वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • uw अध्या. १४ पृ. ११०-११६
  • ‘मी तुम्हाला राज्य नेमून देतो’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘मी तुम्हाला राज्य नेमून देतो’
  • उपासनेतील ऐक्य
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • राज्याच्या वारसांना गोळा करणे
  • आत्मिक पुत्र—त्यांना कसे कळते?
  • योग्यपणे सहभागी होणे
  • “आम्ही तुम्हांबरोबर येतो”
  • प्रभूच्या सांज भोजनाचा तुमच्याकरता काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • स्वर्गीय पाचारण खरोखर कोणाला आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • ख्रिस्ताचा स्मारकविधी आपण का साजरा करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • तुम्हाला “सत्याचा आत्मा” मिळाला आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
उपासनेतील ऐक्य
uw अध्या. १४ पृ. ११०-११६

अध्याय १४

‘मी तुम्हाला राज्य नेमून देतो’

१. येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने त्याच्या प्रेषितांपुढे कोणती आशा ठेवली?

येशूला मारण्याच्या आधल्या रात्री त्याने त्याच्या विश्‍वासू प्रेषितांना सांगितले: ‘माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो, ह्‍यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.’ त्याने त्यांना पुढे म्हटले: “जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हास नेमून देतो.” (योहा. १४:२, ३; लूक २२:२९) त्याने त्यांच्यापुढे किती अद्‌भुत भविष्य ठेवले!

२. ख्रिस्तासोबत त्याच्या स्वर्गीय राज्यात किती जण सहभागी होतील?

२ परंतु केवळ ते प्रेषितच त्याच्याबरोबर स्वर्गीय राज्यात शासन करतील, असा येशूच्या बोलण्याचा अर्थ नव्हता. पृथ्वीवरून सोडवून आणलेल्या १,४४,००० जणांना तो विशेषाधिकार मिळेल असे कालांतराने प्रकट केले गेले. (प्रकटी. ५:९, १०; १४:१, ४) तो प्राप्त करण्यासाठी आज कोणी प्रयत्न करत आहे का?

राज्याच्या वारसांना गोळा करणे

३. त्याच्या सार्वजनिक सेवेमध्ये, येशूने कोणत्या संधीकडे लक्ष वेधले?

३ हेरोद अंतिपाने बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाला अटक केल्यानंतर येशूने जाहीर प्रचाराची प्रखर मोहीम हाती घेतली. त्यात त्याने ‘स्वर्गाच्या राज्या’वर लक्ष केंद्रीत केले. (मत्त. ४:१२, १७) त्यात प्रवेश करण्याची संधी त्यांना असेल याची जाणीव त्याने लोकांना करून दिली. व त्याच्या शिष्यांनी ते बक्षीस मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.—मत्त. ५:३, १०, २०; ७:२१; ११:१२.

४. (अ) येशूच्या शिष्यांमधील पहिल्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा कधी झाला? (ब) तेव्हापासून, राज्याच्या वारसांना गोळा करण्याकडे लक्ष दिले जात होते असे कशावरून दिसून येते?

४ इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टला त्यातल्या पहिल्या लोकांचा पवित्र आत्म्याने अभिषेक झाला. (प्रे. कृत्ये २:१-४; २ करिंथ. १:२१, २२) अमर स्वर्गीय जीवनात पर्यवसान होणाऱ्‍या उद्धाराची देवाची तरतूद जाहीर केली गेली. हे ज्ञान खुले करण्यासाठी पेत्राने “स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या”—प्रथम यहूदी, मग शमरोनी, व त्यानंतर परराष्ट्रीयांसाठी—वापरल्या. (मत्त. १६:१९) मानवजातीवर १,००० वर्षे राज्य करील अशा शासनाचे गठन करण्याकडे विशेष लक्ष दिले जात होते. आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रातली बहुतेक सर्व प्रेरित पत्रे, राज्याच्या वारसांच्या—‘पवित्र जनां’च्या, ‘स्वर्गीय पाचारणाच्या भागिदारां’च्या—याच गटाला उद्देशून लिहिलेली आहेत.a

५. त्यांच्यापूर्वीच्या देवाच्या सेवकांपेक्षा अधिक चांगले असल्यामुळे त्यांना स्वर्गीय जीवनाचे पाचारण झाले होते का?

५ स्वर्गीय जीवनासाठी ज्यांना पाचारण झाले ते, इ.स.३३ च्या पेन्टेकॉस्टपूर्वी मरण पावलेल्या देवाच्या सर्व सेवकांपेक्षा, काही कारणाने अधिक चांगले असल्यामुळे नव्हे. (मत्त. ११:११) तर, येशू ख्रिस्तासोबत सह-शासक होणाऱ्‍यांची निवड करण्यास यहोवाने आता सुरूवात केली होती. त्यानंतर सुमारे १९ शतके केवळ एकच पाचारण, स्वर्गीय पाचारण, होते. त्याचा स्वतःचा सूज्ञ व प्रेमळ उद्देश साध्य करण्यासाठी देवाने मोजक्या लोकांवर ती अपात्रित कृपा केली होती.—इफिस. २:८-१०.

६. (अ) स्वर्गीय पाचारण संपुष्टात येण्याची वेळ का येईल? (ब) ‘दुसऱ्‍या मेंढरां’बद्दलची भविष्यवाणीदेखील पूर्ण व्हावी म्हणून कोण घटनांचे मार्गदर्शन करील, आणि वास्तवात काय घडले आहे?

६ होता होता नियोजित पण मर्यादित १,४४,००० जणांची संख्या पूर्ण होईल. मान्यता प्राप्त म्हणून या आत्मिक इस्राएलांवर अंतिम शिक्का मारण्याचे काम नजिक असेल. (प्रकटी. ७:१-८) त्याच्या आत्म्याद्वारे व त्याच्या दृश्‍य संस्थेला त्याने दिलेल्या त्याच्या वचनाच्या अर्थबोधाने, प्रकटीकरण ७:९-१७ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे, त्याच्या उद्देशाचा आणखी एक भाग पूर्ण करण्याच्या दृष्टीने, यहोवा घटनांचे मार्गदर्शन करील. मोठ्या संकटातून वाचण्याची व पृथ्वीवरील नंदनवनामध्ये पूर्णतेत अनंत काळ जगण्याची आशा असलेला, एक “मोठा लोकसमुदाय”, सर्व राष्ट्रांतून गोळा केला जाईल. प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टींचा विचार करता, ‘मोठ्या लोकसमुदाया’ची पार्थिव आशा स्पष्टपणे लक्षात आली तेव्हा, इ.स. १९३५ साली, स्वर्गीय पाचारण सर्वसाधारणपणे संपुष्टात आले असल्याचे उघड आहे असे वाटते. तेव्हा पासून, या पृथ्वीवरच अनंतकाळ जगण्याची तीव्र आशा असलेले यहोवाचे लाखो उपासक, तुलनात्मक दृष्ट्या मोजक्या अशा, स्वर्गीय गटाच्या काही हजार शेष लोकांच्या संगतीत आणले गेले आहेत.

७. आजही कोणाला स्वर्गीय पाचारण होणे शक्य आहे का, आणि तुम्ही असे उत्तर का देता?

७ आता देव कोणालाही स्वर्गीय जीवनासाठी पाचारण करत नाही, असा याचा अर्थ आहे का? अंतिम शिक्कामोर्तब होईपर्यंत, ती आशा असलेले काही अविश्‍वासू होण्याची शक्यता आहे व त्यांची जागा घेण्यासाठी इतरांची निवड करावी लागेल. परंतु तसे होण्याची शक्यता फारच विरळ असावी हे वाजवी वाटते.

आत्मिक पुत्र—त्यांना कसे कळते?

८. पवित्र आत्म्याने जन्मलेल्यांना, त्या गोष्टीची जाणीव कशी असते हे दाखवताना, पौलाने काय खुलासा दिला आहे?

८ स्वर्गीय पाचारण झालेल्या बाप्तिस्माप्राप्त ख्रिश्‍चनांना देवाचा आत्मा, आत्मिक पुत्र म्हणून दत्तकपणाची खात्री देतो. रोममधील ‘पवित्र जनां’ना पौलाने पत्र लिहिले तेव्हा, त्या काळी सर्व ख्रिश्‍चनांच्या स्थितीचे वर्णन करताना त्याने हे दर्शवले. तो म्हणाला: “जितक्यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत; कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण अब्बा, बापा, अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो; आणि जर मुले तर वारीसही आहो, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतचे वारीस असे आहो; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच.”—रोम. १:७; ८:१४-१७.

९. “तो आत्मा”, जी खरोखरीच देवाची मुले आहेत ‘त्यांच्या आत्म्याबरोबर’ कशी साक्ष देतो?

९ येथे “आत्मा” या शब्दाच्या दोन अर्थांकडे आपले लक्ष वेधण्यात आले आहे: “तो आत्मा” व ‘आपला आत्मा’. पहिला आत्मा ही देवाची अदृश्‍य कार्यकारी शक्‍ती होय. देवाची मुक्‍त मुले या नात्याने तो त्याच्या आत्मिक मुलांमध्ये दत्तकपणाची खात्री उत्पन्‍न करतो. त्याच्या आत्मिक मुलांना लिहिलेल्या खाजगी पत्राप्रमाणे असलेल्या देवाच्या वचनाद्वारे, पवित्र शास्त्राद्वारे, देखील तो आत्मा साक्ष देतो. (१ पेत्र १:१०-१२) देवाचे आत्मिक पुत्र असलेल्यांना उद्देशून पवित्र शास्त्र जे म्हणते ते, पवित्र आत्म्याने जन्मलेले लोक जेव्हा वाचतात तेव्हा, ‘हे मला लागू होते’ असा उचित प्रतिसाद ते देतात. अशा रीतीने, देवाची स्वतःची कार्यकारी शक्‍ती, त्यांच्या आत्म्याला, त्यांच्या स्वतःच्या मनाला व हृदयाला प्रेरणा देणाऱ्‍या शक्‍तीला, साक्ष देते की, ते देवाची मुले आहेत. देवाच्या आत्म्याच्या सूचनेला अनुसरून त्यांची मने व हृदये, ख्रिस्तासोबत सह-वारिस होण्याच्या आशेवर स्थिरावतात आणि देवाची आत्मिक मुले असण्याची जबाबदारी स्वीकारतात.—फिलिप्पै. ३:१३, १४.

१०. (अ) कोणत्या गोष्टींच्या केवळ अस्तित्वामुळे ती व्यक्‍ती, अभिषिक्‍त ख्रिस्ती म्हणून ओळखली जात नाही? (ब) “दुसरी मेंढरे” देवाच्या उद्देशातील त्यांच्या स्थानाबद्दल कोणता दृष्टिकोन ठेवतात?

१० हे तुमच्या बाबतीत खरे आहे का? असल्यास, तुम्हाला अद्‌भुत विशेषाधिकार आहेत. परंतु, एखाद्या व्यक्‍तीला गहन आत्मिक गोष्टींची मोठी कदर आहे, किंवा त्याला क्षेत्र-सेवेचा उत्साह आहे, वा त्याच्या बंधूंवर त्याचे अत्यंत प्रेम आहे, म्हणून तो पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिस्ती असला पाहिजे, असे अनुमान काढणे चुकीचे ठरेल. याच गोष्टी ‘इतर मेंढरां’तील अनेकांच्या स्वभावाची वैशिष्ठ्ये आहेत. ख्रिस्ताच्या सह-वारसांबद्दल पवित्र शास्त्रात वाचलेल्या गोष्टींमुळे त्यांच्याही भावना जागृत होतात. पण देवाने त्यांच्यासाठी राखून न ठेवलेल्या गोष्टींवर आपला हक्क असल्याचा दावा करण्याचे धाडस ते करीत नाहीत. (पडताळा गणना १६:१-४०.) पृथ्वीविषयी देवाच्या मूळ उद्देशाला ते मानतात व त्यात सहभागी होण्यासाठी जाणीवपूर्वक कार्य करतात.

योग्यपणे सहभागी होणे

११. येशूच्या वार्षिक स्मरणोत्सवाला कोण उपस्थित राहतात, व का?

११ दर वर्षी निसान १४ला सूर्यास्तानंतर, येशूने त्याच्या प्रेषितांना दिलेल्या सूचनांना अनुसरून, जगाच्या सर्व भागातील त्याचे अभिषिक्‍त अनुयायी त्याच्या मृत्यूचा स्मरणोस्तव करतात. (लूक २२:१९, २०) तेथील भाकरी व द्राक्षारसात सहभाग घेणारे म्हणून नव्हे, तर आदराने निरिक्षण करणारे म्हणून, “इतर मेंढरे”ही उपस्थित राहतात.

१२. प्रभूच्या सांज भोजनाला उचित आदर प्रदर्शित करण्यात, करिंथमधले सुरूवातीचे काही ख्रिस्ती कसे उणे पडत होते?

१२ हा पोकळ धार्मिक विधी नसून, प्रभावी अर्थाने परिपूर्ण आहे. “जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्‍त ह्‍या संबंधाने दोषी ठरेल” असे म्हणून, ग्रीसमधल्या करिंथ येथील पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलाने गंभीर सल्ला लिहिला. ते कशामुळे “अयोग्य” भागीदार झाले? त्यांनी स्वतःच्या हृदयाची व मनाची योग्य ती तयारी केली नव्हती. त्या मंडळीमध्ये पक्षभेद होते. तसेच त्या सभेपूर्वी काही जण, खाण्या-पिण्यात अतिसेवन करत होते. प्रभूच्या सांज-भोजनाला ते तुच्छ लेखत होते. त्या भाकरी व द्राक्षारसाचे गंभीर महत्त्व ध्यानात येण्याच्या अवस्थेत ते नव्हते.—१ करिंथ. ११:१७-३४.

१३. स्मारकदिनाच्या वेळी दिल्या जाणाऱ्‍या भाकरी व द्राक्षारसाचे महत्त्व काय?

१३ ते महत्त्व कोणते? त्या भाकरी व द्राक्षारसाच्या काल्पनिक आश्‍चर्यकारक बदलात ते नाही. प्रत्येक स्मारकदिनाला, कोणत्याहि अर्थाने, ख्रिस्ताचे बलिदान पुन्हा होत नाही. पवित्र शास्त्र म्हणते की, “ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला.” (इब्री. ९:२८; १०:१०; रोम. ६:९) ती बेखमीर भाकरी व लाल द्राक्षारस ही, येशूने अर्पण केलेल्या खरोखरच्या शरीराचे आणि सांडलेल्या खरोखरच्या रक्‍ताचे प्रतिनिधित्व करणारी केवळ प्रतीके आहेत. आणि या वास्तविक गोष्टी किती बहुमोल आहेत! मानवजातीच्या जगाला अनंतकाळ जगण्याची संधी मिळावी म्हणून येशूचे पापरहित मानवी शरीर दिले गेले. (योहा. ६:५१) आणि त्याच्या वाहिलेल्या रक्‍ताने—त्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या मानवांना पापापासून शुद्ध करणे, तसेच आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या बनलेल्या आत्मिक इस्राएलांची मंडळी व देव यांच्यातील नवीन करार अमलात आणणे—हे दोन उद्देश साध्य होतात. (१ योहान १:७; १ करिंथ. ११:२५; गलती. ६:१४-१६) या बहुमोल तरतुदींनीच, त्या ‘लहान कळपा’च्या सभासदांना देवाने नीतिमान ठरवणे, मानवी पूर्णता त्यांच्या ठायी खरोखर लेखणे, शक्य केले आहे. (लूक १२:३२) ख्रिस्तासोबत त्याच्या स्वर्गीय राज्यात त्यांना सहभागी होता यावे या हेतूने, पवित्र आत्म्याने देवाचे पुत्र म्हणून त्यांना जन्माला घालता यावे यासाठी, असे केले जाते. दर वर्षी स्मारकदिनाच्या प्रतीकांमध्ये ते सहभागी होतात व अशा रीतीने त्यांच्या स्वर्गीय आशेबद्दल साक्ष देतात तेव्हा, ख्रिस्ताने मध्यस्ती केलेल्या ‘नवीन करारा’त असल्याबद्दल त्यांच्या जाणिवेला उजाळा मिळतो व ती अधिक सखोल होते.—इब्री. ८:६-१२.

“आम्ही तुम्हांबरोबर येतो”

१४. (अ) “दुसरी मेंढरे” स्मारकदिनाच्या प्रतीकांमध्ये सहभागी का होत नाहीत, पण उत्सुकतेने ते कशाची आशा करतात? (ब) राज्याच्या वारसांबरोबरच्या त्यांच्या सहवासाकडे ते कोणत्या दृष्टीने पाहतात?

१४ यहोवा त्याच्या अभिषिक्‍त लोकांशी कसा व्यवहार करत आहे हे ‘दुसऱ्‍या मेंढरां’नी जाणले आहे. आणि “आम्ही तुम्हांबरोबर येतो, कारण देव तुम्हांबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे,” असे म्हणत ते त्यांच्यात सामील झाले आहेत. (जख. ८:२०-२३) ते एकत्र जमतात इतकेच नव्हे तर, सर्व राष्ट्रांत राज्याची सुवार्ता गाजवण्यात ते सहभागी होतात. परंतु आत्मिक इस्राएलांबरोबर ‘दुसऱ्‍या मेंढरां’ना ‘नवीन करारा’त घेतले जात नाही वा स्वर्गीय जीवनात त्याच्याबरोबर सहभागी होण्यासाठी येशूने ज्यांना ‘राज्य नेमून दिले’, त्यांच्यात यांचा समावेश केलेला नाही. आणि या कारणासाठी उचितपणे, ते स्मारकदिनाच्या प्रतीकांमध्ये सहभागी होत नाहीत. (लूक २२:२०, २९) परंतु “लहान कळपा”च्या शेवटल्या सभासदांना स्वर्गीय राज्यात एकत्रित करण्याचा आपला उद्देश “नवा करार” जसजसा साध्य करतो, तसे त्या राज्याने पृथ्वीवर त्यांना मिळणारे आशीर्वाद जवळ येत आहेत असे सूचित होत असल्याचे, ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ लक्षात येते. ‘शेवटल्या काळा’त राज्याच्या वारसांतील एकनिष्ठ शेष लोकांसोबत एकदिलाने सेवा करण्याला ते विशेषाधिकार मानतात.

[तळटीपा]

a रोमकरांस, १ व २ करिंथकरांस, इफिसकरांस, फिलिपैकरांस, कलस्सैकरांस, तीतास, १ व २ पेत्र यांतील सुरूवातीची वचने; तसेच गलतीकरांस ३:२६-२९, १ थेस्सलनीकाकरांस २:१२, २ थेस्सलनीकाकरांस २:१४, २ तीमथ्य ४:८, इब्रीयांस ३:१, याकोब १:१८, १ योहान ३:१, २ व यहूदा १ पहा.

पुनरावलोकन चर्चा

• ख्रिस्ती ग्रीक शास्त्र वचनातील बराचसा भाग स्वर्गीय आशेकडे लक्ष का वेधतो?

• देवाचे पुत्र म्हणून जन्म झालेल्यांना ते कसे कळते? ते ज्यात सहभागी होतात त्या, स्मारकदिनाच्या प्रतीकांचा अर्थ काय?

• “लहान कळपा” बरोबर त्यांची खरोखर एकता झाली असल्याचे, “दुसरी मेंढरे” कसे दर्शवतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा