अध्याय ८
तुमच्या कुटुंबाचे विध्वंसक परिणामांपासून संरक्षण करा
१-३. (अ) कुटुंबाला धोका संभवणारे विध्वंसक परिणाम कोणत्या उगमांकडून येतात? (ब) पालकांनी त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी कोणते संतुलन राखले पाहिजे?
तुम्ही तुमच्या लहान मुलास शाळेत पाठवण्याच्या तयारीत आहात आणि मुसळधार पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय करता? कोणताही पावसाळी पोषाख न घालता तुम्ही त्याला तसेच जाऊ देता का? किंवा ज्यामुळे हालचाल करण्यास अवघड होईल असे एकावर एक बरेच कपडे तुम्ही त्याला घालता? अर्थातच यापैकी एकही तुम्ही करत नाही. त्याला कोरडे ठेवण्यासाठी जे आवश्यक आहे तेच तुम्ही द्याल.
२ अशाच रीतीने, मनोरंजन उद्योग, प्रसार माध्यम, समवयस्क, आणि काही प्रसंगी शाळा सुद्धा—अशा अनेक उगमांकडून वेगाने येणाऱ्या विध्वंसक परिणामांपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी पालकांनी संतुलित मार्ग शोधला पाहिजे. काही पालक आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी कमी अथवा काहीच प्रयत्न करत नाहीत. इतर जण, तर बाहेरील सर्व परिणामांना जवळजवळ अपायकारक असे समजत असल्यामुळे इतके कडक आहेत त्यामुळे मुलांना गुदमरल्यासारखे वाटते. संतुलन राखता येणे शक्य आहे का?
३ होय, ते शक्य आहे. टोकाला जाणारे असल्याने व्यर्थ असते आणि त्यामुळे आपत्ती येऊ शकते. (उपदेशक ७:१६, १७) परंतु, ख्रिस्ती पालक त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यात योग्य संतुलन कसे राखतात? तीन क्षेत्रांचा विचार करा: शिक्षण, संगती आणि मनोरंजन.
तुमच्या मुलांना कोण शिकवील?
४. ख्रिस्ती पालकांनी शिक्षणाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहण्यास हवे?
४ ख्रिस्ती पालक शिक्षणाला अधिक महत्त्व देतात. मुलांना शाळेमुळे वाचणे, लिहिणे आणि दळणवळण राखण्यास तसेच समस्यांचे निरसन करण्यास मदत मिळते व ती त्यांना कसे शिकावे हे देखील शिकवते. शाळेत मिळालेल्या कौशल्यांमुळे आजच्या जगातील आव्हाने असतानाही यशस्वी होण्यास मुलांना साहाय्य मिळू शकते. याशिवाय, चांगले शिक्षण त्यांना उच्च दर्जाचे काम करण्यास मदत करू शकेल.—नीतिसूत्रे २२:२९.
५, ६. शाळेत मुलांना लैंगिक गोष्टींबद्दलची विपर्यस्त माहिती कशी मिळू शकते?
५ तथापि, शाळेमुळे मुले विपर्यस्त दृष्टिकोन असलेल्या—इतर मुलांच्या सहवासात देखील येतात. उदाहरणार्थ, लैंगिकता आणि नैतिकतेविषयीच्या त्यांच्या दृष्टिकोनांचा विचार करा. नायजेरियातील माध्यमिक शाळेत एक लैगिंकरित्या स्वैरवर्तन असलेली मुलगी इतर विद्यार्थीनींना लैंगिकतेबद्दल सल्ला देत असे. जरी तिच्या कल्पना अश्लील साहित्यामधून घेतलेला पूर्णपणे मूर्खतेचा होत्या तरी त्या उत्सुकतेने ऐकत असत. काही मुलींनी तिच्या सल्ल्याप्रमाणे केले. याचा परिणाम, एक मुलगी विवाहाविना गरोदर राहिली आणि स्वतःहून केलेल्या गर्भपातामुळे मरण पावली.
६ शाळेत लैंगिकतेबद्दल चुकीची काही माहिती मुलांकडूनच नव्हे तर शिक्षकांकडूनही दिली जाते, हे दुःखाचे आहे. शाळेत नैतिक दर्जे आणि जबाबदारी याबद्दल माहिती न देता लैंगिकतेविषयी शिकवले जात असल्यामुळे अनेक पालकांची त्रेधा उडाली आहे. १२ वर्षांच्या मुलीच्या एका मातेने म्हटले: “आम्ही अतिशय धार्मिक, पारंपारिक क्षेत्रात राहतो आणि तरीही उच्च माध्यमिक शाळेमध्ये मुलांना निरोध वाटले जातात!” आपल्या मुलीला तिच्याच वयाच्या मुलांकडून लैंगिक अनैतिकतेचे इशारे मिळत असल्याचे कळाल्यावर दोघेही पती-पत्नी काळजीत पडले. पालक अशा चुकीच्या परिणामांपासून त्यांच्या कुटुंबाचे कसे संरक्षण करू शकतात?
७. लैंगिकतेबद्दल चुकीच्या माहितीला उत्तम रीतीने कसे तोंड देता येईल?
७ लैंगिक विषयावर काहीही बोलण्याचे मुलांपासून लपवावे का? नाही. लैंगिकतेबद्दल मुलांना तुम्हीच शिकवणे उत्तम आहे. (नीतिसूत्रे ५:१) युरोप आणि दक्षिण अमेरिकेच्या भागांमधील अनेक पालक हा विषय टाळतात, हे खरे आहे. अशाच रीतीने, आफ्रिकेतील काही देशांमध्ये, पालक लैंगिकतेची चर्चा त्यांच्या मुलांसोबत क्वचितच करतात. सिएरा लियोनमधील एक पिता सांगतो की, “असे आफ्रिकी संस्कृतीत केले जात नाही.” काही पालकांना वाटते की त्यांच्या मुलांना लैंगिकतेबद्दल शिकवणे म्हणजे अनैतिकतेकडे निरवणाऱ्या कल्पना त्यांना देणे होय! पण देवाचा दृष्टिकोन काय आहे?
लैंगिकतेबद्दल देवाचा दृष्टिकोन
८, ९. बायबलमध्ये लैंगिकतेबद्दलची कोणती उत्तम माहिती सापडते?
८ बायबल स्पष्ट करते की उचित प्रसंगी लैंगिकतेबद्दल चर्चा करण्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. इस्राएलात, मोशेच्या नियमशास्राचे मोठ्याने केले जाणारे वाचन ऐकण्यासाठी देवाच्या लोकांना त्यांच्या ‘बालकांसहित’ एकत्र येण्यास सांगण्यात आले होते. (अनुवाद ३१:१०-१२; यहोशवा ८:३५) नियमशास्राने अनेक लैंगिक बाबींसोबत मासिक धर्म, वीर्यपात, जारकर्म, व्यभिचार, समलैंगिकता, गोत्रगमन आणि पशुतुल्यपणा यांचा मोकळेपणाने उल्लेख केला. (लेवीय १५:१६, १९; १८:६, २२, २३; अनुवाद २२:२२) अशा वाचनानंतर त्यांच्या जिज्ञासू मुलांना स्पष्टीकरण देण्यासाठी पालकांकडे पुष्कळ काही माहिती होती यात काही संशय नाही.
९ नीतिसूत्राच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या अध्यायातील उतारे लैंगिक अनैतिकतेच्या धोक्यांबाबत प्रेमळ पालकीय सल्ला देतात. ही वचने, अनैतिकता काही वेळा मोहीत करणारी असल्याचे दाखवतात. (नीतिसूत्रे ५:३; ६:२४, २५; ७:१४-२१) ही वचने अनैतिकता चुकीची असल्याचे व तिचा आपत्तीकारक परिणाम होतो असे शिकवतात आणि तरुणांनी अनैतिक मार्ग टाळावेत म्हणून त्यांना मदत करण्यासाठी मार्गदर्शन पुरवतात. (नीतिसूत्रे ५:१-१४, २१-२३; ६:२७-३५; ७:२२-२७) याशिवाय, विवाहाच्या उचित योजनेत लैंगिक सुख भोगण्याच्या विपरीत अनैतिकता आहे. (नीतिसूत्रे ५:१५-२०) पालकांनी अनुकरण करावे असा शिकवण्याचा हा किती उत्तम नमुना!
१०. मुलांना लैंगिकतेबद्दल ईश्वरी ज्ञान दिल्याने ते त्यांना अनैतिकता आचरण्याकडे का नेणार नाही?
१० असे शिक्षण मुलांना अनैतिकता आचरण्यास प्रवृत्त करते का? उलटपक्षी बायबल शिकवते: “धार्मिक आपल्या ज्ञानाने मुक्त होतात.” (नीतिसूत्रे ११:९) तुमच्या मुलांना या जगाच्या परिणामांपासून मुक्त करण्याची तुमची इच्छा नाही का? एका पित्याने म्हटले: “मुले अगदी लहान होती तेव्हापासूनच लैंगिकतेचा विषय येत असे तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत अगदी मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे, लैंगिकतेबद्दल इतर मुले बोलत असल्याचे ऐकतात तेव्हा ते जिज्ञासू नसतात. त्यांच्यासाठी ते मोठे रहस्य नाही.”
११. मुलांना जीवनातील अंतर्गत बाबींविषयी प्रगतिशीलपणे कसे शिकवता येऊ शकते?
११ आधीच्या अध्यायात उल्लेख केल्याप्रमाणे, लैंगिक शिक्षण लहानपणापासून सुरू केले पाहिजे. लहान मुलांना शरीराच्या अवयवांबद्दल शिकवत असताना, शरीराचे गुह्य भाग जणू लज्जास्पद आहेत म्हणून त्यांना वगळू नका. याची योग्य नावे त्यांना शिकवा. वेळ उलटतो तसे, एकांतता आणि मर्यादा याविषयीचे धडे आवश्यक आहेत. पालकांनी त्यांच्या मुलांना, हे खास अवयव आहेत आणि सहसा इतरांना त्यांस स्पर्श करू देऊ नये किंवा दाखवू नये आणि त्यांची कधीही वाईट रीतीने चर्चा करू नये असे शिकवले पाहिजे. बाळ होण्यासाठी पुरुष आणि स्री कसे एक होतात ही गोष्ट मुले मोठी होतात तसे त्यांना सांगितली पाहिजे. ते वयात येऊ लागतात, तेव्हा त्यांच्या शरीरात कोणते बदल अपेक्षित आहेत यांविषयी त्यांना आधीच माहिती असली पाहिजे. पाचव्या अध्यायात चर्चा केल्यानुसार, अशा शिक्षणामुळे मुलांचे लैंगिक दुर्व्यवहारापासून देखील संरक्षण होण्यास मदत मिळते.—नीतिसूत्रे २:१०-१४.
पालकांकरता असलेला गृहपाठ
१२. शाळेत अनेकदा कोणते विपर्यस्त दृष्टिकोन शिकवले जातात?
१२ पालकांनी, शाळेत शिकवल्या जाणाऱ्या इतर खोट्या कल्पनांविरुद्ध—जगीक तत्त्वज्ञान जसे की उत्क्रांती, राष्ट्रवाद किंवा कोणतेही सत्य निश्चित नाही यासारख्या कल्पनांचा प्रतिकार करण्यास तयार असण्याची आवश्यकता आहे. (१ करिंथकर ३:१९; पडताळा उत्पत्ति १:२७; लेवीय २६:१; योहान ४:२४; १७:१७.) अनेक प्रामाणिक शालेय अधिकारी पुढील शिक्षणाला वाजवीपेक्षा अधिकच महत्त्व देतात. पुरवणी शिक्षण ही वैयक्तिक निवडीची बाब असली तरी वैयक्तिक यशाचा हाच केवळ एक मार्ग असल्याचे काही शिक्षक समजतात.a—स्तोत्र १४६:३-६.
१३. शाळेत जाणाऱ्या मुलांचे चुकीच्या कल्पनांपासून कसे संरक्षण करता येऊ शकते?
१३ चुकीच्या किंवा विपर्यस्त शिकवणींचा प्रतिकार करण्यासाठी पालकांनी त्यांच्या मुलांना कोणते शिक्षण मिळत आहे हे जाणले पाहिजे. यास्तव पालकांनो, तुमच्याकरता देखील गृहपाठ आहे हे लक्षात ठेवा! मुलांच्या शाळेबद्दल खरी आवड दाखवा. शाळेनंतर त्यांच्याशी बोला. ते काय शिकत आहेत, त्यांना अधिक काय आवडते, कोणती गोष्ट त्यांना अधिक आव्हानात्मक वाटते याबद्दल त्यांना विचारा. त्यांना दिलेला गृहपाठ, टिपण आणि चाचणी निकाल तपासा. त्यांच्या शिक्षकांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करा. शिक्षकांच्या कार्याबद्दल तुम्ही त्यांची गुणग्राहकता बाळगता आणि कोणत्याही प्रकारे तुम्ही त्यांची मदत करू इच्छिता हे त्यांना कळू द्या.
तुमच्या मुलांचे मित्र
१४. ईश्वरी मुलांनी चांगल्या मित्रांची निवड करावी हे महत्त्वपूर्ण का आहे?
१४ “कोठे शिकलास तू हे?” त्यांच्या मुलाने काहीतरी विचित्र म्हटल्यामुळे किंवा केल्यामुळे भयचकित होऊन, हा प्रश्न किती पालकांनी विचारला असावा? शाळेतील नवीन मित्रांकडून किंवा शेजारच्या परिसरातून शिकलो असे उत्तर कितीदा मिळते? होय, आपण तरुण असो की वृद्ध, आपल्यावर सोबत्यांचा खूप परिणाम होतो. प्रेषित पौलाने इशारा दिला: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३; नीतिसूत्रे १३:२०) विशेषपणे तरुण समवयस्कांकडील दबावाला चटकन बळी पडणारे असतात. ते बहुधा स्वतःबद्दल अनिश्चित असतात आणि काही वेळा त्यांच्या सोबत्यांना खूष करण्याच्या व त्यांच्यावर प्रभाव पाडण्याच्या इच्छेमुळे तरुणांना भारावून गेल्याचे वाटेल. यास्तव, त्यांनी चांगल्या मित्रांची निवड केली पाहिजे हे किती आवश्यक आहे!
१५. मित्रांची निवड करण्यात पालक त्यांच्या मुलांना मार्गदर्शन कसे करू शकतात?
१५ प्रत्येक पालकाला माहीत असते त्याप्रमाणे मुले नेहमीच चांगल्याची निवड करणार नाहीत; त्यांना काही मार्गदर्शनाची गरज असते. त्यांच्याकरता मित्रांची निवड करण्याची ही बाब नव्हे. उलटपक्षी, मुले मोठी होतात तसे त्यांना समजबुद्धी शिकवा आणि त्यांच्या मित्रांतील कोणते गुण त्यांनी मोलाचे समजले पाहिजेत हे पाहण्यास त्यांना मदत करा. प्रमुख गुण यहोवाबद्दलचे प्रेम आणि त्याच्या दृष्टीत जे योग्य आहे ते करणे होय. (मार्क १२:२८-३०) प्रामाणिकपणा, दया, दानशूरपणा, मेहनतीपणा असे गुण ज्यांच्यामध्ये आहेत अशांवर प्रेम करण्याचे व त्यांचा आदर करण्याचे त्यांना शिकवा. कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी, बायबल पात्रांमध्ये असे गुण ओळखण्याची आणि मग असेच गुण मंडळीतील इतरांत पाहण्याकरता मुलांची मदत करा. याच कसोटीचा वापर करून स्वतःच्या मित्रांची निवड करण्याद्वारे उदाहरण मांडा.
१६. पालक त्यांच्या मुलांनी केलेल्या मित्रांची निवड यावर कसे लक्ष ठेवू शकतात?
१६ तुमच्या मुलांचे मित्र कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? यास्तव, तुम्हाला त्यांना भेटता यावे म्हणून त्यांना घरी घेऊन येण्यास तुमच्या मुलांना का सांगू नये? या मित्रांबद्दल इतर मुलांचे काय मत आहे हे देखील तुम्ही तुमच्या मुलांना विचारू शकता. त्यांना वैयक्तिकरित्या सचोटी प्रदर्शित करणारे अथवा दुहेरी जीवन जगणारे म्हणून ओळखले जाते का? जर दुहेरी जीवन ते जगत असतील, तर अशा संगतीचा तुमच्या मुलांना कसा अपाय होऊ शकतो याचा तर्क करण्यास त्यांना मदत करा. (स्तोत्र २६:४, ५, ९-१२) तुमच्या मुलाच्या वागणुकीत, पेहरावात, प्रवृत्तीत, किंवा भाषेत काही अवांच्छनीय बदल पाहिल्यास, त्याच्या अथवा तिच्या मित्रांविषयी बोलण्याची गरज असेल. तुमचे मूल नकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या मित्राबरोबर वेळ घालवत असेल.—पडताळा उत्पत्ति ३४:१, २.
१७, १८. वाईट मित्रांविरुद्ध इशारा देण्याखेरीज, पालक कोणती व्यावहारिक मदत देऊ शकतात?
१७ तरीही, तुमच्या मुलांना वाईट सोबती टाळण्याचे केवळ शिकवणेच पुरेसे नाही. चांगली संगती शोधण्यास त्यांची मदत करा. एक पिता म्हणतो: “आम्ही नेहमीच पर्याय शोधत असू. म्हणून आमच्या मुलाने फुटबॉल संघात असावे असे शाळेला वाटले तेव्हा, नवीन सोबती असल्यामुळे—ती चांगली कल्पना का नाही याची चर्चा मी व माझ्या पत्नीने त्याच्यासोबत बसून केली. परंतु मग, फुटबॉल खेळण्यासाठी मंडळीतील इतर मुलांना बागेत घेऊन जाण्याचे आम्ही सुचवले. ही पद्धत चांगली उपयोगी ठरली.”
१८ सुज्ञ पालक त्यांच्या मुलांना चांगले मित्र शोधण्यासाठी आणि त्यांच्यासोबत हितकर मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी मदत करतात. तथापि, मनोरंजनाच्या या बाबतीत त्याजशी निगडित असलेली आव्हाने अनेक पालकांच्या सामोरी येतात.
कोणत्या प्रकारचे मनोरंजन?
सहलीला निघणाऱ्या या कुटुंबाप्रमाणे, चांगली निवड केलेले मनोरंजन मुलांना शिकण्यास आणि आध्यात्मिकतेत वाढण्यास मदत करू शकते
१९. कुटुंबाने मौजमजा करावी हे पापमय नाही, यास कोणती बायबल उदाहरणे दाखवतात?
१९ मौजमजा करण्याला बायबल मनाई करते का? मुळीच नाही! बायबल म्हणते की, “हसण्याचा समय . . . नृत्य करण्याचा समय असतो.”b (उपदेशक ३:४) प्राचीन इस्राएलातील देवाचे लोक संगीत व नृत्य, खेळ व कोडे यांचा आनंद घेत असत. येशू ख्रिस्त लग्नाच्या मोठ्या मेजवानीला आणि मत्तय लेवीने दिलेल्या ‘मोठ्या मेजवानीला’ उपस्थित होता. (लूक ५:२९; योहान २:१, २) येशू, दुसऱ्यांच्या आनंदात विरजण टाकणारा मनुष्य नक्कीच नव्हता. तुमच्या घरात हसणे आणि मौजमजा करणे पाप आहे असा दृष्टिकोन कधीही बाळगू नये!
२०. कुटुंबाचे मनोरंजन करताना पालकांनी काय लक्षात ठेवले पाहिजे?
२० यहोवा हा ‘आनंदी देव’ आहे. (१ तीमथ्य १:११) यास्तव, यहोवाची उपासना जीवनातील दुःखाचे सावट नव्हे तर आनंदाचा स्रोत असली पाहिजे. (पडताळा अनुवाद १६:१५.) मुलांठायी स्वाभाविकपणे उत्साह आणि जोम असतो व तो खेळ आणि मनोरंजनाकरवी उपयोगात आणला जाऊ शकतो. चांगल्या प्रकारे निवडलेले मनोरंजन मौजमजेपेक्षाही अधिक असते. हा मुलाला शिकण्याचा आणि प्रौढ होण्याचा मार्ग आहे. कुटुंब प्रमुख, घराण्याच्या मनोरंजनासहित सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यास जबाबदार आहे. तथापि, संतुलन राखले पाहिजे.
२१. आज मनोरंजनात कोणते पाश आहेत?
२१ या त्रस्त “शेवटल्या काळी” मानवी समाज बायबलमध्ये भविष्यवाणी केल्याप्रमाणे, ‘देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणाऱ्या’ लोकांनी भरलेला आहे. (२ तीमथ्य ३:१-५) अनेकांना, मनोरंजन ही जीवनातील प्रमुख गोष्ट वाटते. इतके मनोरंजन उपलब्ध आहे की ज्यामुळे अधिक महत्त्वपूर्ण गोष्टी सहजपणे दूर केल्या जाऊ शकतात. याशिवाय, पुष्कळसे आधुनिक मनोरंजन लैंगिक अनैतिकता, हिंसा, मादक पदार्थांचा दुरूपयोग आणि इतर घोर हानीकारक आचरण सादर करते. (नीतिसूत्रे ३:३१) हानीकारक मनोरंजनापासून तरुणांचे संरक्षण करण्यास काय केले जाऊ शकते?
२२. मुलांनी मनोरंजनाच्या बाबतीत सुज्ञ निर्णय घेण्यासाठी पालक त्यांना कसे प्रशिक्षण देऊ शकतात?
२२ पालकांनी मर्यादा आणि निर्बंध लावण्याची गरज आहे. परंतु यापेक्षा अधिक म्हणजे, त्यांनी मुलांना कोणते मनोरंजन हानीकारक आहे आणि अधिक मनोरंजन म्हणजे किती, हे कसे ठरवावे ते शिकवण्याची गरज आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याकरता वेळ आणि प्रयत्न लागतो. एका उदाहरणाचा विचार करा. दोन मुले असलेल्या एका पित्याने त्याचा थोरला मुलगा रेडिओच्या नवीन केंद्राचे कार्यक्रम अनेकदा ऐकत असल्याचे निरीक्षिले. एके दिवशी आपल्या ट्रकने कामाला जात असताना त्याने तेच केंद्र लावले. वेळोवेळी थांबून विशिष्ट गाण्यातील बोल त्याने थोडक्यात टिपले. नंतर त्याने ऐकलेल्या गोष्टींची चर्चा आपल्या मुलांसोबत बसून केली. सुरवातीला त्याने “तुम्हाला काय वाटते,” असे दृष्टिकोनात्मक प्रश्न विचारले आणि धीराने त्यांची उत्तरे ऐकली. बायबलचा उपयोग करून या बाबीवर तर्क केल्यावर, त्या केंद्रावरील कार्यक्रम न ऐकण्याचे मुलांनी कबूल केले.
२३. पालक त्यांच्या मुलांचे अहितकर मनोरंजनापासून संरक्षण कसे करू शकतील?
२३ सुज्ञ ख्रिस्ती पालकांनी त्यांच्या मुलांना आवडत असलेले संगीत, टी. व्ही. कार्यक्रम, व्हिडीओ टेप, विनोदी पुस्तके, व्हिडीओ गेम आणि चित्रपट यांचे परीक्षण केले पाहिजे. ते वेष्टनावरील चित्र, गीताचे बोल आणि वेष्टन पाहतात व वर्तमानपत्रांतील टीकात्मक लेख वाचतात आणि उतारे पाहतात. आज मुलांना दाखवल्या जात असलेल्या काही ‘मनोरंजनामुळे’ तर अनेकांना धक्काच बसतो. अशुद्ध प्रभावांपासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्याची इच्छा असणारे, बायबल आणि बायबलवर आधारित असलेली प्रकाशने जसे की तरुण लोक विचारत असलेले प्रश्न—उपयोगी पडणारी उत्तरे (इंग्रजी) आणि टेहळणी बुरूज व सावध राहा!c या नियतकालिकांमधील लेखांचा वापर करून कुटुंबासोबत बसून धोक्यांची चर्चा करतात. पालक, दृढ आणि वाजवी असून अढळ मर्यादा घालतात तेव्हा सामान्यपणे त्यांना चांगले परिणाम पाहावयास मिळतात.—मत्तय ५:३७; फिलिप्पैकर ४:५.
२४, २५. कुटुंबे एकत्र मिळून आनंद लुटू शकतात असे करमणुकीचे काही हितकर प्रकार कोणते आहेत?
२४ अर्थात, हानीकारक प्रकारच्या मनोरंजनावर निर्बंध घालणे झगडण्याचा केवळ एक भाग आहे. वाईटाची भरपाई चांगल्याने केली पाहिजे, नाहीतर मुले चुकीच्या मार्गाला लागतील. अनेक ख्रिस्ती कुटुंबांना सहलीला जाणे, पायरपेट करणे, कँपींग, खेळ आणि क्रीडा, नातेवाईक किंवा मित्रांना भेटण्यासाठी प्रवास करणे—अशा एकत्र मिळून मनोरंजन करण्याच्या अनेक उत्साही व हर्षाच्या स्मृती आहेत. काहींना, विरंगुळ्यासाठी एकत्र मिळून केवळ मोठ्याने वाचन करणे देखील सुख आणि सांत्वनाचा मोठा स्रोत असल्याचे दिसून आले आहे. इतरांना विनोद अथवा मनोवेधक गोष्टी सांगण्यात आनंद वाटतो. आणखी इतरांनी काही छंद विकसित केले आहेत, उदाहरणार्थ, लाकूडकाम करणे आणि इतर हस्तकला तसेच संगीताचे साहित्य वाजवणे, चित्र रंगवणे अथवा देवाच्या सृष्टीचा अभ्यास करणे. करमणुकीच्या या साधनांचा आनंद घेण्याचे शिकणाऱ्या मुलांचे, अशुद्ध मनोरंजनापासून संरक्षण होते आणि काहीही कार्य न करता केवळ बसून करमणूक करणे यापेक्षा अधिक काही मनोरंजनात आहे, असे ते शिकतात. केवळ पाहण्यापेक्षा भाग घेण्यात नेहमीच अधिक मौज असते.
२५ सामाजिक मेळावे देखील मनोरंजनाचा आणखी एक प्रतिफलदायक प्रकार असू शकतो. त्यावर उत्तम देखरेख असते आणि ते असामान्यपणे मोठे अथवा वेळ घेणारे नसल्यास, ते तुमच्या मुलांना केवळ मौजेपेक्षाही अधिक काही देऊ शकते. त्यामुळे मंडळीत प्रेमाचे बंधन मजबूत होण्यास मदत होऊ शकते.—पडताळा लूक १४:१३, १४; यहूदा १२.
तुमचे कुटुंब जगाला जिंकू शकते
२६. कुटुंबाचे अहितकर प्रभावांपासून संरक्षण करण्याच्या बाबतीत अधिक महत्त्वपूर्ण गुण कोणता आहे?
२६ तुमच्या कुटुंबाचे जगाच्या विध्वंसक परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी अधिक परिश्रमाची गरज असते यात काही प्रश्नच नाही. पण इतर गोष्टींपेक्षा एक अशी गोष्ट आहे जिच्यामुळे यश मिळणे शक्य होईल. ती आहे प्रेम! जिव्हाळ्याचे, प्रेमळ कौटुंबिक बंधन तुमच्या घराला सुरक्षित असलेली निवाऱ्याची जागा बनवील आणि वाईट परिणामांपासून बचाव करणाऱ्या दळणवळणाला चालना देईल. याशिवाय, दुसऱ्या प्रकारचे प्रेम—यहोवाबद्दलचे प्रेम विकसित करणे तर अधिक महत्त्वाचे आहे. असे प्रेम कुटुंबात झिरपते तेव्हा मुले मोठी होत असताना, जगिक प्रभावांना बळी पडून देवाला नाखुश करण्याच्या केवळ कल्पनेनेच त्यांना घृणा वाटण्याची अधिक शक्यता असते. तसेच, अंतःकरणापासून यहोवावर प्रेम करणारे पालक त्याच्या प्रेमळ, समंजस, संतुलित व्यक्तिमत्त्वाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील. (इफिसकर ५:१; याकोब ३:१७) पालकांनी असे केल्यास, यहोवाची उपासना प्रतिबंध यादीप्रमाणे किंवा मौजमजा वा हास्य विरहित जीवनक्रम ज्यापासून शक्यतो होता होईल तितक्या लवकर पळ काढावा असे पाहण्याचे कारण त्यांच्या मुलांजवळ राहणार नाही. उलटपक्षी, ते देवाची उपासना करण्याकडे शक्यतो आनंदी अधिक समाधानी जीवन असे पाहतील.
२७. कुटुंब जगाला कसे जिंकू शकते?
२७ जी कुटुंबे ऐक्याने, देवाची आनंदी, संतुलित सेवा करतात व या जगाच्या भ्रष्ट प्रभावांपासून “निर्दोष व निष्कलंक” राहण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करतात ती यहोवाला आनंद देण्याचे कारण ठरतात. (२ पेत्र ३:१४; नीतिसूत्रे २७:११) अशी कुटुंबे, ज्याने स्वतःस अशुद्ध करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाचा विरोध केला त्या येशू ख्रिस्ताच्या पावलांचे अनुकरण करतात. येशू, त्याच्या मानवी जीवनाच्या समाप्तीला असे म्हणू शकला: “मी जगाला जिंकले आहे.” (योहान १६:३३) तुमचे कुटुंब देखील जगाला जिंको आणि अनंतकाळ जीवनाचा आनंद लुटो!
a पुरवणी शिक्षणाच्या चर्चेसाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण (इंग्रजी) या माहितीपत्रकातील पृष्ठे ४-७ पाहा.
b येथे ‘हसणे’ यासाठी अनुवादित केलेला इब्री शब्द “खेळणे,” “मनोरंजन सादर करणे,” “साजरा करणे” किंवा “मजा करणे,” असा पण अनुवादित केला जाऊ शकतो.
c वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी द्वारा प्रकाशित.