मनुष्य-निर्मित धर्म—खरोखरी तृप्ती करु शकेल काय?
हिंदू धर्मास सुमारे ४५,००,००,००० लोक कवटाळून आहेत. हिंदू तत्ववेत्ते डॉ. एस. राधाकृष्णन म्हणतात: “धर्म हा कांही आम्हास विश्वासाने गाठता येईल असे फार मोठे प्रकटीकरण नाही, पण तो मानवाच्या अस्तित्वाच्या रहस्याचे मूळ उलगडण्याचा प्रयत्न आहे.” ते पुढे म्हणतात: “निसंशयपणे, मानव सर्व गोष्टीचे परिमाण आहे.”
कोणतेही केंद्रिय संघटन हिंदू भक्तावर नियंत्रण करीत नाही की तेथे भक्तीची विशिष्ट पद्धत ही नाही. त्यांच्याजवळ पवित्रशास्त्राप्रमाणे त्यांच्या विश्वासाचे उगम दाखविणारे कोणतेही एकमेव पुस्तक नाही. पुष्कळ शतकापासून हिंदू लिखाणाची विशाल मालिका सामोरी आली व हिंदू तत्वज्ञानाच्या वेगवेगळया सहा शाळा सामोऱ्या आल्या: न्याय (तर्कशास्त्र), वैशेशिका (पदार्थविज्ञान शास्त्र), संख्या (पंचतत्वांचा संयोग), योगा (देवत्वासोबत मिलन), मिमांसा (चौकशी), व वेदान्ता (वेदाची पूर्णता).
या तत्वज्ञानाचा विकास वेगवेगळया काळात व समयातील पुष्कळ हिंदू गुरुंनी केला व प्रत्येकाने भक्तीसाठी भिन्न पवित्र्याचा उपयोग केला. न्यायने तिच्या भागात अनुमानाने देवाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तर्कशास्त्राचा क्लिष्ट उपयोग केला आहे (उदाहरणार्थ, वाऱ्याची वास्तविकता झाडाच्या सळसळण्याद्वारे सुचते).
स्पष्टपणे या पवित्र्यास कांही सबळता आहे, कारण पवित्रशास्त्र त्याप्रमाणाचे म्हणते: “त्याचे अदृष्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही सृष्टीच्या निर्मितीपासूनच निर्मिलेल्या पदार्थावरुन ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.” (रोमकर १:२०) तरीसुद्धा तर्कशास्त्राची ही पद्धत वास्तविकपणे तुम्हास देवासोबत परिचित करते का? अशाप्रकारची पद्धत त्याचे नाव काय ते प्रकटविते का? विश्वाचा प्रारंभ किंवा दुष्ट व त्रासांना का परवानगी दिली आहे ते स्पष्ट करु शकेल का? ते तुम्हास भवितव्याची समाधानकारक आशा देईल काय? सत्य प्रकटविणारा की मनुष्य निर्मित, कोणता धर्म या प्रश्नांची उत्तरे समाधानकारकरित्या देतो ते पाहू या?
मानवी शिक्षणाविरुद्ध पवित्रशास्त्र
हिंदूनी त्यांचे विशेष लक्ष देवाच्या स्वाभाविकतेकडे दिले आहे. उदाहरणार्थ, वेदान्ता तत्वज्ञान ज्याच्या कल्पना उपनिषेद म्हटल्या जाणाऱ्या धार्मिक लिखाणावर आधारित आहे. ही लिखाणे देवाची स्वाभाविकता व मानवासोबतच्या त्याच्या नातेसंबधाची पृच्छा करतात.
तथापि पवित्रशास्त्र देवाबाबतची अंतर्दृष्टी देण्यात वरचढ ठरते वे ते ती स्पष्टपणे व सुसंगतपणे करते. ते त्याची सर्व गोष्टीचा निर्माणकर्ता म्हणून ओळख देते. (प्रकटीकरण ४:११) त्याचे वर्णन एक व्यक्ती म्हणून देते पण ते कांही नामविरहीत शक्ती म्हणून स्पष्ट करीत नाही. “ही सगळी यहोवाच्या नामाचे स्तवन करोत; कारण केवळ त्याचेच नाम उच्च आहे; त्याचे ऐश्वर्य पृथ्वी व आकाश यांच्यावर आहे” असे पवित्रशास्त्र स्तोत्रसंहिता १४८:१३ मध्ये म्हणते. त्याचे वर्णन “दयाळू व कनवाळू देव, दयेचा व सत्याचा सागर” असे केले आहे. (निर्गम ३४:६) तो अपूर्ण मानवास त्याला जागण्यास वे त्याजसोबत नातेसंबध जोडण्यास आमंत्रण देतो! (स्तोत्रसंहिता ३४:८) तत्वज्ञानिक विचारतर्कापेक्षा पवित्रशास्त्र देवाबाबत पुष्कळसे समाधानकारक असे सांगत नाही का?
उपनिषेद ही मानवी जीवाच्या घडणीचा मागोवा घेतात. तथापि पवित्रशास्त्र उघडपणे स्पष्ट करते की “यहोवा देवाने मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाक–पुडयात जिवनीश्वास फुंकला व मनुष्य जीवधारी झाला.” (उत्पत्ती २:७) यास्तव मनुष्य जीव आहे—तो कांही छाये समान असणाऱ्या आत्म्याचा ज्यास वारंवार पुनर्जन्माचा अनुभव येतो त्याचा धारक नाही. हा जीव अमर नाही. पवित्रशास्त्र म्हणते, “जो जीव पाप करील—तो स्वतः मरेल.”—यहेज्केल १८:४.
उपनिषेद मीपणा व अहंकाराच्या स्वरुपाचे परिक्षण करण्याचा प्रयत्न करतात. तथापि पवित्रशास्त्रच केवळ मनुष्याच्या समजबुद्धीची, त्याचा पापी स्वभाव उघड करुन समज देते. “कारण सर्वानी पाप केले आहे व ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) याच्या परिणामात मनुष्यास वाईट प्रबळ इच्छेचा सात्यत्याने सामना करावा लागतो.—रोमकर ७:२०, २५.
उपनिषेद दुष्टाई व खंडणी सत्यतेच्या प्रश्नाविषयी संशोधन करतात. तथापि पवित्रशास्त्र स्पष्ट करते की या पृथ्वीवरील दुष्टता मानवाने स्वतंत्र मार्ग चोखाळण्याची जी निवड केली त्याचा परिणाम आहे. “पहा! एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.” (उपदेशक ७:२९) शास्त्रवचने दुष्टांच्या सरतेशेवटच्या भरपाईबाबत म्हणतात: “तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल: गौरव, सन्मान ही मिळविण्याचा प्रयत्न करितात, त्यांना तो सार्वकालीक जीवन देईल . . .; परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानितात त्यांच्यावर क्रोध व कोप, संकट व क्लेश ही येतीळ . . . कारण देवाजवळ पक्षपात नाही.”—रोमकर २:६–९, ११.
उपनिषेद तारणाचा मार्ग स्पष्ट करण्याचा अटीतटीचा प्रयत्न करतात. त्याचवेळी पवित्रशास्त्र साधेपणात म्हणते: “तारण यहोवा कडून आहे.” (स्तोत्रसंहिता ३:८) यहोवाचा मार्ग अनुसरणाऱ्यांना अभिवचन दिले आहे: “धार्मिक पृथ्वीचे वतन पावतील, तीत ते सर्वकाळ वास करतील.”—स्तोत्रसंहिता ३७:२९.
मानवी तर्क विद्वान गोंधळात पडतील अशा प्रश्नांची उत्तरे पवित्रशास्त्र साधी, सडेतोड, समजेल अशी देते. कोणीही तत्त्ववेत्ता स्वतःहून त्या उत्तरांचे विश्लेषण करु शकणार नाही.
पवित्रशास्त्र—देवापासूनचे प्रकटीकरण?
पवित्रशास्त्र देवापासूनचे प्रकटीकरण म्हणून तुम्ही भाव ठेवावा असा याचा अर्थ आहे का? तुम्ही तसा भाव ठेवण्यासाठी तेथे पुष्कळ कारणे आहेत.
सर्वप्रथम हे गृहीत धरणे वाजवीपणाचे ठरेल की देव स्वतःस मानवापुढे कोणत्या ना कोणत्या मार्गी व्यक्त करु शकेल. कोणी मनुष्य लेकरांना जन्म देतो व नंतर त्यांना सोडून पळून जातो अशा मनुष्याविषयी तुम्हास काय वाटेल? अशा मनुष्याने त्याच्या स्वतःबाबत त्यांना पूर्णपणे अज्ञान ठेवले, त्यांच्यासाठी त्याचे नावही राखले नाही तर काय? त्याजविषयी तुम्ही क्रोधाविष्ट होणार नाही का? तर मग, प्रेमळ देव त्याच्या पृथ्वीवरील लेकरांना स्वतःस कोणा ना कोणा मार्गी व्यक्त करील असा निष्कर्ष काढणे उचित होणार नाही का?
तुम्ही कदाचित विचाराल: ‘परंतु त्याने ते एखाद्या पुस्तकामार्फत का करावे?’ ‘सर्वसमर्थ देवाने कांही नाट्यमय—कदाचित आकाशवाणी उपयोगात आणू नये का? देव आकाशातून पुष्कळ वेळा, त्याने दहा आज्ञा दिल्या त्यावेळी बोलला होता. त्यावेळी लोक त्या नैसर्गिक अभुतपूर्व चमत्काराने इतके भयभीत झाले होते की त्यामुळेच त्यांनी मोशास विनंती केली की, “देव आम्हा सोबत न बोलो, तो बोलला तर आम्ही मरू.” यास्तव यहोवा मोशेसोबत बोलत होता तेंव्हा ते दूर अंतरावर उभे राहिले होते. (निर्गम २०:१८–२२)a परंतु देवाने बोललेले ते शब्द मोशे कदाचित विसरु शकला असता. यासाठीच यहोवाने सुज्ञपणे त्याचे शब्द लिहून जतन करण्यासाठी मोशे व नंतर विश्वासू पुरुषांना निवडले. (निर्गम ३४:२८) अशाप्रकारे लोक त्यांच्या मोकळ्या वेळात देवाचे विचार वाचू शकतात. देवास काय म्हणावयाचे आहे त्यावर ते विचार, मनन व अभ्यास करु शकतात.—यहोशवा १:८; तसेच १ तिमथी ४:१५ पाहा.
हे सत्य आहे की हिंदू लिखाणे मानवांनी लिहीली त्याप्रमाणेच पवित्रशास्त्र ही मानवांनीच लिहीले. परंतु पवित्रशास्त्र लिहीणारे मानव यहोवा देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली होते. (२ पेत्र १:२१) त्यांची लिखाणे केवळ तत्व ज्ञानाचे अर्क नव्हते. पवित्रशास्त्रात इश्वरी मार्गदर्शनाची आगळीच चिन्हे आहेत. देवाच्या मार्गदर्शनाशिवाय, आणखी कशानेही, पवित्र शास्त्र लिखाणात, पृथ्वीवर जीवन कसे अस्तित्वात आले त्याचा क्रम इतक्या अचूकपणे लिहिता येणे जमले असते का? (उत्पत्ती अध्याय १) पवित्र शास्त्राने २,७०० पेक्षा अधिक वर्षांपूवी, पृथ्वी ही नुसतीच गोलाकार नसून ती “निराधार टांगली आहे” हे जे अचूकपणे म्हटले ते देवाच्या मार्गदर्शनाविना आणखी कशानेही वदविता येणे जमले असते का? (इयोब २६:७; यशया ४०:२२) यशया ४४:२८ सारख्या भविष्यवादामध्ये पारशी विजेता थोर कोरेश याचा जो बिनचूक उल्लेख त्याच्या जन्मापूर्वी १३० वर्षाअगोदर पवित्रशास्त्रात करण्यात आला तो इश्वरी मार्गदर्शनाशिवाय आणखी कशाने तरी होऊ शकला असता का? आज जगाच्या रंगमंचावर उभ्या असणाऱ्या दोन महान अशा प्रतिस्पर्धी सत्तांचा उद्भव होईल हे कोणा मानवाला २,५०० वर्षाअगोदर भाकित करणे जमले असते का?—दानिएल ११:२७, ३६–४०.
अशाप्रकारे, पवित्रशास्त्रावर देवाच्या इच्छेचे प्रकटीकरण म्हणून विश्वास ठेवण्याची भक्कम कारणे आहेत. आम्ही तुम्हास त्याला काय म्हणावयाचे आहे याचे मनमोकळ्यापणाने परिक्षण करण्यासाठी आमंत्रण देतो. हे करण्यास वैयक्तीकांना मदत करण्यास यहोवाचे साक्षीदारांना आनंद वाटेल. अशामार्गी तुमची भक्ती मानवी सुज्ञतेचा पाठलाग करीत निरर्थक बनणार नाही. (मत्तय १५:९) किंवा तुम्ही पुर्वीच्या शमरोन्यासारखे “त्यांना ठाऊक नाही” अशांची भक्ती करणारे होणार नाही. (योहान ४:२२) देवाच्या आत्म्याच्या मदतीने तुम्हास “देवाचे गूज” कळून येवू शकेल. (१ करिंथकर २:१०) “तुम्ही त्याचा शोध कराल तर तो स्वतःहून तुम्हास पावेल.”—२ इतिहास १५:२.
[तळटीपा]
a तसेच निर्गम ३३:११; मत्तय ३:१७; १७:५; योहान १२:२८ पहा.
[५ पानांवरील चित्रं]
लाखो आज मानव निर्मित धर्मांस कवटाळून आहेत, पण या धर्मांनी देवाबद्दलच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत का?
[६ पानांवरील चित्रं]
पवित्रशास्त्र पृथ्वी केवळ गोल आहे एवढेच नव्हे तर ती “निराधार” टांगली आहे असेही म्हणते. हे त्यास ईश्वरी प्रेरणा आहे हे पटवीत नाही का?