वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ १० पृ. ३०
  • लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • लोटाच्या बायकोनं मागं पाहिलं
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • नव्या जगात जाण्यासाठी मुक्‍ततेची तयारी करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • देव अब्राहामासोबत करार करतो
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • तणावाचा सामना करण्यासाठी इतरांना मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ १० पृ. ३०
लोट आणि त्याच्या मुली सदोम शहरातून बाहेर जात असताना लोटची बायको मिठाचा खांब बनते

पाठ १०

लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा

लोट आपल्या काकांसोबत म्हणजे अब्राहामसोबत कनानमध्ये राहत होता. पण, नंतर अब्राहाम आणि लोट यांच्याजवळ असलेल्या प्राण्यांची संख्या वाढली. त्यामुळे त्यांना जागा कमी पडू लागली. म्हणून अब्राहामने लोटला म्हटलं: ‘आपण दोघं आता सोबत एकाच ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून तू बघ तुला कोणती जागा आवडते. आधी तू जागा निवड मग मी दुसरीकडे जाईन.’ यावरून आपल्याला कळतं, की अब्राहाम स्वार्थी नव्हता. हो ना?

लोटने सदोम शहराच्या जवळ असलेली एक सुंदर जागा पाहिली. तिथे भरपूर पाणी आणि हिरवंगार गवत होतं. म्हणून त्याने ती जागा निवडली आणि आपल्या कुटुंबासोबत तो तिथे राहायला गेला.

सदोमच्या जवळ गमोरा नावाचं एक शहर होतं. या दोन्ही शहरांमधले लोक खूप वाईट होते. ते लोक इतके वाईट होते, की यहोवाने त्या शहरांचा नाश करायचं ठरवलं. पण, देवाला लोट आणि त्याच्या कुटुंबाला वाचवायचं होतं. त्यामुळे, त्याने दोन देवदूतांना त्याच्या घरी पाठवलं. ते त्याला म्हणाले: ‘चल पटकन! या शहरातून बाहेर निघ! यहोवा या शहराचा नाश करणार आहे.’

पण लोट लगेच निघाला नाही. तो उशीर करत होता. त्यामुळे, ते देवदूत लोट, त्याची पत्नी आणि त्याच्या दोन मुलींचा हात धरून त्यांना घाई-घाईने शहराबाहेर नेऊ लागले. ते त्यांना म्हणत होते: ‘पळा पटकन! आपला जीव वाचवा. मागे वळून पाहू नका. तुम्ही मागे वळून पाहिलं तर मरून जाल.’

सदोम आणि गमोरा शहरांवर आगीचा आणि गंधकाचा पाऊस पडताना

जेव्हा ते सोअर नावाच्या शहरात पोचले, तेव्हा देवाने सदोम आणि गमोरा शहरांवर आगीचा आणि गंधकाचा पाऊस पाडला. या दोन्ही शहरांचा पूर्णपणे नाश झाला. पण लोटच्या बायकोने यहोवाचं ऐकलं नाही आणि मागे वळून पाहिलं, तेव्हा ती मिठाचा खांब बनली. पण, लोट आणि त्याच्या मुलींनी देवाचं ऐकल्यामुळे त्यांचा जीव वाचला. जेव्हा लोटच्या बायकोने देवाचं ऐकलं नाही, तेव्हा त्या तिघांना खूप वाईट वाटलं असेल. नाही का? यावरून आपण हेच शिकतो, की यहोवाच्या मार्गदर्शनांचं पालन करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे.

“लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा.”—लूक १७:३२

प्रश्‍न: यहोवाने सदोम आणि गमोरा शहरांचा नाश का केला? लोटची बायको मिठाचा खांब का बनली?

उत्पत्ति १३:१-१३; १९:१-२६; लूक १७:२८, २९, ३२; २ पेत्र २:६-९

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा