वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ८/१ पृ. १०-१५
  • ‘तुम्हाला बक्षीसमिळेल असे धावा’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘तुम्हाला बक्षीसमिळेल असे धावा’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “मनुष्याची भीति”
  • कौटुंबिक ओढ
  • तुमचे मित्र—“सूज्ञ” की “मूर्ख”?
  • बक्षीस मिळवा!
  • ‘कोणा माणसाला तुम्हाला तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • कोणत्याही गोष्टीमुळे आपलं बक्षीस गमावू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांना “अडखळण्याचे कारण पडणार नाही”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • जीवनाची शर्यत पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ८/१ पृ. १०-१५

‘तुम्हाला बक्षीसमिळेल असे धावा’

“शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल.”—१ करिंथकर ९:२४.

१, २. (अ) ख्रिश्‍चनांसाठी आज कोणती घटना अत्यंत दुःखद ठरू शकेल? (ब) पौलाने १ करिंथकर ९:२४ मध्ये कोणती सूचना दिली व ती करिंथ येथील ख्रिश्‍चनांना कशी लागू झाली?

तो १२ वर्षांच्या त्रासदायक तयारीचा भव्य कळस ठरू शकणार होता. पण शर्यतीत अर्ध्यावरच एक युवक खेळाडू एका ढिगाऱ्‍यात पडली त्यामुळे ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदकाच्या प्राप्तीचे तिचे स्वप्न अगदी चक्काचूर झाले. तिच्या या पतनाला वृत्त माध्यमाने “दुःखद घटना” असे म्हटले.

२ तरीपण यापेक्षा अधिक दुःखद घटना, कोणा यहोवाच्या साक्षीदाराने, अभिवचन दिलेले नवे व्यवस्थीकरण आता दृष्टि पथात आलेले असताना जीवनाची शर्यत पूर्ण करण्यात अपयशी ठरणे ही होऊ शकेल. (२ पेत्र ३:१३) यामुळेच प्रेषित पौल अगदी योग्य कारणास्तव म्हणू शकला: “शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल.” (१ करिंथकर ९:२४) प्राचीन करिंथमध्ये काहींना अपयशी ठरण्याचा धोका होता कारण त्यांनी आपल्या मनाला वाटेल त्या स्वार्थ गोष्टी ते आचरीत राहिले, व तेही इतरांच्या “सद्‌द्विवेक बुद्धाला धक्का देऊन” ते हे करीत होते. (१ करिंथकर ८:१–४, १०–१२) शर्यत जिंकण्यात स्वार्थत्याग जरूरीचा आहे कारण पौलाने म्हटले: “स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीं विषयी इंद्रियदमन करतो. . . . मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्‍यांस घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः अपात्र ठरेन.”—१ करिंथकर ९:२५–२७.

३. (अ) ख्रिश्‍चनांनी शर्यत संपविण्यापासून त्यांना परावृत्त केले जाईल अशी कोणती परिस्थिति कलस्सैमध्ये अस्तित्वात होती? (ब) कलस्सैमधील ख्रिश्‍चनांनी तत्वज्ञान व गूढ वाद शिकून ध्यावा हे सुयुक्‍त होते का?

३ नंतर कलस्सैकरांना लिहिताना पौलाने आणखी एका संभाव्य धोक्याचा, जीवनाचे ‘बक्षिस मुकविणाऱ्‍या’ लोकांविषयीचा इशारा दिला. (कलस्सैकर २:१८) तर मग, ख्रिश्‍चनाला ‘असे [कसे] धावता येईल की ते मिळू शकेल’? खोट्या शिक्षकांवर यशस्वीरित्या मात करता यावी याकरता त्यांनी तत्वज्ञान आणि गूढवाद शिकून घ्यावा असे पौल सुचवीत होता का? नाही, कारण ख्रिश्‍चन तर ‘जगाच्या प्राथमिक शिक्षणास’ मेले होते, त्यामुळेच तत्वज्ञान व संप्रदाय याबद्दल त्यांना काही एक कर्तव्य नव्हते.—कलस्सैकर २:२०.

४. “अचूक ज्ञान” संपादण्यामुळे कलस्सैमधील ख्रिश्‍चनांना कोणती मदत मिळणार होती?

४ याकारणास्तव पौल आपल्या समविश्‍वासू बांधवांना याचे प्रोत्साहन देत होता की त्यांनी आपले प्रयत्न “आध्यात्मिक आकलनशक्‍ती व बुद्धी ह्‍यांच्याद्वारे [देवाच्या] इच्छेसंबंधीच्या अचूक ज्ञानाने भरले जावे” याकरता केंद्रित करावे होय, निरुपयोगी अंदाज नव्हे तर “अचूक ज्ञान” त्यांना “सर्व प्रकारे यहोवाला संतोषविण्याकरता त्याला शोभेल असे वागावे” म्हणून उपयुक्‍त ठरणार होते. (कलस्सैकर १:९, १०; तसेच कलस्सैकर ३:१० पहा.) हे खरे की कलस्सैमधील बहुतेक सर्व ख्रिश्‍चन शास्त्रवचनातील मुलभूत शिक्षन आठवून सांगू शकत होते. तरीपण अभ्यास व मनन याकरवी त्यांनी मुलभूत शिक्षणापलिकडे जाऊन ख्रिस्ताच्या “विश्‍वासात स्थिरावलेले” होण्यास हवे होते. (कलस्सैकर १:२३; १ करिंथकर ३:११) ज्ञानाची ही खोली प्राप्त झाल्यावर ‘लाघवी भाषणाने कोणी त्यांना भुलवू शकत नव्हता.’ (कलस्सैकर २:४) देववचनाच्या चातुर्यपूर्ण वापराकरवी ते कोणा दिव्यदूत उपासक वा यहुदी मताच्या माणसाच्या दाव्याचे प्रभावीपणे खण्डन करू शकत होते.—अनुवाद ६:१३; यिर्मया ३१:३१–३४.

५. (अ) प्रौढ ख्रिश्‍चनाला ज्याची माहिती व समज असली पाहिजे त्या “गहन गोष्टीं” विषयीची काही उदाहरणे सांगा. (ब) “अचूक ज्ञान” प्राप्त न करण्यात जो धोका समाविष्ट असतो त्याचे विदारण एका बहिणीच्या अनुभवात कसे दिसते?

५ तुम्ही स्वतः “प्राथमिक बाबीं”च्या पलिकडे जाऊन “देवाच्या गहन गोष्टींचा” शोध घेतला आहे का? (इब्रीयांस ६:१; १ करिंथकर २:१०) उदाहरणार्थ, तुम्हाला प्रकटीकरणाच्या श्‍वापदाचा उलगडा किंवा आध्यात्मिक मंदिर काय आहे ते सांगता येईल का? (प्रकटीकरण अध्याय १३; इब्रीयांस ९:११) यहोवाच्या साक्षीदारांच्या आधुनिक काळच्या संघटनेचा शास्त्र वचनीय आधार तुम्हाला स्पष्ट करता येईल का? पवित्र शास्त्र तत्वांमध्ये तुम्ही खोलवर रूजलेले आहात का? एका ख्रिस्ती बहिणीला कोणा स्त्रीसोबत त्रेकत्व विषयाची चर्चा सामोरी आली त्यावेळी आपल्या विश्‍वासाचे समर्थन करणे जड वाटले. नंतर त्या स्त्रीने बहिणीला अशी प्रकाशने दिली ज्यात यहोवाच्या संस्थेविषयीची केवळ निंदाच होती. “मला आध्यात्मिकदृष्टया फारच निराश झाल्याचे वाटले,” असे त्या साक्षीदार सेविकेने म्हटले. एका वडीलांनी या बहिणीला विरोधकांचे खोटे दावे स्पष्ट करून दाखविले व तिचा विश्‍वास पुनर्स्थापित केला. (यहुदा २२, २३) “आता मला समजते,” ती म्हणते, “की संस्था नेहमी ‘प्रार्थना करा,’ ‘अभ्यास करा’ व ‘मनन करा’ असे का सांगत असते.”

“मनुष्याची भीति”

६. (अ) देवाच्या काही सेवकांना कोणत्या गोष्टींचे अडखळण आले? काही शास्त्रीय उदाहरणे द्या. (ब) मनुष्याची भीती कशामुळे उद्‌भवते?

६ “मनुष्याची भीति पाशरूप होते” असा सूज्ञ पुरूष इशारा देतो. (नीतीसूत्रे २९:२५) कधी कधी ‘मरणाचे भय’ व इतरांची आपणाला मान्यता राहावी ही अवास्वत इच्छा एखाद्याला या पाशात अडकविते. (इब्रीयांस २:१४, १५) बाल उपासकांच्या समोर एलीया एकटा मोठ्या निर्भिडपणे उभा राहिला. पण जेव्हा इजबेल राणीने त्याच्या हत्येची आज्ञा केली त्यावेळी “एलीया घाबरला व जीव घेऊन पळाला आणि तो . . . बैर–शेबा येथे आला.” (१ राजे १९:१–३) ज्या रात्री येशूला धरण्यात आले त्याच रात्री प्रेषित पेत्र सुद्धा माणसाच्या भीतीने गर्भगळीत झाला. आधी तर तो मोठ्या आवेशाने म्हणाला होता की, “प्रभूजी, मी आपणाबरोबर तुरूंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे.” पण जेव्हा त्याजवर, तो ख्रिस्ताच्या सोबत्यांपैकी एक आहे असा शेरा दिला गेला तेव्हा “तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला: ‘मी त्या मनुष्याला ओळखत नाही!’”—लूक २२:३३; मत्तय २६:७४.

७. (अ) कलस्सैमधील काहींनी ख्रिस्ती धर्माला यहुदी धर्माकडे झुकविले त्या मागील खरे कारण काय असावे? (ब) अशीच प्रबळ इच्छा आज कोण व्यक्‍त करीत आहेत?

७ मान्यता गमाविण्याच्या भयप्रद इच्छेमुळेच काहींनी ख्रिश्‍चन धर्माला यहुदी धर्माकडे का वळविले त्याचे कारण स्पष्ट करते. यहुदी मताभिमानी जेव्हा गलतीया येथे सामोरे आले तेव्हा पौलाने त्यांचे दांभिकपण स्पष्टपणे उघड केले. तो म्हणाला: “जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हाला सुंता करून घेण्यास भाग पाडतात.” (गलतीकर ६:१२) तर मग, ज्यांनी अलिकडेच यहोवाची संस्था त्यागिली आहे त्याचे कारण वरीलप्रमाणे मान्यवर बनण्याची प्रबळ इच्छा हे तर नसेल ना?

८, ९. (अ) कोणा ख्रिश्‍चनाठायी मनुष्याची भीति आहे हे कसे दिसून येईल? (ब) या भयावर कशी मात करता येईल?

८ अशा भीतीवर मात करण्यासाठी ख्रिश्‍चनांनी परिश्रम घेतलेच पाहिजेत, तुम्ही तुमच्या घरालगतच्या क्षेत्रात प्रचार करण्यास नाखुष आहात आणि आपले नातेवाईक, कामगारमित्र, शाळकरीमित्र यांना साक्ष देण्यापासून स्वतःला मागे ठेवता तर मग, यहोवा यशया ५१:१२ मध्ये जो प्रश्‍न तुम्हास विचारतो त्याकडे लक्ष द्या: ‘तू मर्त्य मनुष्याला, तृणवत्‌ मानवपुत्राला भितोस असा तू कोण?’ (पडताळा मत्तय १०:२८) याचे स्वत:ला स्मरण द्या की, “जो यहोवावर भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते.” (नीतीसूत्रे २९:२५) पेत्राने मनुष्याच्या या भीतीवर मात केली आणि तो आघोओघाने हुतात्मिक मरणाला सामोरा गेला. (योहान २१:१८, १९) आज कित्येक बांधव अशाच प्रकारचे अप्रतिम धैर्य दाखवीत आहेत.

९ प्रचारकार्यास बंदी असणाऱ्‍या एका देशात कार्य करणाऱ्‍या एका सुवार्तिकाने म्हटले: “पोलिसांकरवी धरपकड होईल याची जाणीव असतानाही सभेला वा प्रचाराला जाण्यासाठी मोठा विश्‍वास हवा.” तरीपण तेथील बांधवांनी स्तोत्रकर्त्याच्या सुरात म्हटले: “यहोवा माझ्या पक्षाचा आहे. मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?” (स्तोत्रसंहिता ११८:६) यामुळेच त्या देशातील कार्य वाढीस लागले व नुकतीच त्याला कायदेशीर मान्यताही मिळाली. तुम्ही क्षेत्र कार्यात नियमितपणे भाग घेतला तर ते तुम्हाला यहोवावरील असाच आत्मविश्‍वास वाढविण्यास साहाय्य करील.

कौटुंबिक ओढ

१०. (अ) कोणती भावनिक गरज सार्वत्रिक आहे व तिची पूर्तता सहसा कशी होते? (ब) यहोवा देवाबरोबरच्या नातेसंबंधापेक्षा आपल्या बायकांविषयी ज्या पुरुषांनी जादा ओढ व्यक्‍त केली त्याविषयीची पवित्र शास्त्रीय उदाहरणे द्या.

१० द इंडीविजूअल, मॅरेज ॲण्ड द फॅमिली हे पुस्तक म्हणते: “र्सव समाजात आणि समाजातील सर्व घटकात वैयक्‍तिकाची सर्वसाधारण गरज अशी असते की आपण कोणाचे तरी असावे व आपल्यासारखाच कोणीतरी आपल्याला मिळावा.” ही गरज, अर्थातच यहोवाने स्थापिलेल्या कुटंबीय व्यवस्थेमार्फत पुरी होते. (इफिसकर ३:१४, १५) तरीपण, सैतान, आपणाला आपल्या कौटुंबिक सदस्यांविषयीची जी ओढ वाटत असते त्याचा दुरूपयोग करवितो. आदामाला आपल्या बायकोविषयीची जी प्रबळ ओढ होती त्यानेच त्याला दुष्परिणामाकडे कानाडोळा करावयास व तिच्यासोबत बंडात सामील होण्यास चिथावले. (१ तिमथ्यी २:१४) शिवाय शलमोनाबद्दल काय? त्याला अप्रतिम असे सूज्ञान होते तरी, “शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे अंतःकरण अन्य देवांकडे वळविले. त्याचा बाप दावीद याचे अंतःकरण यहोवाकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे . . . यहोवाच्या दृष्टीने जे वाईट ते शलमोनाने केले.”—१ राजे ११:४–६.

११. एलीने ‘यहोवापेक्षा आपल्या पुत्रांचा जादा सन्मान कसा केला?’

११ इस्राएलाचा प्रमुख याजक वृद्ध एली तुम्हाला आठवतो ना? त्याचे हफनी व फिनहास हे मुलगे “अधम” होते व “त्यांना यहोवाची ओळख नव्हती.” यहोवास अर्पिल्या जाणाऱ्‍या यज्ञार्पणाच्या बाबतीत या दोघांनीही फारच कटु अनादर दाखविला व शिवाय “दर्शनमंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी . . . कुकर्म केले.” एवढे असतानाही एलीने त्यांना फारच सौम्य व मिळमिळीत उपदेश दिला (“तुम्ही असली कुकर्मे का करिता?”), आणि त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची कसलीही हालचाल केली नाही. याकरवी एकंदरीत त्याने ‘यहोवापेक्षा आपल्या पुत्रांचा जादा सन्मान केला’ व याचा परिणाम त्याच्या स्वत:चा व मुलांचा मृत्यू होण्यात दिसला!—१ शमुवेल २:१२–१७, २२, २३, २९–३४; ४:१८.

१२. (अ) कुटुंबाच्या लागेबांध्याविषयी येशूने कोणता इशारा वदविला? (ब) नातेवाईकांचा विचार येतो तेव्हा काहींना कोणते ऐहिक मत अनुसरण्याची इच्छा होते, पण हे शास्त्रवचनीय दृष्टया योग्य आहे का?

१२ अशाप्रकारे, वेगळ्‌या दिशेकडे वाहवणारी निष्ठा तुम्हाला जीवनाच्या शर्यतीतून मागे खेचू शकते हे स्पष्ट आहे. येशूने आपल्या शिष्यांना म्हटलेच होते: “जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर वा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर वा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही.” (मत्तय १०:३७; लूक १४:२६) पण तेच, आम्हास प्रिय असणाऱ्‍या कोणा एकाने सत्य सोडून दिले वा त्याला बहिष्कृत केले गेले तर काय? अशा वेळी ‘रक्‍ताच नातं अतूट असतं’ या ऐहिक मताचे अनुकरण करून तुम्हीही आपल्या नातेवाईकासोबत नाशाकडे नेणारा मार्ग पत्कराल का? किंवा स्तोत्रसंहिता २७:१० मधील वचनावर आपला विश्‍वास व्यक्‍त कराल, जे म्हणते की, “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी यहोवा मला जवळ करील”?

१३. कोरहपुत्रांनी यहोवाला आपली निष्ठा कशी व्यक्‍त केली व याकरता त्यांना कोणता आशीर्वाद मिळाला?

१३ कोरहाच्या पुत्रांठायी असा विश्‍वास होता, त्यांच्या वडीलाने मोशे व अहरोन यांच्या अधिकाराविरूध्द बंड केले. तथापि, यहोवाने कोरह व त्याच्या पुरस्कर्त्यांचा संहार करून, तो मोशे व अहरोनाच्या मागे उभा होता हे नाट्यमयरित्या प्रदर्शित केले. यात “कोरहाचे मुलगे मेले नव्हते.” (गणना १६:१–३, २८–३२; २६:९–११) यांनी बंडात आपल्या बापाबरोबर सहभागिता दर्शविली नाही हे उघड आहे त्यामुळेच त्यांना जिवंत ठेवण्याकरवी यहोवाने त्यांच्या निष्ठेला आशीर्वादित केले. यांच्या वंशजाना कालांतराने पवित्र शास्त्राच्या काही भागांचे लिखाण करण्याचा हक्कही लाभला!—पहा स्तोत्रसंहिता ४२, ४४–४९, ८४, ८५, ८७ व ८८ वरील मथळे.

१४. नातेवाईकाच्या निष्ठेपेक्षा यहोवाला निष्ठा व्यक्‍त केल्यामुळे मिळणाऱ्‍या आशीर्वादाचे कथन एक अनुभव कसे करतो?

१४ आजसुद्धा निष्ठावंतपणा आशीर्वाद आणतो. एका युवक साक्षीदाराला आठवते की त्याची आई जी बऱ्‍याच काळापासून ख्रिश्‍चनत्वातून अक्रियाक दशेत गेली होती. तिने जेव्हा व्यभिचारी विवाह पत्करला तेव्हा त्याने व त्याच्या भावांनी कोणती भूमिका घेतली होती. “आम्ही ही बातमी मंडळीच्या वडिलांना कळवली.” असे तो सांगतो, “आणि ती बहुधा घरी नसल्यामुळे आम्ही ठरवले की वडीलवर्गाकरवी या प्रकरणाचा शहनिशा होईपर्यंत आम्ही तिजसोबत येणाऱ्‍या संपर्काला बांध घालावा. ही आम्हाला मोठी प्रयासाची गोष्ट होती.” आईने प्रतिकारात म्हटले: “माझ्यापेक्षा तुम्हाला सार्वकालिक जीवन मोलाचे वाटते का?” याला त्यांनी उत्तर दिले: “यहोवाबरोबरील आमचे नातेसंबंध हे कोणत्याही गोष्टी पेक्षा आम्हाला बहुमूल्य वाटते.” याचा त्या स्त्रीवर खूप परिणाम होऊन प्रामाणिक रूपाचा पश्‍वाताप व्यक्‍त करण्यात प्रत्यय घडला, तिला आध्यात्मिकदृष्टया परत सावरले गेले व आता ती पुन्हा सुवार्तेची क्रियाशील प्रचारक या अर्थी सेवा सादर करीत आहे.

१५. (अ) काही पालकांनी आपल्या मुलांनाच स्वतःच्या मार्गातील अडखळण कसे होऊ दिले? (ब) जीवनप्राप्तीसाठी पालक स्वतःची व आपल्या मुलांची कशी मदत करू शकतात?

१५ काहींनी आपल्या मुलांनाच स्वतः समोर अडखळण बनू दिले. युवकांच्या “हृदयी मूर्खता जखडलेली असते” या गोष्टीची जाण न राखल्यामुळे काही पालकांनी आपल्या मुलांना जगातील सवंगड्याबरोबर घनिष्ठ संबंध राखण्यास, कंटाळवाण्या सामाजिक कार्यक्रमाला जाण्यात आणि अद्याप लग्नाचे वयही नाही तोच विरूद्ध लिंगी व्यक्‍तीसोबत गाठीभेटी करण्याची मुभाही दिली. (१ तिमथ्यी १:१९) काही तर आपल्या मुलांच्या गैरवर्तणुकीस झाकून त्यांच्या चुकीची गंभीरता दुपटीने वाढवतात. (नीतीसूत्रे ३:३२; २८:१३) तथापि, पवित्र शास्त्रीय तत्वांना निष्ठावंतपणे चिकटून राहिल्यामुळे पालक स्वतःकरता व आपल्या मुलांसाठी जीवनाच्या बक्षिसाची प्राप्ती करण्यात मदत करतात.—१ तिमथ्यी ४:१६.

तुमचे मित्र—“सूज्ञ” की “मूर्ख”?

१६. (अ) आमचे मित्र प्रभावकारी कसे ठरतात? (ब) मित्रांच्या प्रभावाच्या आहारी खासपणे कोण जाते, व का?

१६ सोशिऑलॉजी: ह्‍युमन सोसायटी हे पुस्तक परीक्षण करते: “आपल्याला जवळचा आणि आपल्या दर्जानुरूप असणारा कोणी मित्र असावा ही भावना आज प्रखर दबाव राखून आहे.” ॲडोलेसेन्स पुस्तक दाखविते की खासपणे युवक अशा दबावाच आहारी जातात. ते म्हणते: “आपल्या शरीरात जाणवू लागणारे बदल, स्वत:ची विचारधारा आणि कुटुंबाशी असणारे नाते” या गोष्टी याला कारणीभूत आहेत, “याचा परिणाम हा दिसतो की ज्वानीतील युवक, आपल्या कुटुंबियापेक्षा आपल्या मित्रांसोबत अधिक वेळ खर्च करताना दिसतात.”

१७. (अ) नीतीसूत्रे १३:२० मध्ये लिखित असणाऱ्‍या शब्दांची सत्यता विदारीत करा. (ब) कोणत्या मित्रांना “सूज्ञ” म्हणावे लागेल? (क) तरूण शमुवेलाचे उदाहरण आजच्या युवकांना कसे अनुसरता येईल?

१७ याकरताच नीतीसूत्रे १३:२० मधील शब्दाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ते म्हणतात: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सूज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” एका ख्रिस्ती मुलीने कबुली दिली: “शाळेमध्ये असणारी सर्व तऱ्‍हेची वाईट संगत आता मजवर वर्चस्व करू पहात आहे. आज शाळेत शाप्पोचरणाचा एक शब्द मुखावाटे बाहेर येत असतानाच त्याला मी धरले. . . . मी तो उच्चारण्याच्या बेतात होते, पण बोलले नाही ते बरे झाले.” तथाकथित मित्रांनी काही ख्रिस्ती युवकांना गंभीर अशा वाईट कृत्यात समाविष्ट केले हे फार दुःखाचे आहे. पण बक्षीसाची प्राप्ती मिळविण्याची आकांक्षा बाळगणारे तुम्ही युवक आहात तर आध्यात्मिक मनोवृत्तीच्या, शुद्धाचरणी, भाषणात उभारणीकारक गोष्टी बोलणाऱ्‍या सूज्ञ मित्रांचा शोध घ्या. तरूण शमुवेलाने एलीच्या वाईट पुत्रांची मैत्री धरली नाही हे लक्षात घ्या. तो “यहोवाची सेवा करीत” राहण्यात मग्न राहिल्यामुळे त्यांची भ्रष्टता त्याला बाधली नाही.—१ शमुवेल ३:१.

बक्षीस मिळवा!

१८. (अ) काही बंधूजन आमची जीवनाची धाव अनपेक्षितरित्या कशाप्रकारे मंदावू शकतील? (ब) अशा या अहितकारक प्रभावापासून कोणती गोष्ट आम्हाला संरक्षण देईल?

१८ यास्तव, जे तुम्हाकडून जीवनाचे बक्षीस हिरावून घेऊ इच्छितात त्या सर्वांबद्दल दक्ष असा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या बांधवास साशंक नजरेने पहावे. कधी कधी कोणी बंधू त्याच्या मनात नसतानाही असे काही बोलून जाईल, जे तुम्हाला दुःखी करील. (‘तुम्ही हा हट्ट का धरता? जीवन फक्‍त तुम्हालाच मिळेल असं तुम्हाला वाटत का?’) तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांविषयी ते कदाचित कटु मत दर्शवितील. (‘तुम्हाला कुटुंब आहे तर पायनियरींग कशी जमेल तेच मला कळत नाही. तुमच्या मुलांच्या दृष्टिकोनात बघता ही गोष्ट योग्य वाटत नाही.’) तरीपण येशूने पेत्राचा, ‘एवढी घाई होऊ देऊ नका’ हा सल्ला कसा त्याज्य मानला ते लक्षात घ्या. (मत्तय १६:२२, २३) पवित्र शास्त्राकरवी प्रशिक्षित असणाऱ्‍या तुमच्या कानांना “शब्दांची पारख” करू द्या आणि ज्यात सत्य नाही अशा शब्दांनी स्वतःला भारावू देऊ नका. (इयोब १२:११) पौलाने जे म्हटले ते धान्यात ठेवा की, “जर कोणी मल्लयुद्ध करतो तर ते नियमांप्रमाणे केल्यावाचून त्याला मुगूट घालीत नाहीत.” (२ तिमथ्यी २:५) होय, तुमच्या विचाराला अशास्त्रीय विचारांनी नव्हे तर देवाच्या “नियमांनी” मार्गदर्शन द्यावे.—पडताळा १ करिंथकर ४:३, ४.

१९, २०. (अ) योसेफाच्या भावांनी त्याला इजा करण्याचा कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या निर्दयतेबद्दल योसेफाने कसा प्रतिकार व्यक्‍त केला? (ब) अपूर्ण मानवाकरवी स्वतः अडखळविले जाण्याचे आम्ही कसे टाळू शकू? (क) बक्षीसाविषयीचा आमचा निर्धार काय असावा व का?

१९ कधी काळी कोणी ख्रिस्ती सहकारी आपल्या अविचारी शब्दांनी तुम्हाला ‘भोसकण्याची’ शक्यता आहे. (नीतीसूत्रे १२:१८) हे तुम्हाला जीवनाची धाव सोडून द्यायला प्रवृत्त करणारे न ठरो! योसेफाची आठवण ठेवा. त्याच्या स्वतःच्या भावांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला आणि जेव्हा तो पुरा होऊ शकला नाही तेव्हा त्यांनी त्याला निष्ठुरतेच्या दासपणाकरता विकून टाकले. तथापि, योसेफाने स्वतःला या करवी चिडचिडा होऊ दिले नाही आणि “यहोवावर रूष्ट” होऊ दिले नाही. सूड घेण्या ऐवजी त्याने त्यांना आपली मनोवृत्ति बदलली आहे हे प्रदर्शित करण्याची संधि दिली. त्यांचा पश्‍चाताप बघून “सर्व भावांचे मुके घेऊन त्यांच्या गळा पडून तो रडला.” याकोबाने त्याच्याबद्दल नंतर म्हटले: “तिरंदाजांनी [योसेफाच्या मत्सरी भावांनी] त्यास त्रस्त केले, त्यास बाण मारिले, त्याचा पिच्छा पुरवला.” तरी योसेफाने त्यांच्या द्वेषाचा मोबदला दयाळूपणात व्यक्‍त केला. या अनुभवाकरवी गलित होण्याऐवजी “त्याचे भुज स्फुरण पावले.”—उत्पत्ती ३७:१८–२८; ४४:१५–४५:१५; ४९:२३, २४.

२० अशाप्रकारे, अपूर्ण मानवाकरवी स्वतःला अडखळवू देण्याऐवजी “बक्षीस मिळेल असे” धावत राहा! योसेफाप्रमाणेच तुम्हावरील परिक्षाप्रसंग तुम्हाला गलित करण्यापेक्षा दृढ बनवो. (पडताळा याकोब १:२, ३) तुमची देवावरील प्रीती इतकी मजबूत असल्याचे दिसून येवो की कोणीही मानव तुम्हाला अडखळण बनू शकणार नाही. (स्तोत्रसंहिता ११९:१६५) ज्याचे वर्णन होऊ शकणार नाही व ज्याचे आकलन करता येणार नाही असे अभूतपूर्व सार्वकालिक जीवनाचे बक्षीस यहोवा तुम्हापुढे धरून आहे हे ध्यानात घ्या. कोणीही माणूस तुम्हाला त्यापासून मुकवण्यास समर्थ न ठरो!

तुम्हाला आठवते का?

◻ अचूक ज्ञान ख्रिश्‍चनांना का मोलवान आहे?

◻ जीवनप्राप्ती पासून परावृत्त करणारे माणसाचे भय एखाद्याला कसे मात करता येईल?

◻ स्वतःचे कुटुंबच अडखळण कसे बनू शकते?

◻ सह ख्रिश्‍चनांच्या निराशाजनक तसेच इजात्मक शब्दांबद्दल ख्रिश्‍चनाने कसा प्रतिसाद दाखवावा?

[११ पानांवरील चित्र]

आपली मने व अंतःकरणे अचूक ज्ञानाने भरवून आम्हाला चुकीच्या कल्पनांचे खंडण करता येईल

[१३ पानांवरील चित्र]

माणसाची भीती वाटल्यामुळे पेत्राने येशूला नाकारले. नंतर प्रेषिताने या भयावर मात केली. असेच सर्व ख्रिश्‍चनांनीही केले पाहिजे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा