खरी भक्ती—मनुष्य निर्मित किंवा देवाने प्रकट केलेली?
बहुदा मानवास ज्ञात असणारे सर्व त्याला त्याच्या स्वतःकरीता शोधून काढावे लागले.
ज्ञानाचा बहुतेक मुलभूत अंश—अन्नधान्य पिकवावे व ते शिजवावे कसे, डोक्यावर सावली कशी करावी—हे सर्व कष्टमय चांचणी व चुकांनी साध्य झाले. परंतु मानवाने त्याची कौटुंबिक गरजांची मर्यादा जलदाईने त्यापलिकडे विशाल केली असल्याचे गत शतकात दिसून आले. तो आता अणुचे विभाजन करु शकतो, आवाजाच्या गतिपेक्षा अधिक वेगाने उड्डाण करू शकतो—शिवाय तो मानवास नियमितपणे अंतराळात पाठवितो. तथापि, याचा अर्थ मनुष्य, त्याने देवाची भक्ती स्वतः चांगल्या रीतिने कशी करावी हे ठरविण्यास लायक आहे का?
स्तोत्रसंहिता १४३:१० च्या लेखकानुसार नाही, तो म्हणतो: “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव; कारण तू माझा देव आहेस. तुझा आत्मा उत्तम आहे; तो मला नितीमानांच्या भूमीत घेऊन जाऊ दे.” अशाप्रकारे मानवास काही कसब व कौशल्य ज्ञात झाले तरी देवाची इच्छा जाणण्यास इश्वरी मदतीची गरज आहे हे स्तोत्रकर्त्याने ओळखले. (यिर्मया १०:२३ पडताळा.) याचा अर्थ, देवाने त्याला स्वतःस कोणा ना कोणा प्रकारे मानवापुढे प्रकट केले पाहिजे असा होईल.
अशा गोष्टी घडल्या आहेत का? लाखोंच्या साठी असे इश्वरी प्रकटीकरणाचे प्रसंग अगोदरच घडले आहेत याचा पुरावा पवित्रशास्त्र देते. तथापि इतर सहमत दाखवित नाहीत. ते मानवाच्या चातुर्याने इतके भारावले आहेत की ते अशा प्रकटीकरणाची गरज पाहत नाहीत. हे जन दावा करतील की धार्मिक ज्ञान “प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मतः” आहे किंवा अशाप्रकारचे ज्ञान “प्रकटीकरणाद्वारे अगर कोणत्याही चर्च शिकवणी” विना “बुद्धीचा उपयोग करून प्राप्त करता येवू शकते.”
तथापि हे सत्य आहे तर याचा परिणाम मानवाने त्याचा स्वतःचा धर्म शोधून काढावा, त्याची स्वतःची तत्वप्रणाली व नैतिक दर्जा विकसित करावा असा व्हावयास हवा. हे तुम्हास समजुतदारपणाचे दिसते का? मनुष्य–निर्मित धर्म कोणता उद्देश राबवील? वस्तुतः त्याला मानवाच्या आध्यात्मिक गरजांची पुर्ती करणे शक्य होईल का? (मत्तय ५:३) सत्य–शोधक व्यक्ती देवाविषयी विचारतात त्या प्रश्नांची तो उत्तरे देवू शकेल का?
मानवी तर्काने व तत्वज्ञानाने देवाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारा धर्म—हिंदू विश्वासावर लक्ष टाकून या प्रश्नांचा पूर्ण अभ्यास करू या.