वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पाठ २ पृ. १०-पृ. ११ परि. १
  • देवाने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री बनवली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री बनवली
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • पहिले स्त्री-पुरुष
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • आपण का म्हातारे होतो आणि मरतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • शेवटला शत्रू, मृत्यू नाहीसा केला जाईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • एदेन बागेत जीवन कसं होतं?
    देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पाठ २ पृ. १०-पृ. ११ परि. १
एदेन बागेत आदाम आणि हव्वा

पाठ २

देवाने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री बनवली

यहोवाने एदेन नावाच्या ठिकाणी एक बाग लावली. या बागेत खूपसारी फुलं, झाडं आणि प्राणी होते. मग देवाने मातीतून पहिला पुरुष बनवला आणि त्याच्या नाकात श्‍वास फुंकला. मग काय झालं तुला माहीत आहे? तो पुरुष जिवंत झाला! त्याचं नाव होतं आदाम. यहोवाने त्याला बागेची देखरेख करण्याचं आणि सर्व प्राण्यांना नावं देण्याचं काम दिलं.

मग यहोवाने आदामला एक खूप महत्त्वाचा नियम दिला. तो आदामला म्हणाला: ‘तू बागेच्या सर्व झाडांची फळं खाऊ शकतो. पण त्यातल्या एका खास झाडाचं फळ तू खाऊ नको. तू जर ते खाल्लं तर तू मरशील.’

नंतर यहोवा म्हणाला: ‘मी आणखीन एक व्यक्‍ती बनवणार आहे. ती आदामला मदत करेल.’ त्यामुळे त्याने असं काहीतरी केलं, ज्यामुळे आदामला गाढ झोप लागली. मग देवाने त्याची एक फासळी काढली आणि त्यातून स्त्री बनवली. ती आदामची पत्नी झाली. तिचं नाव होतं हव्वा. आदाम आणि हव्वा यांचं मिळून पहिलं कुटुंब बनलं. तिला पाहून आदामला कसं वाटलं? आदामला खूप आनंद झाला. त्याने म्हटलं: ‘यहोवाने माझ्या फासळीतून किती सुंदर स्त्री बनवली. ही तर माझ्यासारखी आहे!’

यहोवाने आदाम आणि हव्वा यांना सांगितलं: ‘तुमचं कुटुंब वाढवा आणि ही पृथ्वी भरून टाका.’ यहोवाची इच्छा होती, की त्यांनी आनंदाने मिळून या पूर्ण पृथ्वीला एक सुंदर बाग किंवा नंदनवन बनवावं; अगदी एदेन बागेसारखं. पण यहोवाच्या इच्छेप्रमाणे झालं नाही. असं का? याबद्दल पुढच्या धड्यात सांगितलं आहे.

“निर्माणकर्त्याने सुरुवातीपासूनच त्यांना स्त्री व पुरुष असं निर्माण केलं.” —मत्तय १९:४

प्रश्‍न: यहोवाने आदामला कोणकोणती कामं दिली? आदाम आणि हव्वा यांनी त्या खास झाडाचं फळ खाल्लं तर काय होणार होतं?

उत्पत्ति १:२७-३१; २:७-९, १५-२३; स्तोत्र ११५:१६; मत्तय १९:४-६

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा