वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg अध्या. २० पृ. ९४-९७
  • कमजोर स्थितीतही त्याने धैर्य दाखवलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कमजोर स्थितीतही त्याने धैर्य दाखवलं
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संशोधन करा
  • शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा
  • मनन करण्यासाठी
  • आणखी शिका
  • शमशोनप्रमाणे यहोवावर भरवसा ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • यहोवा शमशोनला शक्‍तिशाली बनवतो
    बायबलमधून शिकू या!
  • सर्वात बलवान माणूस
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg अध्या. २० पृ. ९४-९७

२० शमशोन

कमजोर स्थितीतही त्याने धैर्य दाखवलं

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

शमशोनला काहीच दिसत नव्हतं. पण पलिष्टी लोक त्याला टोमणे मारत होते, त्याची थट्टा करत होते ते मात्र त्याच्या कानावर पडत होतं. पण त्याच्यावर ही परिस्थिती का आली होती? कारण यहोवाकडून मिळालेल्या शक्‍तीचं रहस्य सांगायचा मूर्खपणा त्याने केला होता. त्यामुळे त्याच्या शत्रूंनी त्याला पकडून त्याचे डोळे फोडले होते, त्याला बाधून तुरुंगात टाकलं होतं आणि तिथे त्याला गुलामासारखं काम करायला लावलं होतं. आता पलिष्टी लोक त्याच्यावरच नाही, तर त्याच्या देवावर, यहोवावरसुद्धा हसत होते. शमशोनला माहीत होतं की हे सगळं आपल्याच चुकीमुळे झालंय. तसं पाहायला गेलं तर शमशोनने नेहमीच खूप धैर्य दाखवलं होतं. पण या परिस्थितीतसुद्धा तो तसंच धैर्य दाखवणार होता का?

शमशोनने २० वर्षं इस्राएलमध्ये एक न्यायाधीश म्हणून काम केलं होतं. पण इतर न्यायाधीशांपेक्षा तो खूप वेगळा होता. बराक, गिदोन, इफ्ताह यांसारख्या न्यायाधीशांनी युद्धात देवाच्या सैन्यांचं नेतृत्व केलं होतं. पण शमशोन तसा नव्हता. तो स्वतःच एक सैन्य होता! आणि हे त्याने पुन्हापुन्हा दाखवून दिलं होतं. यहोवाने त्याच्या एकट्याचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणात पलिष्टी लोकांचा पराभव केला होता. पण त्याने हे कसं केलं ते जाणून घ्यायला चला थोडं सुरुवातीपासून पाहू या.

देवाच्या सांगण्यावरून शमशोनच्या आईवडिलांनी त्याला एक नाझीर म्हणून यहोवाची सेवा करण्यासाठी समर्पित केलं होतं. त्यामुळे त्याने त्याच्या डोक्याचे केस कधीच कापले नव्हते. जोपर्यंत तो नाझीर म्हणून आपल्या शपथेनुसार जगला तोपर्यंत यहोवाने त्याला विलक्षण शक्‍ती दिली होती. एकदा तर त्याने फक्‍त आपल्या हातांनी एका सिंहाला फाडून त्याचे दोन तुकडे केले होते. यहोवाकडून मिळणाऱ्‍या अद्‌भुत शक्‍तीचा उपयोग करून तो पलिष्ट्यांशी लढला. कारण इस्राएली लोकांवर ते खूप जुलूम करत होते.

एकदा शमशोनला त्याच्या स्वतःच्या लोकांनी भीतीपोटी रश्श्यांनी बांधलं आणि पलिष्टी लोकांच्या हवाली केलं. पण शमशोनने धागा तोडून टाकावा तशा त्या जाड रश्श्या तोडून टाकल्या. मग त्याने गाढवाच्या जबड्याचं हाड घेऊन १,००० पलिष्टी माणसांना मारून टाकलं. पुढे जेव्हा तो गाझा शहरात होता तेव्हा त्याचे शत्रू दिवस उजाडताच त्याला मारून टाकण्याच्या बेताने लपून बसले होते. पण मध्यरात्री तो उठला आणि शहराच्या दरवाजांकडे गेला. त्याने ते भलेमोठे दरवाजे, दोन्ही खांबांसकट आणि अडसरासकट उखडले. मग ते खांद्यांवर घेऊन तो जवळजवळ ६० किलोमीटर चालत हेब्रोनसमोर असलेल्या डोंगरमाथ्यावर गेला!

अशा प्रकारे शमशोनने कितीतरी वेळा पलिष्टी लोकांना हरवलं होतं. त्याने दाखवून दिलं, की यहोवाच्या विश्‍वासू सेवकासमोर दागोन दैवतासारखी पलिष्टी लोकांची दैवतं अगदी दुर्बळ आहेत. पण पलिष्टी लोकांनी त्याला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी एक जबरदस्त डावपेच रचला आणि यासाठी त्यांनी दलीला नावाच्या स्त्रीचा उपयोग केला.

शमशोन दलीलाच्या प्रेमात पडला. पण तिने मात्र त्याचा विश्‍वासघात केला. शमशोनच्या विलक्षण शक्‍तीचं रहस्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी तिने पलिष्टी लोकांकडून लाच घेतली. त्या रहस्याबद्दल ती त्याला सारखीसारखी खोदून विचारत होती. शेवटी वैतागून त्याने तिला ते रहस्य सांगून टाकलं. तो तिला म्हणाला: “माझे केस जर कापले, तर माझी शक्‍ती जाईल आणि मी इतर माणसांसारखाच होईन.” त्यामुळे तो झोपेपर्यंत दलीला वाट पाहत राहिली. तो झोपल्यावर तिने एका माणसाला बोलवून त्याचे लांब केस कापून टाकले. त्या वेळी ‘यहोवाने त्याला सोडून दिलं’ असं बायबल म्हणतं. अशा प्रकारे शमशोनमध्ये पाहिल्यासारखी शक्‍ती राहिली नाही. मग पलिष्टी लोक घाईघाईने आले, त्यांनी त्याला पकडलं आणि त्याचे डोळे फोडले.

त्यानंतर पलिष्टी लोकांनी शमशोनला बंदी बनवून नेलं आणि त्याला त्यांच्यासाठी धान्य दळायला लावलं. हे खूप कष्टाचं काम होतं. एके काळी शक्‍तिशाली असलेला त्यांचा शत्रू आता तांब्याच्या बेड्यांनी जखडलेला फक्‍त एक गुलाम झाला होता. यामुळे पलिष्टी लोकांना खूप आनंद झाला! म्हणून त्यांनी त्यांच्या दागोन देवाचा सन्मान करण्यासाठी एक मोठा उत्सव करायचं ठरवलं. तो दिवस आला तेव्हा एका मोठ्या मंदिरात लोकांनी गर्दी केली. मंदिराच्या छतावरसुद्धा जवळजवळ ३,००० हजार लोक जमले होते. या वेळी पलिष्ट्यांनी त्यांची करमणूक करायला शमशोनला बाहेर आणलं आणि ज्या दोन खांबांवर पूर्ण मंदिर आधारलेलं होतं, त्या दोन खांबांच्या मधे त्याला उभं केलं. इस्राएलचा न्यायाधीश असूनही आपल्याकडून एवढी मोठी चूक झाली होती, या गोष्टीचा त्याला खूप पस्तावा होत होता. शिवाय, आत्तापर्यंत त्याचे केससुद्धा थोडे वाढले होते.

शमशोनने केलेल्या चुकीमुळे त्याला बंदी बनवण्यात आलं, पण आपली चूक सुधारण्यासाठी त्याच्याकडे असलेली शेवटची संधी त्याने सोडली नाही

त्यामुळे त्याने दोन्ही खांबांवर आपले हात टेकवले आणि यहोवाला अशी विनंती केली: “माझी आठवण कर. हे देवा! एकदा, फक्‍त एकदाच मला शक्‍ती दे.” त्याने देवाचा धावा केला आणि तो म्हणाला: “या पलिष्टी लोकांबरोबर माझाही जीव जाऊ दे!” कल्पना करा, शमशोनने आपली सगळी शक्‍ती एकवटून इतका जोर लावला की ते खांब हालू लागले. शेवटी पलिष्ट्यांना काही कळायच्या आतच ते खांब कोसळले आणि संपूर्ण मंदिरसुद्धा कोसळून पडलं. शमशोनने केलेला हा शेवटचा पराक्रम होता. जिवंत असताना शमशोनने देवाच्या जितक्या शत्रूंना मारलं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लोकांना त्याने आपल्या मृत्यूच्या वेळी एका झटक्यात मारलं.

शमशोन दोन खांबांच्या मधे उभा राहून प्रार्थना करत आहे आणि लोकांचा मोठा जमाव त्याची थट्टा करत आहे.

पुढे बऱ्‍याच शतकांनंतर प्रेषित पौलने कमालीचा विश्‍वास दाखवणाऱ्‍या स्त्री-पुरुषांचा उल्लेख केला, तेव्हा त्यात त्याने शमशोनचाही उल्लेख केला. पौलने ‘दुर्बळ स्थितीतून शक्‍तिशाली बनलेल्यांबद्दल’ लिहिलं तेव्हा त्याच्या मनात नक्कीच हा धाडसी न्यायधीश असावा.—इब्री ११:३२-३४.

याबद्दल बायबलमधून वाचा:

  • शास्ते १३:१–१६:३१

चर्चेसाठी:

शमशोनने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?

संशोधन करा

  1. १. मृत शरीरांना स्पर्श करूनसुद्धा शमशोन नाझीर कसा राहू शकला? (टेहळणी बुरूज०५ १/१५ ३० ¶१-३१ ¶१)

  2. २. शमशोनला शहराचे दरवाजे दोन्ही खांबांसकट उखडून गाझापासून हेब्रोनपर्यंत नेण्यासाठी देवाच्या पवित्र शक्‍तीची गरज होती हे कशावरून दिसतं? (टेहळणी बुरूज०४ १०/१५ १५ ¶७-८) १

    शहराचे दरवाजे आणि त्याचे खांब खांद्यावर घेऊन शमशोन खडकाळ जमिनीवरून चढून जात आहे. मागे नकाशात गाझा ते हेब्रोनपर्यंतचं अंतर आणि चढ किती होता ते दाखवलंय.

    चित्र १

  3. ३. दलीला कदाचित इस्राएली असावी असं आपण का म्हणू शकतो? (टेहळणी बुरूज०५ ३/१५ २८ ¶३-wcgr)

  4. ४. ‘कमीतकमी माझ्या एका डोळ्याबद्दल तरी मला पलिष्टी लोकांचा बदला घेऊ दे,’ अशी प्रार्थना शमशोनने का केली? (शास्ते १६:२८; इन्साइट “शमशोन” ¶१०-wcgr)

शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा

  • दबावाखाली असताना शमशोनने दलीलाला गुप्त माहिती सांगितली. यातून मंडळीतले वडील आणि त्यांच्या पत्नी काय शिकू शकतात? २

    कोलाज: १. तीन वडील एका बहिणीला भेटत आहेत. २. नंतर एक वडील घरी चहा घेत आपल्या पत्नीशी गप्पा मारत आहेत.

    चित्र २

  • शमशोनने एक गंभीर चूक केली होती. पण नंतर यहोवाने त्याचा खूप जबरदस्त वापर करून घेतला. आज जर एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीने चूक केली तर शमशोनचं उदाहरण तिला हार न मानता यहोवाची सेवा करत राहायला कसं प्रोत्साहन देऊ शकतं?

  • शमशोनने दाखवलेल्या धैर्याचं तुम्ही तुमच्या जीवनात कसं अनुकरण करू शकता?

मनन करण्यासाठी

  • या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

  • या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?

  • शमशोनचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्याला काय विचारेन?

आणखी शिका

शमशोन आत्तापर्यंतचा सगळ्यात शक्‍तिशाली माणूस का बनला हे आपल्या मुलांना शिकवा.

“पवित्र शक्‍तीने शमशोनला खूप शक्‍तिशाली बनवलं” (बायबलच्या चित्रकथा लेख १४-wcgr)

शमशोनच्या गोष्टीतून आपल्याला आणखी कोणते धडे शिकायला मिळतात?

“शमशोनप्रमाणे यहोवावर भरवसा ठेवा” (टेहळणी बुरूज२३.०९ २-७)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा