येशूचे जीवन व उपाध्यपण
गर्भवती पण अविवाहीत
मरिया तीन महिन्यांची गर्भवती आहे, तिच्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात ती अलिशिबेला भेटावयास गेली होती हे तुम्ही जाणून आहात. पण आता ती नासरेथ येथील घरी परत आली आहे. तिची अवस्था गावामध्ये लवकरच प्रसिद्ध होईल. खरोखर, ती खूप त्रस्त स्थितीत आहे!
मरियेची योसेफ नांवाच्या सुताराला लग्नासाठी मागणी झाली होती त्यामुळे तिची परिस्थिती अधिकच वाईट झाली आहे. देवाच्या नियमानुसार इस्राएलात जर एखादी स्त्री अशी वाग्दत्त असता कोणा पुरुषाशी तिने लैंगिक समागम केला तर तिला मरेपर्यंत दगडमार करीत हे तिला माहित होते. मग योसेफासमोर तिला आपले गरोदरपण कसे स्पष्ट करता येईल?
मरिया तीन महिने दूर होती त्यामुळे तिला परतलेली पाहण्यास योसेफ केवढा आतुर झाला असेल याची आम्हाला कल्पना करता येईल. जेव्हा ते ऐकमेकांस भेटतात तेव्हा मरिया ही बातमी त्याला सांगते. तसेच ती, आपण देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती झालो आहोत हे समजावण्याचा खूप प्रयत्न करते. पण या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास योसेफाला किती कठिण वाटत असेल याची कल्पना तुम्ही करु शकाल.
मरिया सद्र्गिणी आहे हे योसेफाला ठाऊक आहे. शिवाय ती त्याला खुप आवडते. पण आता तिने त्याला सर्व काही खुलासेवार सांगितले तरी हा गर्भ कोणा पुरुषाकडून राहिला असे त्याला वाटायला लागते. तथापि, ती दगडमाराने मरावी अथवा लोकांसमोर तिची बेअब्रु करावी अशी त्याची इच्छा नाही. त्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा विचार त्याच्या मनात येतो. त्या दिवसांत, लग्नासाठी वचनबद्ध झालेल्या व्यक्ती जणू विवाहबद्ध आहेत असे समजले जाई. त्यामुळे घटस्फोट हा या वचनबद्धतेचा अंत करी.
नंतर योसेफ यावर विचार करीत असताना झोपी जातो. यहोवाचा देवदूत त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हणतो, “तू मरियेचा आपली पत्नि म्हणून स्वीकार करण्यास अवमान करु नको, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, आणि त्याचे नांव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारील.”
जेव्हा योसेफ झोपेतून उठतो, तेव्हा त्याला केवढे हायसे वाटते! वेळ न दवडता देवदूताने आज्ञापिल्याप्रमाणे तो सर्व काही करतो. तो मरियेचा स्वीकार करुन आपल्या घरी आणतो. ही जाहिर हालचाल विवाह विधीची सूचकता देते व हे सांगते की आता योसेफ व मरिया कायदेशीररित्या विवाहबद्ध झाले आहेत. तरीपण मरियेला पुत्र होईपर्यंत तो तिच्याशी शारीरिक समागम करीत नाही.
पाहा, मरियेच्या शरीराचा भार मुलामुळे वाढला आहे. तरीपण योसेफ तिला गाढवावर बसवितो. ते कोठे जात आहेत आणि मरिया बाळकास जन्म देण्याच्या स्थितीत असतानाही ते हा प्रवास का करीत आहेत? लूक १:३९–४१, ५६; मत्तय १:१८–२५; अनुवाद २२: २३, २४.
◆ मरिया गर्भवती आहे हे ऐकून योसेफाची मानसिक स्थिती कशी बनली? आणि का?
◆ अजून लग्न झाले नसले तरीही योसेफ मरियेला कसा घटस्फोट देऊ शकत होता?
◆ योसेफ व मरिया अधिकृतरित्या विवाहबद्ध झाले आहेत हे कोणत्या सार्वजनिक हालचालीमुळे दिसून आले?