गीत २४ (१८५)
पुनरुत्थान—देवाची प्रेमळ तरतूद
१. स्वर्गीय दया असे
मानवी पुनरुत्थान.
बलीदानाने ख्रिस्ताच्या,
दैवी प्रीतीचे प्रमाण.
लहान कळपा
प्रथम जीवनमुकुट.
राहून विश्वासू वाहतील
राज्याचा शकट.
२. मिळेल साक्षिदारांच्या
मेघासही जीवन.
अधिक चांगल्या
पुनरुत्थानाचे त्यां वचन.
‘इतर मेंढरे’ जी
मरण पावतील,
करण्या गौरव देवाचे
झणी उठतील.
३. शब्द येशूचा कबरेत
सर्वांच्या कानी.
आनंदात तेही
नाहतील नंदनवनी.
अखेर चाचणी येशूच्या
राज्याच्या अंती.
तया आशिष सैतानाच्या
पाशा जे टाळती.
४. ‘इतर मेंढरां’नो नि
“लहान कळपा”,
मरण जे पावले,
पुन्हा भेटतील, सांगा.
आज्ञापिलेली प्रभूने
सत्कर्मे विपुल करा.
मृत्यूची नसे बाधा
मिळण्यात प्रतिफळ.