या पुस्तिकेचा वापर कसा कराल?
या पुस्तिकेत प्रत्येक दिवसासाठी एक शास्त्रवचन आणि त्याबद्दलची थोडी माहिती दिली आहे. तुम्ही हे दिवसभरात कधीही वाचू शकता. पण अनेकांनी अनुभवलं आहे, की दिवसाच्या सुरुवातीला जर याचं वाचन केलं तर जास्त फायदा होतो. कारण त्यामुळे ते दिवसभरात त्यावर विचार करू शकतात. दररोज कुटुंबासोबत मिळून याचं वाचन केल्यामुळे तर आणखीनच फायदा होतो. जगभरातली बेथेल कुटुंबं, सकाळी नाष्ट्याच्या वेळी यावर चर्चा करतात.
यातली सगळी माहिती एप्रिल २०१९ ते मार्च २०२० पर्यंतच्या टेहळणी बुरूज लेखांमधून घेतली आहे. प्रत्येक दिवसाची माहिती कशातून घेतली आहे हे दाखवण्यासाठी टेहळणी बुरूज अंकाच्या तारखेनंतर काही आकडे दिले आहेत. पहिला आकडा पान क्रमांकाला आणि त्यानंतरचा आकडा परिच्छेदाला सूचित करतो. (खाली दिलेलं चित्र पाहा.) कोणत्याही दिवसाच्या विषयाबद्दल जास्त माहिती हवी असेल, तर तुम्ही तो लेख वाचू शकता.