गीत ९ (३७)
देवाच्या लेखी लौकिक प्राप्त करणे
१. उत्कंठा मिळो
देवाची मान्यता.
देण्या संतोष,
मना लागे चिंता.
लौकिक त्या लेखी,
आपण जाणिले,
यत्न पाहिजे
तसे केले.
२. पावू लौकिक,
वाचे, वर्तनाने.
हृदयी तैसी
इच्छा असल्याने.
देवाप्रती वळू,
उत्तम नाम करू;
त्याच्या आशीषा,
पात्र ठरू.
३. पावू लौकिक,
देवा ध्यान देत.
जोवरी जीव,
तो त्याचे अगत्य.
वचनाकरिता लढू,
यत्न करू;
त्या गौरवू नि
मित्र ठरू.
४. देवाच्या लेखी,
उत्तम लौकिकाते,
टाका पावले,
दिवस घोर हे.
योग्य ते करुया,
प्रकाशी चालूया;
घोषणा राज्याची
करुया.