वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 १०/१ पृ. २६-२८
  • “मला चांगुलपणा शिकीव”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मला चांगुलपणा शिकीव”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चांगुलपणा व नीतीमत्ता
  • यहोवाच्या चांगुलपणाचे उदाहरण
  • यहोवाच्या चांगुलपणाचे अनुकरण करा
  • चांगुलपणा शिकण्याकरवी मिळणारे आशीर्वाद
  • देवाच्या चांगुलपणाचा आश्‍चर्यकारक विस्तार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • यहोवा–चांगुलपणाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • चांगुलपणाने वागत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • चांगुलपणा—तुम्ही कसा विकसित करू शकता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 १०/१ पृ. २६-२८

“मला चांगुलपणा शिकीव”

मोटारगाड्यांची वर्दळ असणाऱ्‍या हमरस्त्यावर एक वृद्ध महिला एकाएकी कोसळून पडली त्यावेळी फक्‍त दोघा जणांनीच तिची दखल घेतली. तुफान गर्दी व वेळेवर पोहोचण्याची घाई यामुळे इतर प्रवाश्‍यांना तिची दैन्यावस्था अडचण अशी वाटली. उद्वीग्न झालेला एक प्रवासी ओरडून म्हणाला: “त्या म्हातारीला कोणी तरी बाजूला घेऊन जा ना.” मरणाच्या लागास आलेली ती स्त्री व तिला मदत करू पाहणारे दोन वाहन चालक यांचा इतरांना मोठा अडथळा वाटला. त्यामुळे लोक त्यांच्या कडे लक्ष न देता त्यांना “वारंवार तुडवून” जात होते.

अशा प्रकारची दृश्‍ये जगाच्या विविध भागात दिसतात. या घटना अगदी नाट्यमयरित्या पवित्र शास्त्रातील भविष्यवाद पूर्ण करतात की, “शेवटल्या काळी . . . लोक . . . चांगल्यावर प्रेम न करणारे” होतील. तथापि ख्रिश्‍चनांना यहोवाला संतुष्ट करण्याची इच्छा असते. याकारणास्तव, चांगुलतेचा अभाव दर्शविणाऱ्‍यांपासून त्यांनी ‘दूर राहिले’ पाहिजे. (२ तिमथ्यी ३:१–५) तरीपण आमचा सहवास संयमित ठेवणे एवढेच पुरेसे नाही. चांगुलपणा या गुणाची, पवित्र आत्म्याचे फळ अर्थी काळजीपूर्वक रित्या जोपासना केली जाण्यास हवी. (गलतीकर ५:२२) पण कसे? चांगुलपणा म्हणजे काय?

चांगुलपणा व नीतीमत्ता

चांगुलपणा हा नैतिक उच्चतम दर्जा व सद्‌र्गिण आहे; तो चांगले असण्याचा गुण वा स्थिती दर्शक आहे. तरीपण नित्वळ स्थितीपेक्षा त्याला महत्व आहे. खंडणीच्या तरतुदी संबंधाने चर्चा करताना प्रेषित पौल म्हणाला: “नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोमकर ५:७, ८) याठिकाणी चांगुलपणा नीतिमत्तेच्या गुणवैधर्म्यात आहे असे दिसते. पण या दोन्ही गोष्टी खऱ्‍याच परस्परांविरूद्ध आहेत का?

नाही. पौलाच्या मनात येथे हा विचार होता की नीतिमत्वात एका विशिष्ठ दर्जास जडून राहणे असते. खरे म्हणजे नीतिमत्तेचा संबंध न्यायासोबत जोडण्यात आला आहे. (पडताळा प्रकटीकरण १९:११) नीतिमान मनुष्य कायदा पालन करणारा असतो. तो ठराविक प्रमाण, विशिष्ट साचा पुरा करतो पण त्यापलिकडे जादा काही करीत नाही. याकरवी तो आदर मिळवू शकतो, पण अंतःकरणे जिंकून घेत नाही. अशा माणसासाठी थोडेच मरण्याचे धाडस करतील. तथापि, “चांगला” मनुष्य बंधनाचे पालन करणे किंवा दुष्कृत्ये करण्याचे टाळणे यापेक्षा अधिक करीत असतो. त्याचा चांगुलपणा त्याला इतरांसाठी स्वतःपुढाकार घेण्यात, त्यांच्यासाठी स्वतः काही करण्यासाठी पुढे सरसावत असतो.

दुसऱ्‍यांसाठी चांगल्या गोष्टी करण्याकरता स्वतःला झटावयास लावणारे खरे शेजारी असल्याचे सिद्ध होतात. येशूने शोमरोन्याविषयीचा दिलेला दाखला या मुद्याचे स्पष्टीकरण देतो. ‘कळवळा येऊन’ त्या शोमरोन्याने, चोराच्या हाती सापडलेल्या व जखमी झालेल्या यहुद्याच्या जखमा बांधल्या. या नंतर त्या “भल्या माणसाने” त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली.” (लूक १०:२९–३७) तर मग या दाखल्याला काहींनी उत्तम शोमरोन्याचा दाखला असे जे म्हटले ते नवलाईचे वाटते का?—पडताळा मत्तय १२:३५; २०:१०–१५; लूक ६:९, ३३–३६.

चांगुलपणा हा नुसता सोशिक नाही तर तो प्रबळपणे क्रियाशील आहे. “चांगल्या” माणसाची दया, औदार्य आणि स्वार्थत्याग बघून कोणीही त्याच्यासाठी मरावयास देखील तयार होईल! अगदी याच उत्तम कारणास्तव स्तोत्रकर्त्याने प्रार्थिले: “मला चांगुलपणा शिकीव.” (स्तोत्रसंहिता ११९:६६ न्यू.व) पण यहोवा हे कसे करतो?

यहोवाच्या चांगुलपणाचे उदाहरण

यहोवा स्वतःच्या उदाहरणाद्वारे आम्हाला चांगुलपणा शिकवितो. तो प्रत्यक्षात चांगुलपणाचे व्यक्‍तिमत्व आहे. देवाचे वैभव पाहावयास मिळावे अशी मोशाने विचारणा केली तेव्हा देवाने म्हटले: “मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; तुझ्यासमोर यहोवा ह्‍या नावाची घोषणा करीन.” हे कसे घडले? यानंतर लगेचच,, “यहोवाने त्याच्यासमोरून जाताना अशी घोषणा केली: ‘यहोवा, यहोवा, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा; अन्याय, अपराध व पाप ह्‍यांची क्षमा करणारा; (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा.’”—निर्गम ३३:१८, १९; ३४:६, ७.

त्यावेळी यहोवाच्या चांगुलपणाचे दर्शन विविध मार्गी झाले. यामध्ये त्याची दया व सत्याविषीचे प्रेम हे गुण लक्षणीयरित्या दिसले. मानवाच्या अपूर्ण दशेची जाण असल्यामुळेच, ज्यांना योग्य त्या गोष्टी करण्याची खरीच इच्छा आहे अशांच्या बाबतीत यहोवा विचारशील व सहनशील आहे. तरीपण तो वाईटपणा चालवून घेत नाही. अशा प्रकारे यहोवाने जे उदाहरण मांडले त्यावर मनन करण्यामुळे आम्हाला निश्‍चितपणे लाभ घडू शकेल.

यहोवाने आपल्या निर्मितीद्वारे सुद्धा चांगुलपणाचे प्रदर्शन घडविले. खरे म्हणजे, त्याने आपली निर्मिती कार्ये तपासून पाहिली तेव्हा त्याला ती “चांगली”च दिसली. (उत्पती १:१२, १८, २५, ३१; रोमकर १:२०) जीवन अबाधित राहावे या करता देवाने बारीक सारीक गोष्टींनी या ग्रहास भरवून टाकले आहे.

“पाऊस” हे याचे उत्म उदाहरण आहे. (यशया ५५:१०) वैज्ञानिकदृष्टया अगदी अचूकतेत अलिहू म्हणू शकला की यहोवा “जलबिंदू आकर्षितो, त्यांची वाफ होऊन ते पर्जन्यरूपाने पडतात. मेघ त्यांची वृष्टी करतात. ते लोकसमूहावर विपुल वर्षाव करतात . . . तो . . . अन्‍नाची विपुलता करितो.” (इयोब ३६:२७–३१) या चक्रात दरदिवशी १३२,००० दस दश लक्ष गॅलन (५००,००० दस दश लक्ष लिटर्स) पाण्याचा समावेश असतो. यापैकीचे बहुतेक पाणी सूर्य समुद्रातून ‘आकर्षवितो.’

द न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार “दक्षिण अमेरिकेच्या अष्णदेशीय जंगलांच्या चलपदार्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्‍या संशोधकांनी असा वैज्ञानिक पुरावा शोधून काढला की ज्यात प्रथमत:च म्हटले आहे की वने वातावरणातून जितकी आर्द्रता शोषून घेतात त्यातील ७५ टक्के आर्द्रता ते वातावरणास परत करतात.” हा अहवाल पुढे दाखवितो की, “वने जितक्या प्रमाणाचे पाणी साठवून घेतात तेच पाणी ते हवेस इतक्या प्रमाणात परत करतात की ज्याकरवी पुरेसे असे नवे पावसाचे ढग तयार होऊ शकतील.” अन्‍नाच्या उत्पादनासाठी पाऊस हा निसंशये एक महत्वपूर्ण घटक आहे. खरेच यहोवाने पृथ्वीवरील जीवनासाठी मुबलकपणे व कार्यक्षमनेने तरतूद करून दिली आहे. कृतघ्न व अरसिक लोकांसाठी सुद्धा या र्सव तरतूदी पुरवून त्याने केवढा चांगुलपणा प्रदर्शित केला बरे!—मत्तय ५:४४, ४५.

तरीपण यहोवाच्या चांगुलतेचे अधिक थरारक प्रमाण, मानवजातीविषयक त्याच्या मूळच्या उद्देशाबद्दल त्याने घडविलेली पूर्णता यात दिसते. (उत्पत्ती १:२८; ३:१५; रोमकर ५:१२) आपल्या चांगुलपणामुळेच त्याने पुढे होऊन पापीष्ठ मानवजातीकरता खंडणीची तरतूद केली आणि “आपला एकुलता एक पुत्र दिला. यासाठी की जो कोणी त्याजवर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६; रोमकर ३:२३, २४) देवाच्या राज्याकरवी तो, प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांविषयी असणारा आपला चांगुलपणा या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत घडवून प्रदर्शित करील. (दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०; २ पेत्र ३:९, १०) मग, देवराज्य अधिपत्याखाली ही पृथ्वी नंदनवन होईल त्यावेळी देवाचा केवढा चांगुलपणा दिसून येईल बरे!—लूक २३:४३; २ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:१–५.

यहोवाच्या चांगुलपणाचे अनुकरण करा

पवित्र शास्त्राच्या नियमित अभ्यासामुळे यहोवा देवाच्या चांगुलपणाचे परिपूर्ण उदाहरण आम्हापुढे नित्य राहते. याकरवी त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याची आम्हाला चालना मिळते. हे खरे स्वयंपाक झाडलोट, बाजारहाट आणि घरातील दुरुस्तीची कामे या आवश्‍यक गोष्टी आपल्या शास्त्रवचनाच्या नियमित अभ्यासात अडथळा आणतील. तरीपण आम्ही आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिलेच पाहिजे. या गोष्टीची सूचकता येशू ख्रिस्ताने मार्था व मरीयेच्या घरी भेट दिली तेव्हा दर्शविली मार्था घरकामात गुंतली तेव्हा मरीया येशूच्या चरणाजवळ बसून “त्याचे भाषण ऐकत राहिली.” ज्यावेळी मार्थेने मदत मिळावी म्हणून मरीयेची विचारणा केली तेव्हा येशूने म्हटले: “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस. परंतु थोडक्याच गोष्टीचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.” आपल्या व्यक्‍तिगत व कौटुंबिक अभ्यासात अशा आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देण्याद्वारे तुम्ही देखील चांगला वाटा निवडून घेऊ शकता.—लूक १०:३८–४२.

ख्रिस्ती मंडळीमार्फत सुद्धा यहोवा आपल्याला चांगुलपणा शिकवितो. येथे आम्हाला ‘चांगुलपणाने भरलेल्या’ लोकांचा सहवास लाभतो. (रोमकर १५:१४) पुष्कळ अनुभव याविषयीची खात्री देतात. यहोवाची एक साक्षीदार सेविका (जी आधीच दोन मुलांची माता होती) तिला तिळे जन्मल्याची वार्ता ऐकून आश्‍चर्याचा मोठा धक्काच बसला! ‘आम्ही ख्रिस्ती सभांना कसे जाऊ शकू?’ तिला नवला वाटले. ‘इस्पितळाचा खर्च कसा सोसवणार? आता आमच्या पाच मुलांना अन्‍नवस्त्राचा कसा पुरवठा होईल?’

तरीपण लवकरच या स्त्रीला, तिचे ख्रिस्ती भाऊ बहिणी “चांगुलतेने भरलेले” आहेत याचा पुरावा दिसला. “घरी आल्यावर,” ती म्हणते, “मला आढळले की माझ्या कित्येक भावा बहिणींनी आधीच येऊन घराची स्वच्छता करून ते नीटनेटके केले आहे. शिवाय मला स्वतःला काम करता येईपर्यंत दररोज जेवण आणण्याची व घरकाम उरकण्याची बहिणींनी आपणामध्ये व्यवस्था लावून घेतली.” पुष्कळ बांधवांनी आर्थिक साहाय्य दिले, यापैकी एका बंधूने निनावीपणे १,००० डॉलर्स दिले! हिवाळयात मात्र या कुटुंबाला घर उबदार ठेवावे लागण्या खातर बरेच मोठे बील झाले. जेव्हा इंधन कंपनीकडून या स्त्रीला टेलीफोन आला तेव्हा ती केवढी चिंताक्रांत बनली असावी याचा विचार करा. तरीपण कंपनीने तिला कळविले की तिच्या एका ख्रिस्ती बहिणीने बिलाची सर्व रक्कम भरली आहे! इंधन सेवा छाटून टाकावी अशा आशयाचे, या त्रस्त कुटुंबाला कंपनीने लिहिलेले पत्र चुकीने त्या सहसोबत्याच्या पत्यावर पाठविण्यात आले होते; आणि चांगुलपणामुळेच त्या बहिणीने त्या कुटुंबाकरता बिलाची रकम भरण्याची मदत केली.

असा हा चांगुलपणा हृदयाला केवळ चाटून जात नाही तर तो संसर्गजन्यही ठरतो. यहोवाच्या साक्षीदारांकडूनच “मला प्रेम व्यक्‍त करायचे व दयाळू असण्याचे शिकायला मिळाले” असे, पूर्वी बायकोला झोडपणाऱ्‍या पतीने, त्याची बायको पहिल्यांदाच सभा आटपून घरी परतली तेव्हा तिला म्हटले.” याकरताच आता मी येथून पुढे तुला मारहाण करणार नाही.”

चांगुलपणा शिकण्याकरवी मिळणारे आशीर्वाद

चांगुलपणा शिकणे व तो प्रेमाने व्यक्‍त करीत राहण्याचे आशीर्वाद आताही आम्हाला मिळू शकतील. याकरवी आमचा बंधूवर्गासोबतचा व जगातील लोकांबरोबर येणारा संपर्क सुखावह ठरतो. (नीतीसूत्रे ११:१०; १ पेत्र ३:१३) अत्यंत महत्वाचे ते हे की, “चांगले करीत” राहिल्यामुळे आम्हास छळ सहन करावा लागतो तर हे “देवाच्या दृष्टीने योग्य आहे.” (१ पेत्र २:२०) विश्‍वास राखणे व चांगुलपणा व्यक्‍त करणे या गोष्टी आम्हाला “मोठ्या संकटातून” पार नेऊन नव्या व्यवस्थीकरणात प्रवेश मिळवून देण्यास समर्थक ठरतील.—इब्रीयांस १०:३६–३९; मत्तय २४:२१.

तद्वत, यहोवाला तुम्हाला चांगुलपणा शिकवू द्या. याचे आशीर्वाद? त्याद्वारे “गौरव, सन्मान व शांती ही मिळतील.”!—रोमकर २:६–११.

[२७ पानांवरील चित्र]

जीवन टिकवून ठेवण्यासाठी असणार पाण्याचा समृद्ध साठा यहोवाच्या चांगुलतेचे प्रदर्शन घडवितो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा