या पुस्तिकेचा वापर कसा कराल?
पुढील पानांवर, दर दिवसासाठी तुम्हाला एक शास्त्रवचन आणि त्या वचनावरील टिपणी पाहायला मिळेल. शास्त्रवचन आणि टिपणी दिवसभरात कधीही वाचता येत असली तरी, बऱ्याच जणांना असं दिसून आलं आहे की दिवसाच्या सुरुवातीला वाचणं जास्त फायद्याचं आहे. कारण मग संपूर्ण दिवसभरात, दैनिक वचन आणि त्यावरील टिपणीवर विचार करायला संधी मिळते. प्रत्येक दिवसाच्या भागावर संपूर्ण कुटुंब मिळून चर्चा करणं तर खूपच फायद्याचं ठरेल. जगभरातील बेथेल कुटुंबं, सकाळच्या नाष्ट्याच्या वेळी यावर चर्चा करतात.
यातील सर्व टिपण्या एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यंतच्या टेहळणी बुरूज लेखांमधून घेण्यात आल्या आहेत. टेहळणी बुरूज अंकाच्या तारखेनंतर येणारे आकडे, टिपणीतील मजकूर, त्या अंकातील कोणत्या पृष्ठावरून आणि कोणत्या परिच्छेदातून घेण्यात आला आहे ते दाखवतात. (खालील चित्र पाहा.) टिपणीत चर्चा करण्यात आलेल्या विषयावरील अधिक माहिती तुम्हाला त्या लेखातच मिळेल.