वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 २/१ पृ. १०-११
  • येशूचे पहिले शिष्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूचे पहिले शिष्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • येशूचे पहिले शिष्य
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • त्याच्या प्रेषितांची निवड
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • प्रेषितांची निवड
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • योहान येशूला बाप्तिस्मा देतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 २/१ पृ. १०-११

येशूचे जीवन व उपाध्यपण

येशूचे पहिले शिष्य

चाळीस दिवसांचा अरण्यवास संपल्यावर येशू बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाकडे परततो. तो त्याच्याजवळ येत आहे तोच योहान म्हणतो: “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा! माझ्यामागून एक पुरुष येत आहे तो माझ्यापुढे झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता असे ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे.” योहान हा जरी येशू या त्याच्या चुलत भावापेक्षा वयाने मोठा असला तरी योहान हे जाणून आहे की त्याच्या पूर्वी येशू आत्मिक व्यक्‍ति या नात्याने स्वर्गात अस्तित्वात होता.

यानंतर दुसऱ्‍या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघासह उभा असता, पुन्हा येशूला जवळून जाताना पाहून म्हणतो: “पाहा, देवाचा कोकरा!” त्याचवेळी बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचे ते दोघे शिष्य येशूच्या मागे निघतात. त्यापैकी एक आंद्रिया हा आहे आणि दुसरा ज्याने ह्‍या गोष्टी लिखित केल्या तो स्वतःच आहे. त्याचे नाव देखील योहान हेच आहे. हा योहान मरीयेची बहीण सलोमी हिचा पुत्र म्हणजे येशूचा चुलत भाऊच आहे हे एकंदरीत परिस्थितीवरून कळते.

येशू वळून आंद्रिया व योहानाला आपल्यामागे येताना पाहून म्हणतो: “तुम्ही काय शोधता?”

“गुरुजी,” ते विचारतात, “तुम्ही कोठे राहता?”

येशू उत्तर देतो: “या, म्हणजे तुम्ही पहाल.”

आता दुपारचा चारचा सुमार आहे. आंद्रिया व योहान त्या दिवशी येशूबरोबरच राहतात. नंतर आंद्रिया इतका उत्तेजित होतो की तो घाईघाईने पेत्र म्हणणाऱ्‍या त्याच्या भावाकडे जाऊन त्याला भेटतो व म्हणतो: “आम्हाला मशीहा सापडला आहे.” तो पेत्राला घेऊन येशूकडे आणतो. याचवेळी योहान त्याचा भाऊ याकोब यास भेटतो आणि याला देखील येशूकडे घेऊन येतो. तथापि, वैशिष्ट्यपूर्णतेने, योहान या व्यक्‍तिगत माहितीचा उल्लेख गाळतो.

दुसऱ्‍या दिवशी येशू फिलिप्पाला भेटतो आणि त्याला “माझ्यामागे ये” असे आमंत्रण देतो. फिलिप्पाला नंतर नथनेल भेटतो ज्याला बर्थलमय असेही म्हटले जाई. तो म्हणतो: ‘ज्याच्याविषयी मोशाने नियमशास्त्रात लिहीले व संदेष्ट्यांनी लिहीले तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासारेथकर आम्हाला सापडला आहे.” नथनेलला शंका येते. तो विचारतो: “नासारेथातून काही तरी उत्तम निघू शकते काय?”

“येऊन पाहा.” असे आमंत्रण फिलिप्प त्याला देतो. ते जेव्हा येशूकडे येतात तेव्हा येशू नथनेलला म्हणतो: ‘फिलिप्पाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले.”

नथनेलला आश्‍चर्य वाटते. तो उत्तर देतो: “गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहा. आपण इस्राएलाचे राजे आहात.”

यानंतर येशू लागलेच आपल्या प्राप्त झालेल्या नव्या शिष्यांसमवेत यार्देन दरी ओलांडून गालीलकडे प्रवास करू लागतो. योहान १:२९–५१.

◆ येशूचे पहिले शिष्य कोण होते?

◆ पेत्र व बहुधा याकोब यांचा येशूसोबत कसा परिचय घडला?

◆ येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्‍वास नथनेलला कसा पटला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा