वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ll भाग ११ पृ. २४-२५
  • यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो का?
  • देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • मिळती जुळती माहिती
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या समीप जाणे
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • देवाला प्रार्थना करण्याचा बहुमान
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • देवाशी नातं मजबूत करण्यासाठी प्रार्थना करा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • देव कोणत्या प्रार्थना ऐकतो त्याबद्दल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
ll भाग ११ पृ. २४-२५

भाग ११

यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो का?

आपण खातरीने म्हणू शकतो की देव आपल्या प्रार्थना ऐकतो. १ पेत्र ३:१२

स्वर्गात यहोवाचं राजासन

यहोवा ‘प्रार्थना ऐकणारा’ देव आहे. (स्तोत्र ६५:२) आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगाव्यात अशी त्याची इच्छा आहे.

एक माणूस प्रार्थना करतो

फक्‍त यहोवालाच प्रार्थना करा.

  • प्रार्थना कशी करायची हे येशूने आपल्याला शिकवलं.​—मत्तय ६:९-१५.

  • देव कोणाच्या प्रार्थना ऐकतो?​—स्तोत्र १४५:१८, १९.

आपण बऱ्‍याच गोष्टींबद्दल प्रार्थना करू शकतो. १ योहान ५:१४

येशू आणि १,४४,००० यांनी मिळून बनलेलं राज्य

स्वर्गात आणि पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करा.

यहोवाला आवडणाऱ्‍या गोष्टी करण्यासाठी त्याच्याकडे मदत मागा. तुमच्या रोजच्या गरजा जसं की अन्‍न, कपडे आणि घर, तसंच नोकरी-धंदा आणि तुमचं आरोग्य यासाठीही तुम्ही प्रार्थना करू शकता.

स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी, तसंच योग्य ते करण्यासाठी एक ख्रिस्ती यहोवाकडे मदत मागतो

येशूच्या नावाने यहोवाला प्रार्थना करा. असं केल्यामुळे तुम्ही दाखवाल, की येशूने तुमच्यासाठी जे केलं आहे त्याची तुम्हाला कदर आहे.

  • जे यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागतात त्यांच्या प्रार्थना तो ऐकतो.—नीतिवचनं १५:२९.

  • चिंता करू नका.—फिलिप्पैकर ४:६, ७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा