वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ ९ पृ. २८-पृ. २९ परि. १
  • शेवटी त्यांना एक मुलगा झाला!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शेवटी त्यांना एक मुलगा झाला!
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • अब्राहाम व सारा - तुम्ही त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करू शकता!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • देव अब्राहामाच्या विश्‍वासाची परीक्षा घेतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • अब्राहाम आणि साराने यहोवाचं ऐकलं
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ ९ पृ. २८-पृ. २९ परि. १
देवदूत अब्राहामसोबत बोलत असताना सारा तंबूच्या आतून ऐकत आहे

पाठ ९

शेवटी त्यांना एक मुलगा झाला!

अब्राहाम आणि साराचं लग्न होऊन खूप वर्षं झाली होती. आधी ते ऊर शहरात अगदी आरामात राहत होते. पण, त्यांनी ऊरमधलं आपलं घर सोडलं होतं. आता ते तंबूमध्ये राहत होते. असं असलं तरी, साराने कधीच याबद्दल तक्रार केली नाही. कारण यहोवावर तिला पूर्ण भरवसा होता.

साराची खूप इच्छा होती, की तिला एक मूल असावं. म्हणून ती अब्राहामला म्हणाली: ‘समजा माझी दासी हागार हिला एक मूल झालं, तर ते माझंच मूल आहे असं मला वाटेल.’ काही काळाने हागारला एक मुलगा झाला. त्याचं नाव होतं, इश्‍माएल.

सारा गरोदर आहे

खूप वर्षांनंतर तीन पाहुणे अब्राहाम आणि साराला भेटायला आले. त्या वेळी अब्राहाम ९९ वर्षांचा तर सारा ८९ वर्षांची होती. अब्राहामने त्यांना एका झाडाखाली आराम करायला सांगितलं. मग त्याने त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली. तुला माहीत आहे का ते पाहुणे कोण होते? ते देवदूत होते! ते अब्राहामला म्हणाले: ‘पुढच्या वर्षी या वेळी तुला आणि तुझ्या पत्नीला एक मुलगा होईल.’ तंबूच्या आत सारा हे सगळं ऐकत होती. ती स्वतःवर हसली आणि तिने विचार केला: ‘आता तर मी किती म्हातारी झाली आहे. या वयात मला खरंच मूल होईल का?’

यहोवाच्या देवदूताने वचन दिलं. त्याच्या दुसऱ्‍याच वर्षी साराला एक मुलगा झाला. अब्राहामने त्याचं नाव इसहाक ठेवलं. इसहाकचा अर्थ हसणं असा होतो.

जेव्हा इसहाक जवळपास पाच वर्षांचा होता, तेव्हा साराने पाहिलं की इश्‍माएल नेहमी इसहाकला चिडवायचा. तिला आपल्या मुलाचं रक्षण करायचं होतं. म्हणून तिने अब्राहामला सांगितलं, की त्याने हागार आणि इश्‍माएलला पाठवून द्यावं. सुरुवातीला अब्राहाम असं करण्यासाठी तयार नव्हता. पण नंतर यहोवाने अब्राहामला सांगितलं: ‘तू साराचं ऐक. कारण, तुला मी जे वचन दिलं आहे ते इसहाकद्वारेच पूर्ण होईल. इश्‍माएलची काळजी करू नकोस. त्याला मी सांभाळेन.’

सारा इसहाकला धरून उभी आहे आणि हागार व इश्‍माएल जात आहेत

“विश्‍वासानेच, सारालासुद्धा . . . गर्भधारणेची शक्‍ती मिळाली, कारण वचन देणारा विश्‍वसनीय असल्याचे तिने मानले.” —इब्री लोकांना ११:११

प्रश्‍न: देवदूतांनी अब्राहामला काय सांगितलं? यहोवाने इसहाकचं रक्षण कसं केलं?

उत्पत्ति १६:१-४, १५, १६; १७:२५-२७; १८:१-१५; २१:१-१४; इब्री लोकांना ११:११

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा