गीत १ (१३)
ख्रिस्ती समर्पण
१. यहोवाने निर्मिल्याने
विश्व महान अती,
निर्मिती त्याच्या
सगळ्या अंकीत असती.
दे जीवनश्वास,
दाखवी प्राणिमात्राला,
तो पात्र उपासनेला
आणि त्यांच्या प्रशंसेला.
२. सीनायापाशी प्राचीन
इस्राएल म्हणे,
पाळू नेम यहोवाचा
आम्ही आनंदाने.
त्यांस घे सागरातुनी,
होता त्यांचा धनी,
व्हावे एक राष्ट्र सदैव
समर्पितांचे त्यांनी.
३. कर्तव्य करण्याला
येशू बाप्तिस्मा घेई.
देवाची करण्या
मनसा सादर होई.
अभिषिक्त देवपुत्र
जलातुन ये वरी,
जन पवित्र म्हणोनि
सेवा एकनिष्ठ करी.
४. येतो गौरवाया
तुझे नाम हे महान.
करू जीवन अर्पण
स्वतःस त्यागून.
एकूलता तू दिलास,
ती किंमत मोठी,
आता अमुचे जगणे
वा मरणे तुजसाठी.