वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • es21 पृ. १४२-१५५
  • डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर
  • शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
  • उपशिर्षक
  • बुधवार, १ डिसेंबर
  • गुरुवार, २ डिसेंबर
  • शुक्रवार, ३ डिसेंबर
  • शनिवार, ४ डिसेंबर
  • रविवार, ५ डिसेंबर
  • सोमवार, ६ डिसेंबर
  • मंगळवार, ७ डिसेंबर
  • बुधवार, ८ डिसेंबर
  • गुरुवार, ९ डिसेंबर
  • शुक्रवार, १० डिसेंबर
  • शनिवार, ११ डिसेंबर
  • रविवार, १२ डिसेंबर
  • सोमवार, १३ डिसेंबर
  • मंगळवार, १४ डिसेंबर
  • बुधवार, १५ डिसेंबर
  • गुरुवार, १६ डिसेंबर
  • शुक्रवार, १७ डिसेंबर
  • शनिवार, १८ डिसेंबर
  • रविवार, १९ डिसेंबर
  • सोमवार, २० डिसेंबर
  • मंगळवार, २१ डिसेंबर
  • बुधवार, २२ डिसेंबर
  • गुरुवार, २३ डिसेंबर
  • शुक्रवार, २४ डिसेंबर
  • शनिवार, २५ डिसेंबर
  • रविवार, २६ डिसेंबर
  • सोमवार, २७ डिसेंबर
  • मंगळवार, २८ डिसेंबर
  • बुधवार, २९ डिसेंबर
  • गुरुवार, ३० डिसेंबर
  • शुक्रवार, ३१ डिसेंबर
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा—२०२१
es21 पृ. १४२-१५५

डिसेंबर

बुधवार, १ डिसेंबर

मौन धरण्याचा समय . . . असतो.—उप. ३:७.

आपण जर आपल्या बोलण्यावर ताबा ठेवला नाही तर बरंच नुकसान होऊ शकतं. उदाहरणार्थ, आपल्या कार्यावर बंदी आहे अशा देशात राहणारा एखादा भाऊ किंवा बहीण तुम्हाला भेटते, तेव्हा त्या देशात आपलं काम कसं केलं जातं याबद्दल बारीकसारीक माहिती तुम्ही त्यांना विचारता का? असं करण्यामागचा तुमचा हेतू नक्कीच चांगला असेल. आपलं आपल्या भाऊबहिणींवर प्रेम आहे, आपल्याला त्यांची काळजी वाटते आणि त्यांचं कसं चाललं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. तसंच, त्यांच्यासाठी प्रार्थना करताना काही खास गोष्टींचा उल्लेख करायची आपली इच्छा असते. हे खरं असलं, तरी ही एक अशी वेळ आहे जेव्हा आपण आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. गुप्त माहिती देण्याचा आपण एखाद्यावर दबाव आणतो तेव्हा आपलं त्या व्यक्‍तीवर प्रेम नसल्याचं आपण दाखवतो. तसंच, ज्या भाऊबहिणींनी त्यांच्या कार्याबद्दल माहिती गुप्त ठेवण्यासाठी त्या व्यक्‍तीवर भरवसा ठेवला आहे, अशा भाऊबहिणींवरही आपलं प्रेम नसल्याचं आपण दाखवतो. आपल्यापैकी कोणाचीच अशी इच्छा नाही की ज्या देशांत आपल्या कार्यावर बंदी आहे तिथल्या भाऊबहिणींच्या त्रासात आपण आणखी भर घालावी. अशा देशात सेवा करणाऱ्‍या कोणत्याही भावाने किंवा बहिणीने, तिथले साक्षीदार सेवाकार्य किंवा उपासनेशी संबंधित इतर कार्यं कशी करतात याबद्दल कोणालाही माहिती देऊ नये. टेहळणी बुरूज२०.०३ २१ ¶११-१२

गुरुवार, २ डिसेंबर

तुम्ही खरोखर मरणार नाही.—उत्प. ३:४.

मानवांनी मरावं अशी देवाची इच्छा नव्हती. कायमस्वरूपी जगण्यासाठी आदाम आणि हव्वाने यहोवाची आज्ञा पाळणं गरजेचं होतं. त्याने दोघांना खूप सोपी आज्ञा दिली होती. त्याने म्हटलं होतं: “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्प. २:१६, १७) मग सैतानाने समस्या निर्माण केली. त्याने सर्पाद्वारे हव्वाला आजच्या वचनातले शब्द म्हटले. दुःखाची गोष्ट म्हणजे सैतानाने सांगितलेल्या खोट्या गोष्टीवर तिने विश्‍वास ठेवला आणि फळ खाल्लं. मग तिच्या पतीनेही ते फळ खाल्लं. (उत्प. ३:६) या प्रकारे, पाप आणि मृत्यू सर्व मानवांमध्ये पसरला. (रोम. ५:१२) देवाने सांगितल्याप्रमाणे आदाम आणि हव्वा यांचा मृत्यू झाला. पण सैतान एवढ्यावरच थांबला का? त्याने त्यानंतर मृत्यूबद्दल आणखी खोट्या गोष्टी पसरवल्या. त्यांपैकी एक खोटं म्हणजे, एखाद्याचा मृत्यू झाला की त्याचं शरीर नष्ट होतं पण आत्मा जिवंत राहतो. यांसारख्या खोट्या शिकवणींमुळे पुष्कळ लोकांची दिशाभूल झाली आहे.—१ तीम. ४:१. टेहळणी बुरूज१९.०४ १४-१५ ¶३-४

शुक्रवार, ३ डिसेंबर

मी लहान होतो तेव्हा लहान मुलासारखा बोलायचो, लहान मुलासारखा विचार करायचो, लहान मुलासारख्या माझ्या समजुती होत्या.—१ करिंथ. १३:११.

लहान मुलांमध्ये विचार करण्याची, तर्क करण्याची किंवा धोके ओळखून ते टाळण्याची क्षमता नसते. यामुळे शोषण करणारे लोक अगदी सहज रीत्या मुलांना भुलवून त्यांचं शोषण करतात. हे लोक मुलांना बऱ्‍याच खोट्या गोष्टी सांगतात जसं की शोषणासाठी मुलं जबाबदार आहेत, जो प्रकार घडला तो गुपित ठेवणं गरजेचं आहे, मुलांनी इतरांना याबद्दल सांगितलं तर कोणीही त्यांचं ऐकणार किंवा भरवसा ठेवणार नाही. तसंच, हे लोक असंदेखील सांगतात की मोठ्यांनी लहान मुलांसोबत लैंगिक गोष्टी करणं हा खरंतर मुलांवर प्रेम दाखवण्याचा एक मार्ग आहे. अशा खोट्या गोष्टी ऐकल्यामुळे मुलांना कदाचित खरं काय हे समजून घेण्यासाठी बरीच वर्षं लागू शकतात. मोठं होत असताना अशा मुलांना स्वतःची लाज वाटू शकते किंवा त्यांच्या मनात कमीपणाची भावना येऊ शकते. तसंच, आपण कोणाचंही प्रेम आणि सांत्वन मिळवण्याच्या लायकीचे नाहीत असंही त्यांना वाटू शकतं. यावरून हे स्पष्टच आहे की लैंगिक शोषणामुळे मुलांच्या मनावर झालेला परिणाम दिर्घकाळापर्यंत राहू शकतो. आपण शेवटच्या दिवसांत जगत आहोत, अशा दिवसांत जिथे लोक “माया-ममता नसलेले” आणि “दुष्ट व फसवी माणसे अधिकाधिक वाईट” होत आहेत.—२ तीम. ३:१-५, १३. टेहळणी बुरूज१९.०५ १५ ¶७-८

शनिवार, ४ डिसेंबर

अशा रीतीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.—गलती. ६:२.

येशूने कोणत्या मार्गांनी शिकवलं? त्याने लोकांना आपल्या शब्दांद्वारे शिकवलं. त्याचे शब्द खूप प्रभावी होते कारण यामुळे लोकांना देवाबद्दलचं सत्य आणि जीवनाचा खरा अर्थ कळला. तसंच, देवाचं राज्य हे संपूर्ण मानवजातीच्या दुःखांवर एकमेव उपाय आहे हेदेखील त्यातून स्पष्ट झालं. (लूक २४:१९) येशूने आपल्या उदाहरणाद्वारेही शिकवलं. त्याने आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीवरून आपल्या अनुयायांना दाखवून दिलं की जीवन कसं जगावं. (योहा. १३:१५) येशूने कधी शिकवलं? त्याने पृथ्वीवर सेवाकार्य करत असताना लोकांना शिकवलं. (मत्त. ४:२३) तसंच, त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतरही त्याने आपल्या अनुयायांना शिकवलं. जसं की, जवळपास ५०० पेक्षा जास्त शिष्यांच्या समूहासमोर तो प्रकट झाला आणि त्याने त्यांना “शिष्य” बनवण्याची आज्ञा दिली. (मत्त. २८:१९, २०; १ करिंथ. १५:६) ख्रिस्ती मंडळीचा मस्तक या नात्याने, येशू स्वर्गात गेल्यावरही आपल्या शिष्यांना सूचना देत राहिला. उदाहरणार्थ, इ.स. ९६ मध्ये अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना प्रोत्साहन आणि सल्ला देण्यासाठी ख्रिस्ताने प्रेषित योहानला प्रेरित केलं.—कलस्सै. १:१८; प्रकटी. १:१. टेहळणी बुरूज१९.०५ ३ ¶४-५

रविवार, ५ डिसेंबर

कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.—फिलिप्पै. १:१०.

या शेवटल्या दिवसांत आपल्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. फक्‍त आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी अनेक बांधवांना तास न्‌ तास काम करावं लागतं. तर इतर जणांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बराच वेळ प्रवास करावा लागतो. आणि इतर काहींना आपल्या कुटुंबाला आर्थिक रीत्या मदत करण्यासाठी भरपूर अंगमेहनतीचं काम करावं लागतं. यामुळे मेहनत करणारे आपले बंधुभगिनी संध्याकाळपर्यंत पार थकून गेलेले असतात! मग अशा वेळी त्यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी शक्‍ती उरलेली नसते. परिस्थिती कशीही असो, आपण बायबलचा आणि बायबल आधारित प्रकाशनांचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढलाच पाहिजे. कारण यावर यहोवासोबतचं आपलं नातं आणि सर्वकाळाचं जीवन अवलंबून आहे. (१ तीम. ४:१५) त्यासाठी काही जण दररोज सकाळी लवकर उठून घरात सर्वकाही शांत असताना अभ्यास करतात. पुरेशी झोप झाल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे विचार करणं शक्य होतं. तर इतर काही जण दिवसभराच्या कामानंतर काही वेळ बाजूला काढून अभ्यास आणि मनन करतात. टेहळणी बुरूज१९.०५ २६ ¶१-२

सोमवार, ६ डिसेंबर

यापुढे या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका, तर आपली विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर होऊ द्या.—रोम. १२:२.

आतून बदल करणं हे लगेच किंवा आपोआप होत नसतं. यासाठी आपल्याला कदाचित बरीच वर्षं “होताहोईल तितका प्रयत्न” करावा लागेल. (२ पेत्र १:५) आपण आतून ज्या प्रकारची व्यक्‍ती आहोत त्यात बदल करण्यासाठी आपण पुरेपूर मेहनत घेतली पाहिजे. त्यासाठी सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे प्रार्थना. स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपल्यालाही प्रार्थना करण्याची गरज आहे. त्याने म्हटलं: “हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्‍न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.” (स्तो. ५१:१०) आपल्या विचारांना दिशा देणाऱ्‍या मनोवृत्तीत बदल करणं गरजेचं आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि मदतीसाठी यहोवाकडे प्रार्थना केली पाहिजे. दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे मनन करणं. आपण दररोज देवाचं वचन वाचतो तेव्हा आपल्याला कोणते विचार आणि भावना बदलण्याची गरज आहे, यावर आपण मनन किंवा विचार करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. (स्तो. ११९:५९; इब्री ४:१२; याको. १:२५) आपल्या विचारांवर आणि भावनांवर जगाच्या विचारांचा प्रभाव झाला आहे का, हे आपण ओळखलं पाहिजे. आपल्यात कमतरता आहेत हे आपण प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे आणि नंतर त्यांवर मात करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. टेहळणी बुरूज१९.०६ ८ ¶१; १० ¶१०; १२ ¶११-१२

मंगळवार, ७ डिसेंबर

वेळेचा सर्वात चांगला उपयोग करा.—इफिस. ५:१६.

जर तुम्ही एखादं काम करायचं ठरवलं आहे, तर ते काम तुम्ही कधी पूर्ण करणार आहात त्याची एक वेळ ठरवा आणि ते काम तेव्हाच पूर्ण करा. ते काम पूर्ण करण्यासाठी परिस्थिती चांगली होण्याची वाट बघू नका; कारण परिस्थिती सर्व बाजूंनी नेहमीच चांगली असू शकत नाही. (उप. ११:४) कमी महत्त्वाच्या गोष्टींमागे तुमचा वेळ आणि शक्‍ती जाऊ नये म्हणून सावधगिरी बाळगा. कारण महत्त्वाच्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळ आणि शक्‍ती देणं गरजेचं आहे. (फिलिप्पै. १:१०) शक्य असल्यास अशी वेळ निवडा जेव्हा इतर जण तुमच्या कामात व्यत्यय आणणार नाहीत. इतरांना सांगा की तुम्हाला एकचित्ताने काम करण्यासाठी वेळ हवा आहे. तसंच, काम करताना फोन बंद करणं, ई-मेल आणि मेसेजेस न बघणं या गोष्टींमुळेही तुम्हाला काम वेळेत पूर्ण करायला मदत होईल. एखाद्या निर्णयामुळे होणाऱ्‍या परिणामाची तुलना, आपण प्रवासाच्या अंतिम मुक्कामाशी करू शकतो. तुम्हाला निर्धारित ठिकाणी पोहोचायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवणं गरजेचं आहे. प्रवासादरम्यान एक रस्ता बंद असला तर तुम्ही थांबणार नाही तर दुसऱ्‍या रस्त्याने जाल. त्याच प्रकारे, आपण निर्णयांच्या चांगल्या परिणामांवर विचार केला तर आपण हार मानणार नाही; मग आपल्यासमोर कितीही समस्या किंवा अडथळे आले तरीही.—गलती. ६:९. टेहळणी बुरूज१९.११ ३० ¶१७-१८

बुधवार, ८ डिसेंबर

देवाचे वचन . . . हृदयातले विचार व हेतू यांची पारख करू शकते.—इब्री ४:१२.

तुम्ही कोणत्या कारणामुळे बाप्तिस्मा घेतला पाहिजे? बायबलचा मनापासून अभ्यास केल्यामुळे तुम्हाला यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल आणि त्याच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल बरंच काही शिकायला मिळालं आहे. शिकलेल्या गोष्टी तुम्हाला आवडू लागल्या आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यावर प्रेम करू लागला. तेव्हा यहोवावरचं प्रेम हे तुम्ही बाप्तिस्मा घेण्याचं मुख्य कारण असलं पाहिजे. बाप्तिस्मा घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे तुम्ही बायबलमधली सत्यं स्वीकारली आहेत. येशूने शिष्य बनवण्याची आज्ञा दिली तेव्हा त्याने काय म्हटलं याबद्दल विचार करा. (मत्त. २८:१९, २०) येशूने म्हटलं की ज्यांना बाप्तिस्मा घ्यायचा आहे त्यांनी “पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा” घेतला पाहिजे. त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता की बायबलमध्ये यहोवाबद्दल, त्याचा पुत्र येशू याच्याबद्दल आणि पवित्र आत्म्याबद्दल दिलेली सत्यं आपण मनापासून स्वीकारली पाहिजेत. ही सत्यं प्रभावशाली आहेत आणि त्यांचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो. टेहळणी बुरूज२०.०३ ९ ¶८-९

गुरुवार, ९ डिसेंबर

जे शिस्तीने वागत नाहीत त्यांना ताकीद द्या . . . दुर्बळांना आधार द्या आणि सर्वांशी सहनशीलतेने वागा.—१ थेस्सलनी. ५:१४.

यहोवाने देवदूतांना, लोटला फक्‍त इशारा देण्यासाठीच पाठवलं नव्हतं. तर त्याने त्यांना लोटला सदोम शहरावर येणाऱ्‍या संकटातून वाचवण्यासाठीही पाठवलं होतं. (उत्प. १९:१२-१४, १७) त्याच प्रकारे, जर आपला एखादा बांधव चुकीचा निर्णय घेत असेल तर त्याला सावध करणं हे आपलं काम आहे. बायबलमधून मिळणारा सल्ला लागू करण्याच्या बाबतीत तो उशीर करत असला, तरी आपण धीर धरला पाहिजे. आपण त्या दोन देवदूतांसारखं असलं पाहिजे. आशा सोडून त्या बांधवापासून स्वतःला दूर करण्याऐवजी आपण त्याला मदत करण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधले पाहिजेत. (१ योहा. ३:१८) आपण जणू त्या बांधवाचा हात धरून त्याला बायबलचा सल्ला लागू करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यहोवा खरंतर लोटच्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करू शकला असता. पण, असं करण्याऐवजी त्याने त्याच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित केलं. त्याने पेत्रला, लोटचा एक नीतिमान व्यक्‍ती म्हणून उल्लेख करण्यासाठी प्रेरित केलं. (स्तो. १३०:३) यहोवाने लोटप्रती जसा दृष्टिकोन बाळगला त्या बाबतीत आपण त्याचं अनुकरण करू शकतो का? आपण आपल्या बंधुभगिनींच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित केलं, तर मग आपण त्यांच्याशी आणखी धीराने व्यवहार करू. याचा चांगला परिणाम म्हणजे तेदेखील आपली मदत स्वीकारण्यासाठी तयार होऊ शकतात. टेहळणी बुरूज१९.०६ २१ ¶६-७

शुक्रवार, १० डिसेंबर

प्रत्येक जण स्वतःचा भार वाहील.—गलती. ६:५.

आपण राहत असलेल्या ठिकाणी सरकारने आपल्या उपासनेवर बंदी आणली तर आपण कदाचित विचार करू, की ‘आपल्या उपासनेवर बंदी नसलेल्या देशात जावं का?’ हा निर्णय वैयक्‍तिक आहे आणि इतर कोणीही आपल्यासाठी हा निर्णय घेऊ शकत नाही. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांचा छळ झाला तेव्हा त्यांनी काय केलं यावर विचार केल्याने एका व्यक्‍तीला मदत होऊ शकते. यरुशलेममध्ये असलेले ख्रिस्ती, यहूदीया, शोमरोन तसंच, दूरवर असलेल्या फेनीके, कुप्र आणि अंत्युखिया या ठिकाणी गेले. (मत्त. १०:२३; प्रे. कार्ये ८:१; ११:१९) पण काही काळानंतर दुसऱ्‍यांदा छळाची लाट आली तेव्हा प्रेषित पौलने विरोध असतानाही तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. (प्रे. कार्ये १४:१९-२३) या अहवालांतून आपण काय शिकतो? दुसऱ्‍या ठिकाणी जाण्याबद्दल कुटुंबप्रमुखाने वैयक्‍तिक निर्णय घेतला पाहिजे. निर्णय घेण्याआधी कुटुंबप्रमुखाने प्रार्थनापूर्वक आणि काळजीपूर्वक आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे. तसंच, दुसऱ्‍या ठिकाणी जाण्याचे त्यांच्यावर कोणते चांगले आणि वाईट परिणाम होतील यावरही त्याने विचार केला पाहिजे. इतर जण याबाबतीत जे काही निर्णय घेतात त्यावरून आपण त्यांच्याबद्दल मत बनवू नये. टेहळणी बुरूज१९.०७ १० ¶८-९

शनिवार, ११ डिसेंबर

सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी हे आवश्‍यक आहे, की त्यांनी एकाच खऱ्‍या देवाला, म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखावं.—योहा. १७:३.

येशूने आपल्याला सांगितलं आहे की “जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.” (मत्त. २८:१९) येशू आपल्या शिष्यांकडून काय अपेक्षा करतो इतकंच आपण बायबल विद्यार्थ्याला शिकवत नाही, तर खरे ख्रिस्ती या नात्याने आपण कसं जगावं हेही त्याला समजण्यासाठी मदत करतो. विद्यार्थी त्याच्या जीवनात बायबल तत्त्वं लागू करण्यासाठी मेहनत करतो, तेव्हा आपण त्याला धीराने मदत केली पाहिजे. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांमध्ये आणि सवयींमध्ये बदल करायला फक्‍त काही महिने लागतात, पण काहींना बदल करायला जास्त वेळ लागतो. पेरूमध्ये राहणाऱ्‍या मिशनरी बांधवाने धीर दाखवल्यामुळे त्याला फायदा झाला. ते म्हणतात: “मी रॉल नावाच्या व्यक्‍तीचा दोन पुस्तकांतून अभ्यास घेतला. पण त्याच्या जीवनात अजूनही मोठमोठ्या समस्या होत्या. त्याचं वैवाहिक जीवन समस्यांनी भरलेलं होतं, तो शिव्या द्यायचा आणि त्याच्या वाईट वागणुकीमुळे त्याची मुलं त्याचा आदर करत नव्हती. पण तो नियमितपणे सभांना यायचा म्हणून मी त्याची आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेत राहिलो. मग तीनपेक्षा जास्त वर्षं अभ्यास केल्यानंतर त्याने बाप्तिस्मा घेतला.” टेहळणी बुरूज१९.०७ १५ ¶३; १९ ¶१५-१७

रविवार, १२ डिसेंबर

कसोशीने प्रयत्न करा.—लूक १३:२४.

प्रेषित पौलने फिलिप्पैकरांना पत्र लिहिलं त्या वेळी तो कशा प्रकारे आनंदाचा संदेश सांगण्यासाठी झटून प्रयत्न करत होता ते लक्षात घ्या. रोममध्ये त्याला घरात बंदी बनवून ठेवलं होतं. तो बाहेर जाऊन लोकांना प्रचार करू शकत नव्हता. असं असलं तरी त्याला भेटायला येणाऱ्‍या लोकांना तो प्रचार करायचा आणि दूरवर असलेल्या मंडळ्यांना पत्रंही लिहायचा. ख्रिस्तासारखंच आपल्यालाही शेवटच्या श्‍वासापर्यंत कसोशीने प्रयत्न करावा लागेल हे पौलला माहीत होतं. म्हणूनच, त्याने ख्रिश्‍चनांच्या जीवनाची तुलना शर्यतीशी केली. (१ करिंथ. ९:२४-२७) शर्यतीत भाग घेणारा आजूबाजूला न पाहता पूर्णपणे अंतिम रेषेवर लक्ष केंद्रित करतो. उदाहरणार्थ, आज शहरात आयोजित केल्या जाणाऱ्‍या शर्यतीतले धावक कदाचित अशा रस्त्यांवरून धावतील जिथे आजूबाजूला दुकानं किंवा इतर लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टी असतील. कल्पना करा की एखादा धावक शोरूम किंवा दुकानातल्या गोष्टींकडे पाहण्यासाठी मध्येच थांबला तर काय होईल? तो जिंकणार नाही. त्याला जर जिंकायचं असेल तर तो मुळीच थांबणार नाही! त्याच प्रकारे आपणही जीवनाच्या शर्यतीत लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टींकडे पाहण्याचं टाळलं पाहिजे. जर पौलसारखं आपणही ध्येय डोळ्यांपुढे ठेवलं आणि आवेशाने यहोवाची सेवा केली तर आपल्याला बक्षीस नक्कीच मिळेल! टेहळणी बुरूज१९.०८ ३ ¶४; ४ ¶७

सोमवार, १३ डिसेंबर

स्वतःकडे आणि तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे. . . . असे केल्याने तू स्वतःला आणि जे तुझे ऐकतात त्यांनाही वाचवशील.—१ तीम. ४:१६.

आपण देवाच्या आज्ञाचं पालन करण्याचा निर्णय घेतो आणि त्यानुसार आपल्या जीवनात व विश्‍वासात बदल करतो, तेव्हा आपल्या नातेवाइकांना आपल्यातले हे बदल स्वीकारणं कठीण जाऊ शकतं. सहसा सर्वात आधी त्यांच्या लक्षात येतं की आता आपण पूर्वीसारखं कोणत्याही धार्मिक सणांमध्ये आणि राजनैतिक कार्यांमध्ये त्यांच्यासोबत भाग घेत नाही. यामुळे सुरुवातीला आपल्या काही नातेवाइकांना आपला राग येऊ शकतो. (मत्त. १०:३५, ३६) आपण त्यांच्याबद्दल असा विचार करू नये की ते कधीच आपल्या संदेशात आवड दाखवणार नाहीत. आपण त्यांना आपल्या विश्‍वासांबद्दल सांगण्याचं बंद केलं, तर एका अर्थी ते सर्वकाळच्या जीवनासाठी योग्य नाहीत असा न्याय आपण त्यांच्याबद्दल करू. पण खरंतर, यहोवाने न्याय करण्याचा अधिकार आपल्याला नाही, तर येशूला दिला आहे. (योहा. ५:२२) आपण जर धीर धरला तर आपले नातेवाईक कालांतराने आपला संदेश ऐकून घेण्यासाठी तयार असतील. आपल्याला परीक्षांचा सामना करावा लागला तरीही आपला निर्णय ठाम असला पाहिजे. पण त्यासोबतच आपण विचारशीलपणाही दाखवला पाहिजे. (१ करिंथ. ४:१२ख) आपल्यासाठी यहोवाची सेवा किती महत्त्वाची आहे, हे पूर्णपणे समजण्यासाठी आपल्या नातेवाइकांना वेळ लागू शकतो. टेहळणी बुरूज१९.०८ १७ ¶१०, १३; १८ ¶१४

मंगळवार, १४ डिसेंबर

जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.—फिलिप्पै. ४:१३.

“मला ज्या समस्येला तोंड द्यावं लागलं तिचा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा मला जाणवतं की मी स्वतःच्या बळावर तिचा सामना कधीच करू शकलो नसतो!” असंच काहीसं तुम्ही म्हटल्याचं तुम्हाला आठवतं का? आपल्यापैकी बऱ्‍याच जणांनी कधी न्‌ कधी असं म्हटलं असेल. एखाद्या गंभीर आजारामुळे किंवा आपल्या प्रिय व्यक्‍तीला मृत्यूत गमावल्यामुळे तुमच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं असेल. आणि त्या वेळी तुम्ही ज्या प्रकारे सावरलात ते आठवून कदाचित तुम्ही असं म्हटलं असेल. जीवनातला तो कठीण काळ आठवून तुम्हाला जाणवतं, की त्या वेळी प्रत्येक दिवशी लढा देणं हे फक्‍त आणि फक्‍त यहोवाच्या पवित्र आत्म्याद्वारे मिळालेल्या ‘असाधारण सामर्थ्यामुळे’ शक्य झालं होतं. (२ करिंथ. ४:७-९) या दुष्ट जगाच्या प्रभावाचा विरोध करण्यासाठीही आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून राहतो. (१ योहा. ५:१९) तसंच, आपल्याला “दुष्ट आत्मिक शक्‍तींबरोबर” लढण्यासाठी लागणारी ताकदसुद्धा हवी आहे. (इफिस. ६:१२) समस्येत असतानाही आपल्या जबाबदाऱ्‍या व्यवस्थित रीतीने पार पाडण्यासाठी यहोवाचा पवित्र आत्मा आपल्याला ताकद देतो. प्रेषित पौलच्या जीवनात समस्या होत्या तरी ‘ख्रिस्ताच्या सामर्थ्यावर’ अवलंबून राहिल्यामुळे तो यहोवाची सेवा करत राहू शकला आणि आपलं सेवाकार्य पूर्ण करू शकला.—२ करिंथ. १२:९. टेहळणी बुरूज१९.११ ८ ¶१-३

बुधवार, १५ डिसेंबर

ज्याने मला पाहिलं आहे, त्याने पित्यालाही पाहिलं आहे.—योहा. १४:९.

बायबलच एक असं पुस्तक आहे ज्यात येशूने तुमच्यासाठी केलेल्या गोष्टींची अचूक माहिती दिली आहे. येशूवर प्रेम करायला शिकल्यामुळे तुमचं यहोवावरचं प्रेम वाढेल. असं का? कारण येशूने त्याच्या पित्याच्या गुणांचं हुबेहूब अनुकरण केलं. तुम्ही येशूबद्दल जितकं शिकून घ्याल तितकं तुम्हाला यहोवाला चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि तुमची त्याच्याबद्दल असलेली कदर वाढेल. लोक ज्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे अशा गरीब, आजारी आणि कमजोर लोकांना येशूने दाखवलेल्या दयेबद्दल विचार करा. तसंच येशूने दिलेल्या व्यावहारिक सल्ल्यांचा आणि ते जीवनात लागू केल्यामुळे होणाऱ्‍या फायद्यांचाही विचार करा. (मत्त. ५:१-११; ७:२४-२७) आपल्याला पापांची क्षमा मिळावी यासाठी येशूने त्याचं जीवन बलिदान दिलं. याबद्दल खोलवर विचार केल्यामुळे तुमचं त्याच्यावरचं प्रेम नक्कीच वाढेल. (मत्त. २०:२८) येशू तुमच्यासाठी स्वतःचं जीवन द्यायला तयार होता हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही पश्‍चात्ताप करायला आणि यहोवाची क्षमा मिळवायला प्रेरित व्हाल. (प्रे. कार्ये ३:१९, २०; १ योहा. १:९) जितकं जास्त तुम्ही येशूवर आणि यहोवावर प्रेम कराल तितकं जास्त तुम्हाला अशा लोकांसोबत राहावसं वाटेल ज्यांचं त्या दोघांवर प्रेम आहे. टेहळणी बुरूज२०.०३ ५-६ ¶१०-१२

गुरुवार, १६ डिसेंबर

परमेश्‍वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो.—स्तो. १३८:६.

एका विशिष्ट कामासाठी सर्वात निपुण मीच आहे असा विचार एका ख्रिस्ती बांधवाच्या मनात येऊ शकतो. किंवा एका ख्रिस्ती पत्नीच्या मनात असा विचार येऊ शकतो, की अमुक बांधवापेक्षा माझे पती जास्त निपुण आहेत! पण जर आपण नम्र असू तर आपण अशी गर्विष्ठ मनोवृत्ती बाळगणार नाही. इतरांना जबाबदारी देण्यात आल्यावर मोशेने जी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून आपण बरंच काही शिकू शकतो. मोशेला इस्राएल राष्ट्राचं नेतृत्व करण्याची नेमणूक मिळाली होती आणि त्याबद्दल त्याने कदर बाळगली. पण जेव्हा यहोवाने मोशेची काही कामं इतरांनाही करू दिली तेव्हा त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली? त्याने मनात हेवा बाळगला का? नाही. (गण. ११:२४-२९) मोशे नम्र असल्यामुळे न्याय करण्याच्या कामात त्याने इतरांची मदत घेतली. (निर्ग. १८:१३-२४) न्याय करण्यासाठी आता जास्त माणसं असल्यामुळे इस्राएली लोकांना बराच वेळ थांबून राहण्याची गरज नव्हती. मोशे ज्या प्रकारे वागला त्यावरून दिसून येतं की त्याने आपल्याजवळ असलेल्या अधिकाराला महत्त्व देण्यापेक्षा लोकांच्या भल्याचा विचार केला. खरंच, आपल्यासमोर त्याचं किती चांगलं उदाहरण आहे! जर आपली इच्छा आहे की यहोवाच्या सेवेत आपला वापर व्हावा तर आपल्याकडे बरीच कौशल्यं असण्यापेक्षा नम्रता असणं जास्त महत्त्वाचं आहे. टेहळणी बुरूज१९.०९ ५-६ ¶१३-१४

शुक्रवार, १७ डिसेंबर

परमेश्‍वर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचे रक्षण करतो.—स्तो. ३१:२३.

राष्ट्रं, मोठ्या बाबेलवर हल्ला करण्याची कोणती कारणं देतील हे आपल्याला माहीत नाही. कदाचित ते म्हणतील की जगातले सर्व धर्म, शांती आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नात अडथळे निर्माण करत आहेत आणि सतत राजकीय कारभारात ढवळाढवळ करत आहेत. किंवा ते कदाचित म्हणतील की धार्मिक संघटनांनी अमाप संपत्ती आणि मालमत्ता जमवली आहे. (प्रकटी. १८:३, ७) पण राष्ट्रं जेव्हा खोट्या धर्मांवर हल्ला करतील तेव्हा कदाचित ते त्यांच्या सर्व सदस्यांचा नाश करणार नाहीत. तर ते खोट्या धर्माच्या संघटनांचा नाश करतील. एकदा का या संघटनांचा नाश झाला की त्यांच्या सदस्यांना जाणीव होईल की त्यांच्या धार्मिक नेत्यांनी दिलेली सर्व वचनं निष्फळ ठरली आहेत. आणि त्यामुळे ते आपआपल्या धर्मांशी असलेले सर्व संबंध तोडून टाकतील. मोठ्या बाबेलचा नाश होण्यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही. (प्रकटी. १८:१०, २१) यहोवाने अभिवचन दिलं आहे की तो “निवडलेल्या लोकांसाठी” आणि खऱ्‍या धर्माला वाचवण्यासाठी संकटाचे “दिवस कमी” करेल.—मार्क १३:१९, २०. टेहळणी बुरूज१९.१० १५ ¶४-५

शनिवार, १८ डिसेंबर

स्त्रियांना आपल्या . . . मुलाबाळांवर प्रेम करण्यास . . . शिकवावे.—तीत २:४, ५.

स्त्रियांनो, तुम्ही कदाचित अशा परिस्थितीत लहानाचे मोठे झाले असाल जिथे आईवडिलांना लगेच राग येतो आणि ते आपल्या मुलांशी खूप चिडून बोलतात. यामुळे तुम्हाला वाटेल की आपल्या मुलांचं अशाच प्रकारे संगोपन करायचं असतं. यहोवाचे स्तर शिकून घेतल्यानंतरही तुम्हाला कदाचित शांतीने आणि धीराने आपल्या मुलांशी वागणं कठीण जात असेल. जसं की, तुम्ही थकलेले असताना मुलं तुमचं ऐकत नसतील किंवा बेशिस्तपणे वागत असतील तेव्हा. (इफिस. ४:३१) खरंतर, अशा वेळी तुम्हाला यहोवावर आणखी जास्त विसंबून राहावं लागेल आणि यासाठी तुम्ही यहोवाला प्रार्थना करू शकता. (स्तो. ३७:५) काही स्त्रियांना आपल्या मुलांबद्दल असलेलं प्रेम व्यक्‍त करायला कठीण वाटतं. कारण त्यांचं संगोपन अशा कुटुंबात झालेलं असतं जिथे पालकांचं आपल्या मुलांसोबत प्रेमळ नातं नव्हतं. तुम्ही जर अशा कुटुंबात वाढला असाल तर तुम्हाला तुमच्या पालकांसारखी चूक करण्याची गरज नाही. यहोवाच्या अधीन राहणाऱ्‍या एका आईला कदाचित आपल्या मुलांवर असलेलं प्रेम व्यक्‍त करायला शिकून घ्यावं लागेल. तिला हा बदल करायला कठीण वाटू शकतं. पण हे करणं शक्य आहे आणि या बदलामुळे तिला आणि तिच्या कुटुंबाला, दोघांना फायदा होईल. टेहळणी बुरूज१९.०९ १८-१९ ¶१९-२०

रविवार, १९ डिसेंबर

कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही.—मत्त. ६:२४.

एक व्यक्‍ती यहोवाची उपासना करण्यासोबतच आपला जास्त वेळ आणि ताकद श्रीमंत बनण्यात घालवत असेल, तर एका अर्थी ती दोन मालकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असेल. म्हणजेच, ती व्यक्‍ती ‘फक्‍त यहोवाचीच उपासना’ करत नसेल. पहिल्या शतकाच्या शेवटी-शेवटी लावदिकीया शहरातल्या मंडळीतले भाऊबहीण स्वतःबद्दल असं म्हणू लागले की “मी श्रीमंत आहे आणि मी धनसंपत्ती मिळवली आहे आणि मला कशाचीही गरज नाही.” पण यहोवाने आणि येशूने त्यांच्याबद्दल म्हटलं की “तू दुःखी, दयनीय, दरिद्री, आंधळा आणि उघडावाघडा आहेस.” ते श्रीमंत होते म्हणून येशूने त्यांना ताडन दिलं नाही, तर पैशावरच्या प्रेमामुळे यहोवासोबतचं त्यांचं नातं बिघडत चाललं होतं म्हणून त्यांना ताडन दिलं. (प्रकटी. ३:१४-१७) आपल्या मनात पैशाबद्दल प्रेम असल्याचं आपल्याला जाणवत असेल तर आपण लगेच आपली विचारसरणी सुधारली पाहिजे. (१ तीम. ६:७, ८) आपण जर असं केलं नाही तर आपण यहोवासोबतच इतर गोष्टींवरही प्रेम करू लागू आणि मग यहोवा आपली उपासना स्वीकारणार नाही. आपण “पूर्ण मनाने” फक्‍त यहोवाचीच उपासना करावी अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो.—मार्क १२:३०. टेहळणी बुरूज१९.१० २७ ¶५-६

सोमवार, २० डिसेंबर

माणसे देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने बोलली.—२ पेत्र १:२१.

इथे “मार्गदर्शनाने” यासाठी असलेल्या ग्रीक भाषेतल्या शब्दाचा शब्दशः अर्थ, “आत्म्याने वाहून नेले” असा होतो. हे समजण्यासाठी प्रेषितांची कार्ये पुस्तकाचा लेखक, लूक याने काय लिहिलं त्याकडे लक्ष द्या. प्रेषित पेत्रने ज्या ग्रीक शब्दाचा वापर केला त्यासारख्याच शब्दाचा वापर लूकनेही केला. एक नाव “वारा नेईल” त्या दिशेने कशा प्रकारे जाते याचं वर्णन करण्यासाठी त्याने त्या शब्दाचा वापर केला. (प्रे. कार्ये २७:१५) प्रेषित पेत्रने, बायबलचे लेखक हे पवित्र आत्म्याने ‘वाहून नेण्यात आले’ असं जे म्हटलं त्यावर एका बायबल विद्वानाने टिप्पणी केली. त्याच्या मते पेत्रने ‘वाहून नेण्यात आले’ या वाक्यांशाचा वापर यासाठी केला कारण त्याला वाचकांच्या डोळ्यांसमोर ‘नावेतून प्रवास करण्याचं’ शब्दचित्र उभारायचं होतं. पेत्रला म्हणायचं होतं, की ज्या प्रकारे वारा एका नावेला तिच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मदत करतो, त्याच प्रकारे पवित्र आत्म्याने बायबल लेखकांना त्यांचं काम करायला मार्गदर्शन दिलं. त्या विद्वानाने असंही म्हटलं, की बायबल लेखक हे जणू अशा जहाजांप्रमाणे होते ज्यांची ‘शिडे उभारण्यात आली’ होती. शीड म्हणजे जहाजाला गती येण्यासाठी बांधलेलं मोठं कापड. यहोवाने बायबल लेखकांना ‘वारा’ म्हणजेच पवित्र आत्मा देऊन त्याच्या वाटणीचं काम केलं होतं. आणि त्या बायबल लेखकांनीही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार कार्य करून त्यांच्या वाटणीचं काम केलं. आणि आज, खवळलेल्या समुद्रात योग्य दिशेने वाहत असलेल्या वाऱ्‍याप्रमाणे देवाचा पवित्र आत्मा आपल्याला त्याने वचन दिलेल्या नवीन जगाकडे नेत आहे. टेहळणी बुरूज१९.११ ९ ¶७-९

मंगळवार, २१ डिसेंबर

संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ती अल्प होय.—नीति. २४:१०.

आपल्या समस्यांवर विचार केल्यामुळे काही वेळा आपण निराश होऊ शकतो. पण तरी त्यांबद्दल सतत विचार करत राहणं चुकीचं ठरेल. कारण असं केल्यामुळे यहोवाने आपल्याला भविष्यासाठी जी आशा दिली आहे तिचा आपल्याला विसर पडेल. (प्रकटी. २१:३, ४) आपण सावध नसलो तर निराशेमुळे आपण हताश होऊ आणि कदाचित यहोवाची सेवा करायचंही सोडून देऊ. अमेरिकेत राहणाऱ्‍या एका बहिणीच्या उदाहरणावर विचार करा. तिचे पती गंभीर आजाराचा सामना करत आहेत. आणि त्यांची काळजी घेत असताना ही बहीण आपला विश्‍वास कसा मजबूत ठेवते त्याबद्दल तिने म्हटलं: “आमची परिस्थिती खूप तणावपूर्ण आहे आणि कधीकधी मी निराश होते, पण माझी आशा खूप पक्की आहे. आमचा विश्‍वास वाढवण्यासाठी आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी यहोवाने जे आध्यात्मिक अन्‍न पुरवलं आहे त्यासाठी मी मनापासून खूप आभारी आहे. या परिस्थितीत आम्हाला या सल्ल्यांची आणि प्रोत्साहनाची खूप गरज आहे. यामुळे मला धीर धरायला मदत होते.” या बहिणीच्या शब्दांवरून कळतं की आपल्याला निराशेवर मात करणं शक्य आहे. हे आपण कसं करू शकतो? समस्या येतात तेव्हा सैतान आपली परीक्षा घेत आहे हे लक्षात ठेवा. यहोवा आपल्याला सांत्वन देईल असा भरवसा ठेवा. आणि तो जे आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे त्याबद्दल नेहमी कदर बाळगा. टेहळणी बुरूज१९.११ १६ ¶९-१०

बुधवार, २२ डिसेंबर

ज्याच्या चित्ती इमान वसते तो गोष्ट गुप्त ठेवतो.—नीति. ११:१३.

बायबलमध्ये दिलेलं हे तत्त्व खासकरून मंडळीतल्या वडिलांनी लागू केलं पाहिजे. वडील म्हणून सेवा करणाऱ्‍या बांधवाने ही गोष्ट ओळखली पाहिजे, की मंडळीतल्या भाऊबहिणींच्या “गुप्त गोष्टी” त्याने कोणालाही सांगू नये. जर त्याने त्या सांगितल्या, तर भाऊबहिणींचा त्याच्यावरचा विश्‍वास कमजोर होईल आणि त्याचं नाव खराब होईल. ज्यांच्याकडे मंडळीत जबाबदाऱ्‍या आहेत असे बांधव “दुतोंडे” किंवा कपटीपणे बोलणारे नसावेत. (१ तीम. ३:८, तळटीप) म्हणजेच त्यांनी इतरांना फसवू नये किंवा त्यांना इतरांबद्दल गप्पागोष्टी करायची सवय असू नये. एका वडिलाचं आपल्या पत्नीवर प्रेम असेल तर तो तिला अशी माहिती सांगणार नाही जी तिच्यासाठी गरजेची नाही. ज्या गोष्टी गुप्त ठेवल्या पाहिजेत त्यांबद्दल बोलायचा दबाव पत्नीने कधीही आपल्या पतीवर टाकू नये. असं करण्याद्वारे ती त्याला त्याचं चांगलं नाव टिकवून ठेवायला मदत करू शकते. एक पत्नी या सल्ल्याचं पालन करते, तेव्हा ती आपल्या पतीला मदत तर करतेच, पण त्यासोबतच ज्यांनी तिच्या पतीवर भरवसा ठेवून त्याला गुप्त माहिती सांगितली आहे, त्यांच्याबद्दलही आदर असल्याचं दाखवते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मंडळीत शांती आणि एकता टिकवून ठेवायला हातभार लावल्यामुळे ती यहोवाचं मन आनंदित करते.—रोम. १४:१९. टेहळणी बुरूज२०.०३ २२ ¶१३-१४

गुरुवार, २३ डिसेंबर

परमेश्‍वर तुम्हाला दर्शन देणार आहे.—लेवी. ९:४.

इ.स.पू. १५१२ मध्ये सीनाय पर्वताच्या पायथ्याशी निवासमंडपाची स्थापना करण्यात आली. मोशेने एक विधी करून अहरोन आणि त्याच्या मुलांना याजक म्हणून नेमलं. (निर्ग. ४०:१७; लेवी. ९:१-५) याजकांच्या नेमणुकीवर यहोवाची पसंती आहे हे त्याने कसं दाखवलं? अहरोन आणि मोशे लोकांना आशीर्वाद देत असतानाच स्वर्गातून अग्नी आला आणि वेदीवर असलेलं बलिदान पूर्णपणे भस्म झालं. (लेवी. ९:२३, २४) स्वर्गातून आलेल्या या अग्नीमुळे काय दिसून आलं? याजकपदासाठी नेमण्यात आलेल्या लोकांवर यहोवाची पसंती आहे हे तिथे स्पष्ट झालं. इस्राएली लोकांनी हे पाहिल्यामुळे त्यांना याजकांचं समर्थन करण्याची प्रेरणा मिळाली. आज हे आपल्याशी कसं संबंधित आहे? इस्राएल राष्ट्रामध्ये याजकांना नेमण्यात आलं होतं, पण ती योजना भविष्यासाठी असलेल्या याजकांच्या एका मोठ्या योजनेची फक्‍त छाया होती. या योजनेत १,४४,००० जण हे स्वर्गात ख्रिस्तासोबत सेवा करतील. (इब्री ४:१४; ८:३-५; १०:१) त्यामुळे, यहोवा आज या संघटनेचं मार्गदर्शन करत आहे आणि तिला आशीर्वाद देत आहे यात काहीच शंका नाही. टेहळणी बुरूज१९.११ २३ ¶१३; २४ ¶१४, १६

शुक्रवार, २४ डिसेंबर

तुम्हाला खर्चात पाडून तुमच्यावर ओझे बनू नये, म्हणून आम्ही रात्रंदिवस मेहनत व कष्ट करत होतो.—२ थेस्सलनी. ३:८.

प्रेषित पौल करिंथमध्ये असताना अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांच्या “घरी राहून त्यांच्यासोबत काम करू लागला. त्यांचा तंबू बनवण्याचा व्यवसाय होता.” पण त्याने “रात्रंदिवस मेहनत” केली याचा अर्थ असा नव्हता की तो सतत काम करत होता. त्याने तंबू बनवण्याच्या कामातून विश्रांती घेतली, जसं की शब्बाथाच्या दिवशी. त्यामुळे त्याला यहुदी लोकांना प्रचार करायची संधी मिळाली, कारण यहुदी लोकसुद्धा शब्बाथाच्या दिवशी काम करत नव्हते. (प्रे. कार्ये १३:१४-१६, ४२-४४; १६:१३; १८:१-४) पौलला जरी काम करावं लागलं, तरी त्याने नियमितपणे “देवाचा आनंदाचा संदेश सांगण्याचे पवित्र कार्य” करण्याकडे विशेष लक्ष दिलं. (रोम. १५:१६; २ करिंथ. ११:२३) त्याने इतरांनाही नियमितपणे प्रचार करण्याचं प्रोत्साहन दिलं. याचा परिणाम असा झाला की अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला ख्रिस्त येशूमध्ये त्याचे “सहकारी” बनले. (रोम. १२:११; १६:३) “प्रभूचे काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहा” असं प्रोत्साहन पौलने करिंथकरांना दिलं. (१ करिंथ. १५:५८; २ करिंथ. ९:८) यहोवाने प्रेषित पौलला असंही लिहिण्यासाठी प्रेरित केलं: “जर कोणाला काम करायची इच्छा नसेल, तर त्याने खाऊसुद्धा नये.”—२ थेस्सलनी. ३:१०. टेहळणी बुरूज१९.१२ ५ ¶१२-१३

शनिवार, २५ डिसेंबर

संतती ही परमेश्‍वराने दिलेले धन आहे.—स्तो. १२७:३.

यहोवाने पहिल्या स्त्री-पुरुषाला बनवलं तेव्हा त्याने त्यांना मुलं होऊ देण्याची इच्छा दिली. पण एका जोडप्याने कुटुंब वाढवावं की नाही आणि त्यांना किती मुलं असावीत हे कोणी ठरवायला हवं? काही संस्कृतीत, नवविवाहितांकडून अपेक्षा केली जाते की त्यांनी लवकरात लवकर आपलं कुटुंब वाढवण्याचा निर्णय घ्यावा. नातेवाईक किंवा इतर लोकही अशा प्रकारचा दबाव कदाचित जोडप्यांवर टाकतील. आशियामध्ये राहणारे जेथ्रो नावाचे बांधव म्हणतात: “मंडळीत ज्यांना मुलं आहेत ते मुलं नसलेल्या जोडप्यांवर कुटुंब वाढवण्याचा दबाव टाकतात.” आशियामध्ये राहणारे दुसरे एक बांधव, जेफ्री म्हणतात: “काही लोक जोडप्यांना म्हणतात, की तुम्हाला मुलं झाली नाहीत तर म्हातारपणी तुमच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नसेल!” पण मुलं होऊ द्यावीत की नाही, हा निर्णय प्रत्येक जोडप्याने स्वतः घ्यायला हवा. हे त्यांनीच ठरवायला हवं आणि ही त्यांचीच जबाबदारी आहे. (गलती. ६:५, तळटीप) हे खरं आहे की नवविवाहित जोडप्याने आनंदी असावं असं नातेवाइकांना आणि मित्रांना वाटतं. पण मुलं होऊ द्यावीत की नाही हा निर्णय सर्वस्वी त्या जोडप्याचा आहे आणि ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायला हवी.—१ थेस्सलनी. ४:११. टेहळणी बुरूज१९.१२ २२ ¶१-३

रविवार, २६ डिसेंबर

तेव्हा अशा प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या.—मत्त. ६:९.

देवाला आपला पिता मानणं तुम्हाला कठीण जातं का? यहोवा इतका श्रेष्ठ आहे की त्याच्या तुलनेत आपण काहीच नाही असं काही जणांना वाटू शकतं. तसंच, सर्वसमर्थ देव प्रत्येकाची काळजी घेतो याबद्दलही त्यांना शंका वाटते. असं असलं तरी, आपल्या प्रेमळ पित्याची इच्छा आहे की आपण अशी शंका मनात बाळगू नये. त्याने आपल्याला जीवन दिलं आहे आणि त्याची इच्छा आहे की आपण त्याच्याशी मैत्री करावी. प्रेषित पौल अथेन्सच्या लोकांशी या विषयावर बोलला तेव्हा त्याने म्हटलं की यहोवा “आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.” (प्रे. कार्ये १७:२४-२९) ज्या प्रकारे एक मूल स्वाभाविकपणे आपल्या प्रेमळ वडिलांकडे धावत जातं, त्याच प्रकारे आपल्यापैकी प्रत्येकाने यहोवाकडे जावं अशी त्याची इच्छा आहे. काही लोकांना त्यांच्या वडिलांनी प्रेमाने किंवा आपुलकीने वागवलेलं नसतं, म्हणून त्यांना यहोवाला आपला पिता मानणं कठीण जाऊ शकतं. एका ख्रिस्ती बहिणीने याबद्दल म्हटलं: “माझे वडील मला वाईटसाईट बोलायचे आणि खूप शिवीगाळ करायचे. जेव्हा माझा बायबल अभ्यास सुरू झाला तेव्हा यहोवाला पिता मानणं मला कठीण गेलं.” तुम्हालाही असंच वाटतं का? जर वाटत असेल, तर निराश होऊ नका. कारण कालांतराने तुम्हाला जाणवेल की यहोवा तुमचा सर्वात चांगला पिता आहे. टेहळणी बुरूज२०.०२ ३ ¶४-५

सोमवार, २७ डिसेंबर

माझी शक्‍ती क्षीण होत चालली असता मला सोडू नको.—स्तो. ७१:९.

येशूने आपल्याला शिकवलं की वाढत्या वयामुळे आपल्या क्षमता सीमित असल्या किंवा आपण करत असलेली मेहनत आपल्याला खूप कमी वाटत असली तरी आपण यहोवाच्या सेवेत जे काही करतो त्याला तो मौल्यवान लेखतो. (स्तो. ९२:१२-१५; लूक २१:२-४) तेव्हा, तुम्ही काय करू शकता यावर लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ, तुम्ही यहोवाबद्दल इतरांना सांगू शकता, बांधवांसाठी प्रार्थना करू शकता आणि त्यांना यहोवाला विश्‍वासू राहण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकता. आपण यहोवाच्या सेवेत खूप काही मिळवलं आहे म्हणून तो आपल्याला त्याचे सहकारी समजतो असं नाही, तर आपल्याला त्याची आज्ञा पाळण्याची इच्छा आहे म्हणून तो आपल्याला त्याचे सहकारी समजतो. (१ करिंथ. ३:५-९) खरंच, आपण यहोवाचे खूप आभारी आहोत कारण तो त्याची सेवा करणाऱ्‍यांना मौल्यवान लेखतो. त्याने आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बनवलं आहे आणि खऱ्‍या उपासनेमुळे आपल्या जीवनाला अर्थ मिळाला आहे. (प्रकटी. ४:११) हे जग आपल्याला तुच्छ समजत असलं तरी यहोवा आपल्याला मौल्यवान समजतो. (इब्री ११:१६, ३८) आजारपण, आर्थिक समस्या किंवा म्हातारपण यांमुळे आपण निराश होतो, तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की कोणतीही गोष्ट आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही!—रोम. ८:३८, ३९. टेहळणी बुरूज२०.०१ १८ ¶१६; १९ ¶१८-१९

मंगळवार, २८ डिसेंबर

हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्‍न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.—स्तो. ५१:१०.

नम्र आणि समाधानी राहून आपण ईर्ष्येवर मात करू शकतो. आपल्या मनात हे गुण असतील तर ईर्ष्येला जागा राहणार नाही. आपल्यात नम्रता असेल तर आपण स्वतःला जास्त महत्त्व देणार नाही. ‘माझ्यात इतरांपेक्षा जास्त योग्यता आहे’ असा विचार एक नम्र व्यक्‍ती कधीच करणार नाही. (गलती. ६:३, ४) एक समाधानी व्यक्‍ती तिच्याजवळ जे आहे त्यातच संतुष्ट असते आणि ती स्वतःची तुलना इतरांबरोबर करत नाही. (१ तीम. ६:७, ८) जेव्हा इतरांचं चांगलं होतं तेव्हा एक नम्र आणि समाधानी व्यक्‍ती त्यांच्या आनंदात सहभागी होते. ईर्ष्येवर मात करण्यासाठी आणि नम्र व समाधानी राहण्यासाठी आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याची गरज आहे. (गलती. ५:१६; फिलिप्पै. २:३, ४) यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण आपल्या मनातल्या खोल भावनांचं आणि हेतूंचं परीक्षण करू शकतो. देवाच्या मदतीने आपण चुकीचे विचार आणि भावना आपल्या मनातून काढून त्या जागी चांगले विचार आणि भावना विकसित करू शकतो.—स्तो. २६:२. टेहळणी बुरूज२०.०२ १५ ¶८-९

बुधवार, २९ डिसेंबर

स्वतःकडे आणि तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे.—१ तीम. ४:१६.

समर्पण हे तुम्ही यहोवाला दिलेलं वचन आहे आणि ते तुम्ही नेहमी पाळावं अशी तो अपेक्षा करतो. म्हणून मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत घनिष्ठ नातं जोडा. मंडळीतले भाऊबहीण तुमच्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहेत. सभांना नियमितपणे उपस्थित राहिल्यामुळे तुमचं त्यांच्यासोबत असलेलं नातं मजबूत होईल. दररोज बायबल वाचा आणि त्यावर मनन करा. (स्तो. १:१, २) मनन करण्यासाठी वेळ काढा. असं केल्यामुळे वाचलेल्या गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोहोचतील. तसंच, “प्रार्थना करत राहा.” (मत्त. २६:४१) मनापासून केलेल्या प्रार्थनांमुळे तुमचं यहोवासोबत घनिष्ठ नातं तयार होईल. त्यासोबतच “आधी देवाचं राज्य” मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहा. (मत्त. ६:३३) प्रचारकार्याला तुमच्या जीवनात पहिलं स्थान देण्याद्वारे तुम्ही असं करू शकता. नियमितपणे प्रचार केल्यामुळे तुमचा विश्‍वास मजबूत होईल. या जुन्या व्यवस्थेत तुम्हाला सहन करावी लागणारी कोणतीही समस्या ही “तात्पुरती व हलकी” आहे. (२ करिंथ. ४:१७) याच्या उलट समर्पण आणि बाप्तिस्म्यामुळे तुम्हाला आता समाधानी जीवन जगता येईल तसंच भविष्यात “खरे जीवन” मिळेल. आणि तुम्ही केलेले हे प्रयत्न कधीच वाया जाणार नाहीत.—१ तीम. ६:१९. टेहळणी बुरूज२०.०३ १३ ¶१९-२१

गुरुवार, ३० डिसेंबर

उरलेला वेळ कमी करण्यात आला आहे.—१ करिंथ. ७:२९.

तुमचा बायबल विद्यार्थी आपल्या जीवनात बदल करत नसेल तर एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला स्वतःला असा प्रश्‍न विचारावा लागतो की, ‘मी याचा बायबल अभ्यास थांबवायला हवा का?’ पण याबद्दल विचार करताना स्वतःला विचारा: ‘बायबल विद्यार्थी त्याच्या परिस्थितीनुसार प्रगती करत आहे का?’ ‘तो जे काही शिकतो त्याप्रमाणे त्याने वागायला सुरुवात केली आहे का?’ (मत्त. २८:२०) पण दुःखाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थी यहेज्केलच्या दिवसांतल्या इस्राएली लोकांसारखे असतात. यहोवाने त्या इस्राएली लोकांबद्दल काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या: “पाहा, एखादा मधुर कंठाचा व वाद्ये चांगली वाजवणारा प्रेमगीत गातो तसा तू त्यांस वाटतोस कारण ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत.” (यहे. ३३:३२) आपल्याला कदाचित बायबल अभ्यास बंद करण्याबद्दल एखाद्या विद्यार्थ्याला सांगायला अवघड जाईल. पण आपण लक्षात ठेवायला हवं की “उरलेला वेळ कमी करण्यात आला आहे.” प्रगती न करणाऱ्‍या विद्यार्थ्यांमागे जास्त वेळ घालवण्याऐवजी आपण अशा एका व्यक्‍तीला शोधण्यात वेळ दिला पाहिजे जी “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” बाळगणारी आहे.—प्रे. कार्ये १३:४८. टेहळणी बुरूज२०.०१ ६ ¶१७; ७ ¶२०

शुक्रवार, ३१ डिसेंबर

तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.—मत्त. ६:१०.

आज्ञाधारक मानव एक दिवस या पृथ्वीवर सर्वकाळ जगतील असं बायबलमध्ये दिलेलं सत्य, ख्रिस्ती धर्मजगत सहसा शिकवत नाहीत. (२ करिंथ. ४:३, ४) आज ख्रिस्ती धर्मजगतातले अनेक पंथ हेच शिकवतात की चांगल्या लोकांचा मृत्यू झाल्यावर ते स्वर्गात जातात. पण ही गोष्ट बायबल विद्यार्थ्यांचा एक लहान गट मानत नव्हता. त्यांनी १८७९ पासून वॉचटॉवर प्रकाशित करायला सुरुवात केली. त्यांना शास्त्रातून समजलं की देव या पृथ्वीला पुन्हा एकदा नंदनवन बनवेल आणि लाखो आज्ञाधारक लोक स्वर्गात नाही, तर याच पृथ्वीवर राहतील. पण हे खरं आहे की ते आज्ञाधारक लोक कोण असतील हे समजायला त्यांना वेळ लागला. पण हेही खरं आहे, की काही लोकांना “पृथ्वीवरून विकत” घेतलं जाईल आणि ते स्वर्गात येशूसोबत राज्य करतील, असं बायबल विद्यार्थ्यांना शास्त्रवचनांतून समजलं होतं. (प्रकटी. १४:३) या लोकांचा समूह १,४४,००० आवेशी आणि समर्पित ख्रिश्‍चनांनी मिळून बनलेला आहे. पृथ्वीवर असताना त्यांनी विश्‍वासूपणे देवाची सेवा केली. टेहळणी बुरूज१९.०९ २७ ¶४-५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा