गीत २ (१५)
चिरजीवन अहा!
१. दिसते का तुम्हाला,
ऐक्य असे जनात?
दुःखे गेली, नि आली,
शांती, सौख्य जगी
(समूह)
२. नांदती प्रेमभरे,
मानव नि पशू ते
अन्न असे, देतसे,
यहोवा ते सर्वां.
(समूह)
३. वृद्धांचे कोमल हो,
अंग असा तो काळ
चिंता गेल्या सगळ्या,
कारण ना भया.
(समूह)
४. ईशाचे सुखलोकी
मोदे गाती गौरव.
प्रतिदिनी वचनी,
देऊ देवा आभार.
(समूह)
आनंदे मुक्त गा. या; सहभागी व्हा.
खरे जगा नि वदा: “चिरजीवन अहा!”