वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lmd धडा १०
  • पक्का निश्‍चय करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पक्का निश्‍चय करा
  • लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशूने काय केलं?
  • येशूकडून आपण काय शिकतो?
  • येशूने केलं तसं करा
  • निकदेम याच्याकडून धडा घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • बायबल विद्यार्थ्यांना सत्याची बाजू घ्यायला मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • निकदेमास शिक्षण
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला आपण मदत कशी करू शकतो?—भाग १
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
अधिक माहिती पाहा
लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
lmd धडा १०

शिष्य बनवण्यासाठी

येशू आणि निकदेम रात्रीच्या वेळी अंगणात बसून बोलत आहेत.

योहा. ३:१, २

धडा १०

पक्का निश्‍चय करा

तत्त्व:  “आम्ही तुम्हाला देवाबद्दलचा आनंदाचा संदेशच नाही, तर आमचा जीवही द्यायला तयार होतो, कारण तुम्ही आमच्यासाठी खूप प्रिय बनला होता.”​—१ थेस्सलनी. २:८.

येशूने काय केलं?

येशू आणि निकदेम रात्रीच्या वेळी अंगणात बसून बोलत आहेत.

व्हिडिओ: येशू निकदेमला शिकवतो

१. व्हिडिओ पाहा किंवा योहान ३:१, २ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1. क. निकदेमने येशूला भेटायला रात्रीची वेळ का निवडली असावी?​—योहान १२:४२, ४३ पाहा.

  2. ख. येशू निकदेमला रात्री भेटायला तयार होता, यावरून शिष्य बनवायचा येशूचा पक्का निश्‍चय कसा दिसून येतो?

येशूकडून आपण काय शिकतो?

२. आपलं लोकांवर प्रेम असलं तर शिष्य बनवायचा आपला निश्‍चय पक्का असेल.

येशूने केलं तसं करा

३. बायबल विद्यार्थ्याच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार अभ्यास घ्या. त्याला कदाचित विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट वेळी अभ्यास करायचा असेल. त्याला कदाचित त्याच्या कामाच्या ठिकाणी, घरी किंवा बाहेर कुठेतरी अभ्यास करायचा असेल. असं असेल तर, विद्यार्थ्याच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार त्याच्यासोबत अभ्यास करायला तुम्ही फेरबदल करायचा पुरेपूर प्रयत्न करा.

४. नियमित अभ्यास घ्या. तुम्हाला एखाद्या दिवशी अभ्यास घ्यायला जमणार नसेल, तर विचार करा:

  1. क. ‘आठवड्याच्या दुसऱ्‍या एखाद्या दिवशी मी अभ्यास घेऊ शकतो का?’

  2. ख. ‘मी फोनवरून किंवा व्हिडिओ-कॉलवरून अभ्यास घेऊ शकतो का?’

  3. ग. ‘मी दुसऱ्‍या एखाद्या प्रचारकाला अभ्यास घ्यायला सांगू शकतो का?’

५. योग्य मनोवृत्तीसाठी प्रार्थना करा. बायबल विद्यार्थी कदाचित नियमितपणे अभ्यास करत नसेल किंवा शिकलेल्या गोष्टींनुसार बदल करायला वेळ लावत असेल. अशा वेळी त्याचा अभ्यास घ्यायचा तुमचा निश्‍चय पक्का राहावा यासाठी यहोवाकडे मदत मागा. (फिलिप्पै. २:१३) बायबल विद्यार्थ्यामध्ये बरेचसे चांगले गुण असतील, त्यांवर लक्ष लावायला यहोवाकडे प्रार्थना करा.

ही वचनंही पाहा

नीति. ३:२७; प्रे. कार्यं २०:३५; २ करिंथ. १२:१५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा