वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • yc पाठ २ पृ. ६-७
  • रिबकेनं यहोवाला खूश केलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • रिबकेनं यहोवाला खूश केलं
  • आपल्या चिमुकल्यांना शिकवा
  • मिळती जुळती माहिती
  • इसहाकसाठी वधू शोधणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • ती एका परक्या देशात जायला तयार झाली
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • रिबका देव-भीरू कष्टाळू स्त्री
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • इसहाकाला चांगली बायको मिळते
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
आपल्या चिमुकल्यांना शिकवा
yc पाठ २ पृ. ६-७
एलियेजर, रिबका, सेवक, दहा उंट, कनानच्या लांबच्या प्रवासाला निघाले आहेत

धडा २

रिबकेनं यहोवाला खूश केलं

रिबकेचं यहोवावर खूप प्रेम होतं. तिच्या नवऱ्‍याचं नाव इसहाक होतं. त्याचंपण यहोवावर खूप प्रेम होतं. रिबका आणि इसहाक एकमेकांना कसे भेटले? तिला यहोवाला खूश करायचं होतं हे तिनं कसं दाखवलं? चल आधी आपण तिचा नवरा इसहाक याच्याबद्दल बघू या.

इसहाकच्या आईबाबांचं नाव होतं, अब्राहाम व सारा. ते कनान नावाच्या देशात राहत होते. तिकडचे लोक यहोवाला मानत नव्हते. पण इसहाकनं यहोवाला मानणाऱ्‍या स्त्रीबरोबरच लग्न करावं, असं अब्राहामला वाटत होतं. म्हणून त्यानं त्यांच्या घरी काम करणाऱ्‍या एलियेजरला हारान नावाच्या एका गावी पाठवलं. तिथं अब्राहामचे नातेवाईक राहत होते. तिथून इसहाकसाठी एक बायको आण, असं त्यानं एलियेजरला सांगितलं.

रिबका एलियेजरच्या उंटांना पाणी पाजत आहे

उंटांना पाणी पाजण्यासाठी रिबका कष्ट करायला तयार होती

मग एलियेजर अब्राहामच्या घरात काम करणाऱ्‍या बाकीच्या सेवकांना घेऊन निघाला. त्यांना खूप चालावं लागलं. त्यांच्यासोबत दहा उंटसुद्धा होते. या उंटांवर त्यांनी, त्यांना लागणारं जेवण घेतलं होतं आणि हारानला गेल्यावर तिथल्या लोकांना देण्यासाठी बक्षीसं घेतली होती. पण मग इसहाकसाठी कोणत्या स्त्रीला निवडायचं, हे एलियेजरला कसं कळणार होतं? एलियेजर आणि त्याच्या बरोबरचे लोक व उंट हारानात पोहचल्यावर ते एका विहिरीजवळ थांबले. लोक इथं पाणी भरायला येतात हे एलियेजरला माहीत होतं. मग एलियेजरनं यहोवाला अशी प्रार्थना केली: ‘विहिरीवर पाणी भरायला आलेल्या एका स्त्रीला मी जर पाणी मागितलं आणि तिनं मला आणि या उंटांनाही पाणी पाजलं तर मी समजेन, की हीच स्त्री तू इसहाकसाठी बायको म्हणून निवडली आहेस.’

रिबका विहिरीजवळ येते. ती दिसायला खूप सुंदर होती, असं बायबलमध्ये म्हटलं आहे. मग एलियेजर तिला पाणी मागतो. ती त्याला म्हणते: ‘ठीक आहे. मी तुम्हाला पाणी देईन आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजेन.’ पण उंटांसाठी विहिरीतून पाणी काढणं सोपं नव्हतं कारण उंट खूप पाणी पितात! तरीपण बिचारी रिबका सारखीसारखी विहिरीतून पाणी काढून उंटांना पाजत राहिली. बघ या चित्रात बिचारी किती काम करतेय, हो ना?— एलियेजरला खूप आश्‍चर्य वाटतं, कारण यहोवानं त्याची प्रार्थना ऐकली होती!

मग एलियेजर रिबकेला खूप छानछान बक्षीसं देतो. रिबका एलियेजरला व त्याच्याबरोबर आलेल्या सेवकांना आपल्या घरी नेते. तिथं एलियेजर सगळ्यांना सांगतो, की तो हारानात का आला होता आणि यहोवानं त्याच्या प्रार्थनेचं उत्तर कसं दिलं. रिबकेचं लग्न इसहाकबरोबर होणार म्हणून तिच्या घरातल्यांनासुद्धा खूप आनंद होतो.

रिबका एलियेजरबरोबर कनानला जाते व इसहाकशी लग्न करते

पण इसहाकबरोबर लग्न करण्याची रिबकेचीसुद्धा इच्छा होती का?— यहोवानंच एलियेजरला इकडं पाठवलं होतं, हे रिबकेला माहीत होतं. मग रिबकेच्या घरातले तिला विचारतात, की तू कनानला जायला व इसहाकशी लग्न करायला तयार आहेस का? तेव्हा ती ‘होय, मी तयार आहे,’ असं उत्तर देऊन लगेच एलियेजरबरोबर जायला निघते. कनानमध्ये आल्यावर ती इसहाकबरोबर लग्न करते.

रिबकेनं यहोवाचं ऐकलं त्यामुळं त्यानं तिची काळजी घेतली. खूप वर्षांनंतर येशूचा जन्म रिबकेच्याच कुटुंबात झाला! तूपण रिबकेसारखं यहोवाचं ऐकलं आणि त्याला खूश केलं तर तो तुलाही आशीर्वादित करेल.

आपण वाचू या

  • उत्पत्ति १२:४, ५; २४:१-५८, ६७

प्रश्‍न:

  • रिबका कोण होती?

  • इसहाकनं कनानमधल्या कुठल्याही स्त्रीबरोबर लग्न करू नये, असं अब्राहामला का वाटत होतं?

  • इसहाकचं लग्न रिबकेशीच होईल, हे एलियेजरला कसं कळलं?

  • रिबकेसारखं होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा