाबदारपदी असणारे काहीजण अनैतिक प्रथा, पुरूषगमन, बायकांची अदलाबदल आणि मुलांचा छळ या गोष्टींना बळी पडले. शिवाय हेसुद्धा लक्षात घेण्याजोगे आहे की गतवर्षी ख्रिस्ती मंडळीतून ३६,६३८ व्यर्क्‍तिना बहिष्कृत करण्यात आले. यांच्यापैकी बहुतेकांनी अनैतिकता आचरली होती. यहोवाच्या संस्थेला शुद्ध ठेवलेच पाहिजे! (१ करिंथकर ५:९–१३) ही वेळ अशी आहे की मंडळीचे वडील, उपाध्यसेवक आणि खरे म्हणजे आमच्या सर्वच बंधुभगिनींनी अनैतिकतेप्रत नेणाऱ्‍या सर्व वाटा कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. यहोवाच्या दर्जाना दाखविलेली निष्ठा प्रतिफळ देते, जसे स्तोत्रसंहिता ९७:१० म्हणते: “अहो यहोवावर प्रीती करणाऱ्‍यांनो, वाईटाचा द्वेष करा. तो आपल्या निष्ठावंत भक्‍तांच्या जीवांचे रक्षण करतो. तो त्यांस दुर्जनांच्या हातून सोडवितो.”

१३. प्रेषित पौल व पेत्राकरवी कोणता गंभीर सल्ला दिला गेला?

१३ लवकरच “मोठे संकट” “आपल्या घाणेरड्या कर्मांना किळसवाण्या पद्धतीने आचरणाऱ्‍या” सर्वांना काढून टाकील. तर मग, आम्ही जागतिक नीतीभ्रष्टता टाळण्याची, तिचा द्वेष, होय, तिचा वीट मानण्याची केवढी काळजी बाळगली पाहिजे. आम्ही “जारकर्मापासून पळ” काढला पाहिजे! (प्रकटीकरण २१:८; १ करिंथकर ६:९, १०, १८) शंका पेरणाऱ्‍या धर्मत्याग्यांविरूद्ध इशारा दिल्यानंतर व “यहोवाच्या दिवसाची” खरी वास्तवता वदविल्यानंतर प्रेषित पेत्र आम्हाला “पवित्र वर्तणूक आणि इश्‍वरी भक्‍ती” करण्याचे आर्जवितो. तो पुढे म्हणतो: “तरी ज्यामध्ये नीतीमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत, म्हणून प्रियजनहो, हया गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा.” जसे देव “सर्व नवे” व शुद्ध करील त्या “नव्या पृथ्वी”स प्राप्त करण्याचा आनंद केवढा मोठा आहे!—२ पेत्र ३:३–७, १०–१४; प्रकटीकरण २१:१, ४, ५.

आणखी “इशारात्मक उदाहरणाकडे” लक्ष द्या

१४. जलप्रलयाकरवी झालेली शुद्धता तात्कालिक का होती?

१४ महाजलप्रलयाने पृथ्वीवरील सर्व दुरात्मिक व मानवी घाण दूर झाडून टाकल्या नंतर यहोवा देवाने नोहा व त्याच्या पुत्रांसोबत बोलणी करून आदामाला दिलेला मूळ आदेश पुनः सांगितला. त्याने म्हटले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.” (उत्पत्ती ९:१) त्यांनी काही अंशी हे साध्य केले त्यामुळे ७० “कुटुंबे”—लाक्षणिक अर्थी परिपूर्ण संख्या—उद्‌भवली ज्याची माहिती उत्पत्तीच्या १०व्या अध्यायात आहे. तरीपण मानवजातीला अद्याप आदामाकडिल अनुवंशिक पापाच्या परिणामांचा त्रास होत होता. शिवाय दुरात्मिक वर्चस्वाने मानवांना पुनः लैंगिक नीतीभ्रष्टतेत डुबविले.

१५. सदोमावरील देवाच्या न्यायदंडाकरवी आम्ही काय शिकू शकतो?

१५ काही काळातच यहोवाचा “मित्र” अब्राहाम व त्याचा पुतण्या लोट कनान प्रदेशी स्थलांतरित झाले. लोटाने यार्देनेकडील प्रदेश पसंत केला कारण तो “यहोवाचा बाग एदेन” यासारखा होता. पण तो नैतिकदृष्टया तसा होता का? नाही, त्यापासून खूपच वेगळा होता! लोटाचा निवास असणारे सदोम शहर व त्यालगतचे गमोरा पुरुषगमन करण्यात खूप गढले होते. तेथे दहा धार्मिकसुद्धा आढळणार नव्हते. या कारणास्तव यहोवाने त्या शहरांवर “सार्वकालिक नाशाचा अग्निदंड” आणला. त्या नीतीभ्रष्ट शहरांची कधीच पुनर्स्थापना होणार नाही! सदोमावर आलेला देवाचा न्यायदंड व त्यासोबत “नोहाच्या दिवसात” घडलेल्या घटनांचा निर्देश, येशूने, आम्ही सर्वदा जागृत राहावे याची गरज दाखविण्यासाठी केला.—उत्पत्ती १३:१०; १८:३२; यहुदा ७; लूक १७:२६–३०.

१६. दुरात्म्यांच्या कोणत्या हालचाली आम्हास विश्‍वासाकरता कठीण लढत देण्याचे आव्हान प्रस्तुत करतात?

१६ आता निष्काळजी असू नका! सैतान व त्याचे दुरात्मे अद्याप संतापाने भडकलेले आहेत. त्यांना लाक्षणिक “अंधःकारमय खळग्यात” टाकण्यात आलेले आहे व त्यांना रूपांतरित शरीरे घेण्यावर निर्बंध लादला गेला असला तरी त्या नीतीभ्रष्ट दुरात्म्यांचा लोकांना व खासपणे देवाच्या सेवकांना भ्रष्ट करण्याचा चंग आहे. (२ पेत्र २:४–६) कनानाने आपला आजोबा नोहा याच्यासोबत जे कुकर्म केले ते बहुधा या दुरात्म्यांकरवीच उद्युक्‍त करण्यात आले असावे. (उत्पत्ती ९:२२–२५) जो ‘कनान्यांचा मार्ग’ बनला होता त्या स्वैराचाराची अंडी यांनीच बहुतपटांनी घातली असावी की ज्यामुळे शेवटी त्या देशाला आपल्या रहिवाश्‍यांना ओकावे लागले. (लेवीय १८:३–२५) त्याचप्रमाणे आज हे दुरात्मे लैंगिक अनाचाराचे वारे वाहवत आहेत व त्याकरवी अधिकाधिक वसाहतीत बाधा आणित आहेत. त्यामुळेच आपल्या विश्‍वासाकरता जोरदार लढत देताना, आम्ही, हे पतित दुरात्मे लोकांना ‘जारकर्म करायला लावून अन्यकोटीतील अंगाशी (जो) संग करवितात’ त्या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार केला पाहिजे.—यहुदा ३, ६, ७.

टिकविण्यासाठी बांधणी करा

१७. नोहा व त्याच्या कुटुंबाप्रमाणे आम्ही या जगाचे भाग नाही हे स्वतःच्याबाबतीत कसे दाखविता येईल?

१७ आमच्या काळाची गंभीरता लक्षात घेता, आम्हाला मुक्‍ततेचा मार्ग कसा सापडू शकेल? बरे, नोहा व त्याचे कुटुंब कसे बचावले? “विश्‍वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरविले.” (इब्रीयांस ११:७) याचप्रमाणे यहोवाचे साक्षीदार आज या दुष्ट जगाचे ‘भाग नाहीत.’ शिवाय यहोवा देवास आपल्या जीवनाचे समर्पण करून व येशू ख्रिस्ताचे शिष्य बनण्यासाठी पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन आम्ही आमच्या विश्‍वासाचे प्रदर्शन केले आहे.—योहान १७:१४, १६; मत्तय २८:१९.

१८. तारवाच्या बांधणीकरवी काय सूचित होते?

१८ सोबत, आम्ही आमच्या काळासाठी थोर नोहा, येशू ख्रिस्ता करवी मार्गदर्शित असणाऱ्‍या आध्यात्मिक बांधणी कामात, यहोवाच्या कार्यात सहभागी होत आहोत. १९१९ पासून यहोवा देव त्याच्या उपासकामध्ये जे आध्यात्मिक नंदनवन उभारीत आला आहे ते त्या तारवाचे प्रतीक आहे ज्याकरवी संरक्षण व बचाव मिळाला. ही देवाबरोबरील पुनर्स्थापित अशी शांतीदायक नातेसंबंधाची स्थिती आहे. थोर नोहाच्या नमुनेदार कुटुंबाचा “मोठे संकट” यातून संरक्षण मिळण्याचा हा देवाच्या व्यवस्थेचा मार्ग आहे.—मत्तय २४:२१; १ करिंथकर ३:९, ११; २ करिंथकर १२:३, ४; प्रकटीकरण ७:१३, १४.

१९. नोहा, त्याचे कौटुंबिक सदस्य व त्यांचे काम कशाची पडछाया देते?

१९ “नोहाला यहोवाची कृपादृष्टि लाभली.” हा नोहा, जो पृथ्वीवर असताना देवासोबत नम्रभावे चालला आणि ज्याने स्वतःच्या मनाप्रमाणे कधी काही केले नाही त्या येशू ख्रिस्ताशी केवढा तंतोतंत जुळतो! (उत्पत्ती ६:८; मत्तय १७:१, ५; योहान ८:२८) दोघेहि धार्मिकतेचे उपदेशक होते—जे यहोवाच्या सर्व साक्षीदारांकरता उत्तम उदाहरण आहे. शिवाय नोहाच्या बायकोत आम्हाला पृथ्वीवरील अभिषिक्‍त शेषांचे चित्र दिसते जे तिच्याप्रमाणे अधीनतेचा कित्ता गिरवतात. (२ पेत्र २:५; लूक ४:१४–१९; इफिसकर ५:२१–२४) तारवाच्या बांधणीचे काम केवढे प्रचंड होते हे आम्ही लक्षात घेतले तर नोहाला आपल्या उतारवायात या कामी त्याच्या उत्साही व आवेशी तीन पुत्र व त्याच्या बायकांचे जे सहकार्य लाभले गेले त्यामुळे त्याला केवढा आनंद वाटला असावा! त्यांचे चित्र आधुनिक काळचा “मोठा लोकसमुदाय” याजशी हुबेहुब जुळते. हेच आज, भावी नमुनेदार प्रलयाच्या शेवटल्या अवधीत आध्यात्मिक बांधणी कार्याचा मोठा भार वाहून आहेत.—प्रकटीकरण ७:९, १५.

२०, २१. (अ) शुद्ध झालेल्या पृथ्वीवर यहोवाच्या उपासकांसाठी कोणते तेजोमय भवितव्य वाट पाहून आहे? (ब) सध्याही कोणत्या आनंदाचा अनुभव मिळतो?

२० या पृथ्वीला धुऊन स्वच्छ केल्यावर ती खरोखरच्या नंदनवनात परिवर्तित करण्यासाठी तयार असेल तेव्हा नोहाचे पुत्र व त्याच्या सुना याकरवी प्रतिछायित असणाऱ्‍यांना काही काळ धार्मिक वातावरणात मुलांना जन्म देण्याची संधि प्रस्तुत असेल. त्यानंतर पुनरुत्थानाच्या चमत्काराकरवी सबंध पृथ्वी मानवांनी भरून जाण्याचे तडीस नेले जाईल. येशूची “दुसरी मेंढरे” होण्याचा हक्क स्विकारणाऱ्‍यांना पूर्णताप्राप्त स्थितीपर्यंत आणले जाईल व नंतर शेवटल्या परीक्षेतून बचावल्यावर आणि ख्रिस्ताने आपल्या पित्याला राज्य सोपवून दिल्यावर यांना धार्मिक असे घोषीत केले जाऊन चिरकालिक जीवन बहाल केले जाईल.—योहान ५:२८, २९; १०:१६; १ करिंथकर १५:२४–२६; स्तोत्रसंहिता ३७:२९; प्रकटीकरण २०:७, ८.

२१ यहोवाच्या विश्‍वासू उपासकांसाठी केवढा आनंदी आनंद उभा आहे! तरीपण आता सुद्धा, बचावाच्या आधुनिक तारवाचे बांधणी कार्य करण्यात संपूर्ण अंतःकरण गुंतविण्याद्वारे मोठा आनंद मिळविता येऊ शकतो. या कामात सध्या केवढी वाढ होत आहे? आमचा यापुढचा अभ्यास याचे उत्तर देईल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ जलप्रलयापूर्वी घडलेल्या घटनांनी आम्हाला कोणता इशारा देऊ करावा?

◻ मत्तय २४:३७–३९ पासून आम्ही कोणता धडा घ्यावा?

◻ “वाईटाचा द्वेष” करणे इतके महत्वाचे का आहे?

◻ नमुनेदार तारू बांधण्याच्या कामात आम्ही कसे सहभागी होऊ शकतो?

[१६ पानावरील चौकट]

‘नोहाच्या दिवसा’ प्रमाणे—

“महाविद्यालयातील धार्मिक शिक्षण देणाऱ्‍या ४० टक्के शिक्षकांचा . . . अविवाहीत स्त्री पुरुषांनी लैंगिक संबंध राखणे अनैतिक आहे असा विश्‍वास आहे.” —सॅटर्डे ओकलहोमन ॲण्ड टाइम्स, डिसेंबर २९, १९८४

[१७ पानावरील चौकट]

पवित्र शास्त्रीय तत्वे अर्थवादी आहेत का?

एका एपिस्कोपलियन पाळकांनी यहोवाच्या साक्षीदारांनी चालविलेला मयतविधि पाहिला. नंतर पाळकांनी पाठविलेल्या निमंत्रणास अनुसरून वॉच टॉवर संस्थेचे दोन उपाध्याय न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन येथे पुष्कळ पाळकांसोबत आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रास आले.

पुरुषगाम्यांचा विषय सामोरा आला. साक्षीदारांनी स्पष्ट केले की पवित्र शास्त्र याला प्रतिबंध करते आणि जो कसलीहि अनैतिकता आचरतो त्याला साक्षीदार बहिष्कृत करतात. (रोमकर १:२४–२७; १ करिंथकर ६:९, १०; यहुदा ७) यानंतर साक्षीदारांनी या प्रकरणाविषयी पाळकाचे मनोगत विचारले. त्याला पुढील उत्तरे मिळाली:

एक कॉग्रिगेशनलिस्ट उपाध्याय: “मला वाटते की आमच्या चर्चच्या नियमावलीत, मंडळीतून काढून टाकण्याचा नियम कोठेतरी आहे. पण माझ्या या उभ्या आयुष्यात आम्ही त्या नियमाला कधी अवलंबिले असे वाटत नाही!”

एपिस्कोपलियन पाळक: “आम्ही तो नियम लागू केलाच तर मग कोणी सभासद व्यक्‍ति मंडळीत राहतील असे मला वाटत नाही.”

कॅथोलिक प्रवक्‍ता: “आम्ही ही या नियमाचा अवलंब केल्यावर आम्हात कोणी पाळक दिसणार नाहीत.”

पाळकांची वर उद्धृत केलेली विधाने अतिरेकी स्वरूपाची वाटतील तरीपण यहोवाच्या साक्षीदारांना आपली मंडळी शुद्धावस्थेत राखली जाते याचा आनंद वाटतो. ते या “जगाचे भाग’ नाहीत.—योहान १५:१९.

[१८ पानावरील चौकट]

‘नोहाच्या दिवसा’ प्रमाणे—

“माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी मनहात्तान येथे पुरुषगाम्यांची न्यूयॉर्क शहराची शाळा सुरु केली आहे.” त्यातील शिक्षकाने म्हटले: “आम्हाला असे वातावरण हवे जेथे मुलांचा रंगेलपणा व शृंगार अपरिपक्व बालकांपुढे होणार नाही.”—द न्यूयॉर्क टाईम्स, जून ६, १९८५

[१९ पानावरील चौकट]

‘नोहाच्या दिवसा’ प्रमाणे—

“रीवरसाईड चर्चच्या सदस्यांनी काल पूर्वानंद तत्वाचा स्विकार केला, ज्यात ख्रिस्ती कुटुंबिय जीवनाच्या विचारधारेत पुरूषगामी नातेसंबंधाचा स्विकार करण्यात आला आहे.”—न्यूयॉर्क पोस्ट, जून ३, १९८५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा