भाग एक
“आकाश उघडलं”
भाग कशाबद्दल आहे: यहोवा जिथे राहतो त्याची एक झलक
सर्वोच्च देव यहोवाला पहिल्यावर कोणताही माणूस जिवंत राहू शकत नाही. (निर्ग. ३३:२०) पण यहोवा देवाने यहेज्केलला दृष्टान्ताद्वारे त्याच्या निवासस्थानाची झलक दिल्यामुळे आपल्याला त्याच्या संघटनेच्या स्वर्गातल्या भागाची माहिती मिळते. ही माहिती रोमांचक तर आहेच, पण त्यासोबत एकच खरा देव यहोवा याची उपासना करायचा जो बहुमान आपल्याला मिळाला आहे त्याबद्दलची आपली कदरही वाढते.