गीत २८ (२२४)
‘माझे जूं. . .घ्या’
१. कष्ट करणाऱ्यांनो,
भाराने त्रासल्यांनो,
येशू बाही मायेने,
‘इथे या,’ विश्रामाते.
२. सौम्य, लीन मी असे,
जगाचा भागी नसे.
मजपाशी शिकुन,
चुकवा द्वेषबाण.
३. ओझे माझे हलके,
जूं असते सोयीचे.
देतो धर्मीजनांस,
चित्ताच्या विसाव्यास.
४. जो एकनिष्ठ त्यास,
देई तो निर्देशास.
त्याच्यासह जूं वाहाल,
की, दैवी इच्छा कराल.