वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पृ. १७४-१७५
  • भाग १२ ची प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भाग १२ ची प्रस्तावना
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • देव कोणत्या प्रार्थना ऐकतो त्याबद्दल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • ‘प्रभुजी आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • देवाच्या सरकाराबद्दल अचूक माहिती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • आपण येशूला प्रार्थना करावी का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पृ. १७४-१७५
येशू मोठ्यांना आणि लहान मुलांना शिकवत आहे

भाग १२ ची प्रस्तावना

येशूने लोकांना स्वर्गातल्या राज्याबद्दल शिकवलं. देवाचं नाव पवित्र होण्यासाठी, त्याचं राज्य येण्यासाठी आणि त्याची इच्छा पृथ्वीवर पूर्ण होण्यासाठी येशूने लोकांना प्रार्थना करायला शिकवलं. तुम्हाला जर मुलं असतील तर या प्रार्थनेचा आपल्यासाठी काय अर्थ होतो, हे त्यांना समजावून सांगा. सैतानाने प्रयत्न करूनसुद्धा येशूने एकनिष्ठा टिकवून ठेवली. येशूने आपल्या प्रेषितांना निवडलं आणि देवाच्या राज्याचे सदस्य म्हणून त्यांना काही खास जबाबदाऱ्‍या दिल्या. खऱ्‍या उपासनेसाठी असलेल्या येशूच्या आवेशाबद्दल विचार करा. येशूला लोकांना मदत करायची होती. यामुळे त्याने आजारी लोकांना बरं केलं, उपाशी लोकांना जेवू घातलं, आणि मेलेल्या लोकांनासुद्धा जिवंत केलं. देवाचं राज्य मानवांसाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी करेल, हे दाखवण्यासाठी येशूने हे सर्व चमत्कार केले.

आपण काय शिकणार आहोत?

  • येशूने त्याच्या शिष्यांना देवाच्या राज्याबद्दल प्रचार करण्याचं आणि शिष्य बनवण्याचं काम दिलं

  • स्वतःच्या गरजांबद्दल प्रार्थना करण्याआधी आपण यहोवाशी संबंधित असलेल्या गोष्टींबद्दल प्रार्थना केली पाहिजे

  • इतरांना मनापासून क्षमा करा. तसंच, दुसऱ्‍यांनी तुमच्यासोबत जसं वागावं अशी तुमची इच्छा आहे, तसं तुम्हीही त्यांच्याशी वागा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा