गीत ६ (४५)
उपकारस्तुतीची प्रार्थना
१. स्तुत्य नि दयाघना यहोवा,
मारितो हाक सर्वेशा तुवा.
आम्ही येतो रे जवळी तुझ्या.
राहतो खाली तव पंखाच्या.
प्रमाद म्हणे अशक्त आम्हा,
पापास्त व मागू तुझी क्षमा.
पुत्ररुधिर दे आम्हालागी.
इच्छा मिळो शिकवण तुझी.
२. तव प्रकाशाच्या दरबारी,
धन्य ते जन ज्यां तू निमंत्री.
पवित्र तुझे गृह, वचन,
तू चांगला, वाटे समाधान.
न्याय्य शक्ती तुझी भयकारी,
न्याय समयी शांतता करी.
हो राज्याचे स्वागत तारका.
प्रचार त्याचा यशवंत सदा.
३. तव ध्यानाने आनंद व्हावा,
धरणी पाहो भक्तीने तुवा.
सद्गुणांचा ‘राज्या’ स मंदिल,
सर्व दुःख अश्रू ते पूशील.
येशू निर्दाळील दुष्टाईला,
सृष्टी ही करील चित्काराला.
आभार गाऊ, घोष विजयी:
“स्तुती हो राजेश्वर यहोवाची”.