भाग १
कुलप्रमुखांच्या काळापासून न्यायाधीशांच्या काळापर्यंत
छापील आवृत्ती
या भागात, जवळजवळ २,२०० वर्षांच्या काळात होऊन गेलेल्या काही व्यक्तींच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट कुलप्रमुख हनोखची आहे. त्याच्या काळापर्यंत आदाम जिवंत होता. आणि शेवटची गोष्ट, शमुवेल संदेष्ट्याची आहे. त्यानेच इस्राएलच्या पहिल्या राजाचा अभिषेक केला. हनोख आणि शमुवेल संदेष्ट्याच्या मधल्या काळात अशा बऱ्याच व्यक्ती होत्या ज्यांनी कमालीचं धैर्य दाखवलं. जसं की नोहा, अब्राहाम, सारा, मोशे, राहाब, दबोरा आणि गिदोन. यांच्यापैकी काहींनी, बरेच धोके असलेला लांबचा खडतर प्रवास केला. तर इतर काही जण मोठ्या धाडसाने ‘यहोवाच्या लढाया लढले.’ या सगळ्यांचं आपल्या देवावर प्रेम असल्यामुळे त्यांनी मोठ्या धैर्याने त्याच्याकडून मिळालेल्या नेमणुका पार पाडल्या.