भाग १२
तुमचं कुटुंब आनंदी असावं म्हणून तुम्ही काय करू शकता?
कुटुंब आनंदी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. इफिसकर ५:३३
देवाची आज्ञा आहे, की एका पुरुषाने फक्त एकाच स्त्रीशी लग्न केलं पाहिजे.
एक प्रेमळ पती आपल्या पत्नीला समजून घेतो आणि तिची काळजी घेतो.
पत्नीने आपल्या पतीला नेहमी साथ दिली पाहिजे.
मुलांनी आपल्या आईवडिलांचं ऐकलं पाहिजे.
कठोरपणे नाही, तर प्रेमळपणे वागा. धोका देऊ नका, तर जोडीदाराशी विश्वासू राहा. कलस्सैकर ३:५, ८-१०
बायबलमध्ये म्हटलं आहे, की पतीने आपल्या पत्नीवर स्वतःच्या शरीराप्रमाणेच प्रेम केलं पाहिजे. आणि पत्नीने पतीचा मनापासून आदर केला पाहिजे.
आपल्या पतीला किंवा पत्नीला सोडून दुसऱ्या कोणाशीही शरीरसंबंध ठेवणं चुकीचं आहे. तसंच, एकापेक्षा जास्त लग्न करणंही चुकीचं आहे.
कुटुंबात आनंद कसा टिकवून ठेवायचा याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे.