गीत ४ (४३)
व्हा पुढे, राज्य-सेवकांनो!
१. व्हा पुढे राज्य प्रचाराला,
देशांच्या जनतेला.
शेजाऱ्याप्रती मनी प्रीति,
नि दीनां सहाय्याला.
देवाची करण्यास सेवा,
ध्यान द्या अपल्या पेहरावा.
ही सेवा अपुली मोलाची,
धन्यवाद याहचा व्हावा.
(समूह)
२. करी सेवका तू प्रगती,
जीवनफल हो नेत्री.
त्यागिलेल्या न पाही,
बल प्राप्त वचने करी.
संदेश वाहका तू राही,
अलगसा या जगती.
नश्वर जगा दूर सारी,
सेवकास शोभे अती.
(समूह)
३. ऐक्याने प्रगती करूया,
मेंढरे नि निःशेष.
नारी, नर सर्व असती,
सत्याच्या आघाडीस.
अती पवित्र होय सेवा,
तीस करूया गौरवी.
सत्याच्या प्रेमिकां सुख दे,
परमेशाला थोरवी.
(समूह)
होऊ पुढे,
साक्ष दिगंती देऊया राज्याला.
जाऊ पुढे,
एकनिष्ठ राहूया यहोवाला.