राज्य घोषकांचा वृत्तांत
अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्यांची प्रशंसा केली गेली
“चांगले ते तर म्हणजे . . . तुझी प्रशंसा होईल.” असे प्रेषित पौलाने रोमकरांस पत्र १३:३ मध्ये म्हटले आहे. ही गोष्ट मागील वर्षी ब्राझिलमध्ये झालेल्या “राज्याची वाढ” अधिवेशनाच्या बाबतीत खरी ठरली.
उदाहरणार्थ, जोआओ पेसोआ येथे झालेल्या अधिवेशनानंतर क्लब व्यवस्थापकाने अधिवेशन समितीस म्हटले: “तुम्ही संमेलन इतक्या उत्तम प्रकारे पार पाडले म्हणून मी तुमचे अभिनंदन करतो. यामध्ये प्रौढांची व मुलांची उत्तम वागणूक दिसली. इतर कोणत्याही धार्मिक संस्थांनी अशी चांगली वागणूक दाखवली नाही. आम्ही तुम्हाला सभागृह वापरण्यास देतो तेव्हा आम्हाला काळजी नसते. तुम्हाला हवे तेव्हा आमचे सभागृह उघडे राहील.”
आणखी इतरांकडून अशाच प्रकारची विवेचने ऐकावयास मिळाली:
◻ “मला कित्येक वर्षांपासून मोठमोठया जमावाला हाताळावे लागते पण त्यामध्ये तुमचा समाज संघटित, अत्यंत टापटीप राखणारा व सहकार्य देऊ करण्यास तत्पर दिसला.”—रिओ डी जानेरो येथील मराकानाझिन्हो स्टेडीयमचे व्यवस्थापन.
◻ “तुमची एकंदर वागणूक व हालचाल पाहून मी खराच विस्मित झालो. येशू ख्रिस्त आता आलाच तर मला वाटते की ज्या धर्मास तो आपली संमति व्यक्त करू इच्छिणार तो तुमचाच असेल.”—रिओ डी जानेरो येथील एका अधिवेशनात कामावर असणारा अग्निशामक दलातील कर्मचारी.
◻ “तुम्हाला आम्हाला (पोलिसांना) तणिक त्रास द्यावासा वाटत नाही. सगळेच लोक तुमच्या लोकांप्रमाणे असते तर ते किती बरे असते असे मला वाटते. माझी शिटी वाजली असता कसलीही का कू न होता माझ्या आज्ञेचे पालन होईल हे मला ठाऊक आहे.”—क्युरिटीबा येथील अधिवेशनाकरता नेमण्यात आलेला वाहतूक पोलीस.
◻ “तुमचा सव्यवस्थितपणा, अद्र्भित व उत्स्फुर्त शिस्त याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतो. आम्ही तुमच्या भावी संमेलनाविषयी सुयश चिंतितो आणि आपणाला याची हमी देऊ इच्छितो की आमचे हे पालिकेचे सभागृह आपणासाठी सदैव उघडे राहील.”—सॅन्टो अण्ड्रे येथील महापौरांकडून अधिवेशन देखरेख्यांना आलेले पत्र.
◻ “आमच्या हॉटेलातील खोल्या ज्यांनी वापरल्या त्या तुमच्यामध्ये व इतरांमध्ये मोठा फरक होता. तुमच्या लोकांनी खोल्यातील सर्व वस्तु व्यवस्थित व नीटनीटक्या ठेवल्या आणि त्यांच्या वागणूकीने इतरांबद्दचा शुद्ध आदर व्यक्त केला.”—नोवो हॅम्बर्गो येथील एक हॉटेल व्यवस्थापक.
◻ “तुमच्या या लोकांना चांगला पगार मिळत असेल.”—सोरोकाबा येथील अधिवेशनात ब्रेडचा पुरवठा करणाऱ्या एका बेकरीच्या मालकाने, बंधूजन केवढया कष्टाळूपणे काम करतात हे पाहिल्यावर असे म्हटले. जेव्हा त्याला कळाले की सर्वच बिनपगारी, स्वयंसेवक आहेत तेव्हा तो आपल्या बेकरीत परत गेला व त्याने बेकरीतला सर्व कामगारवर्ग आणून त्यांना बांधव केवढया परिश्रमाने व समर्पणाने काम करीत आहेत ते बघायला सांगितले.
ब्राझिलच्या अधिवेशनांनी वृत्तपत्रांचेही लक्ष वेधवून घेतले. ट्रिब्युना दा बाहिया या वृत्तपत्राने हा अहवाल दिला: “पवित्र शास्त्र हातात धरून, मानवी हिंसाचार व फसवणूक या गोष्टींना काय विवेचन आहे हे त्यात पडताळत असता, साक्षीदार कधी राजकारणाची चर्चा करत नाहीत, सामाजिक घडामोडीत हस्तक्षेप करीत नाहीत आणि त्यांना निवडणूकांबद्दल माहिती नाही. या विषयीचे समर्थन असे की, ही वस्तुस्थिती राहिली आहे की कोणताही अधिपती आलातरी त्याला समतोल राहता येणे जमणार नाही, त्यामुळे केवळ देवच या जगावर पूर्णतेने ताबा राखू शकतो. . . . त्यांच्या विश्वासाचा आधार येणारे नवे जग आहे ज्यात, पवित्र शास्त्राचा सातत्याचा अभ्यास आणि वाईट सवया सोडून देऊन शुद्ध अंतःकरण जोपासण्याने प्रवेश होऊ शकतो.”
यहोवाचे साक्षीदार अर्थातच परिपूर्ण असल्याचा दावा करीत नाहीत पण देवाचे राज्य परिपूर्ण असे नवे व्यवस्थीकरण आणील असा त्यांचा विश्वास आहे. तरीपण त्यांनी पवित्र शास्त्रात १ पेत्र २:१२ मधील सूचनेचा अवलंब कटाक्षाने ठेण्याचा प्रयत्न केला आहे: “परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा. यासाठी की, . . . त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.”
[२९ पानांवरील चित्र]
ख्रिश्चनांची वागणूक परमेश्वराची महिमा करते