Georgette Douwma/Stone via Getty Images
पृथ्वीचा श्वास कोंडतोय!
महासागर
महासागरांमुळे आपल्याला बरेच खाण्याचे पदार्थ तर मिळतातच, पण त्यासोबतच औषधं तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीसुद्धा मिळतात. पृथ्वीवर ऑक्सिजनचा निम्मा वाटा हा महासागरांतूनच तयार होतो. शिवाय, महासागर कार्बनचे वेगवेगळे घातक वायू शोषून घेतात. इतकंच नाही तर, आपलं पृथ्वीवरचं वातावरण संतुलित ठेवण्याचं कामसुद्धा महासागर करतात.
महासागर धोक्यात
हवामान बदलांमुळे समुद्री प्रवाळ, कवच असणारे जलचर आणि सागरी जीवन यांना धोका निर्माण झालाय. आणि सागरातलं जवळजवळ एक चतुर्थांश जीवन समुद्री प्रवाळांवर अवलंबून आहे. पण, वैज्ञानिकांचा असा अनुमान आहे, की पुढच्या ३० वर्षांमध्ये संपूर्ण प्रवाळ नष्ट होण्याचा धोका आहे.
तज्ज्ञांचा असा अंदाज आहे, की जवळजवळ ९०% सागरी प्राण्यांच्या खाण्यात प्लॅस्टिक गेलं असावं. शिवाय असं मानलं जातं, की महासागरात मिसळणाऱ्या प्लॅस्टिकमुळे दरवर्षी समुद्रातल्या लाखो प्राण्यांचा बळी जातोय.
“आपण महासागरांच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवलाय आणि त्यामुळे आज त्यांच्या बाबतीत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे,” असं संयुक्त राष्ट्र संघाचे सचिव अँटोनियो ग्युटारेस यांनी २०२२ मध्ये म्हटलं.
पृथ्वीची नुकसान भरून काढायची क्षमता
महासागर आणि त्यांच्यातल्या सजीव सृष्टीची क्षमता अशा प्रकारे आहे की मानव निर्मित प्रदूषणाचा जास्त प्रभाव नसेल, तर ते स्वतःला स्वच्छ आणि स्वस्थ ठेवू शकतात. एका पुस्तकातa असं म्हटलंय, की “जर माणसांनी समुद्र दूषित करायचं बंद केलं, तर स्वतःचं नुकसान भरून काढण्याची समुद्राची क्षमता सुरळीतपणे चालू राहू शकते.” याची काही उदाहरणं पाहा:
जागतिक तापमान वाढीसाठी सगळ्यात जास्त कारणीभूत असलेला वायू म्हणजे कार्बन डायऑक्साइड. पण महासागरात वनस्पतीसारखा दिसणारा सूक्ष्मजीव फायटोप्लांकटन (प्लवक) हा कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो आणि साठवून ठेवतो. पृथ्वीवर असणारी सगळी झाडं, गवत आणि जमिनीवर उगवणाऱ्या सगळ्या वनस्पती जितका कार्बन डायऑक्साइड साठवून ठेवू शकतात तितकाच कार्बन डायऑक्साइड फायटोप्लांकटन साठवून ठेवू शकतो.
मेलेल्या माशांच्या शरीरावर सागरी पाण्यात असलेले सूक्ष्मजीव जगतात. नाहीतर समुद्राचं पाणी दूषित झालं असतं. आणि पुढे याच सूक्ष्मजीवांवर इतर सागरी प्राणी जगतात. या अन्न साखळीमुळेच “समुद्राचं पाणी शुद्ध आणि स्वच्छ राहतं.” असं, स्मिथसोनियन इंस्टिट्यूशन ओशन पोर्टल नावाच्या वेबसाईटमध्ये सांगितलंय.
बरेच सागरी प्राणी आपल्या पचनसंस्थेद्वारे आम्लधर्मी (ॲसिडिक) सागरी पाण्याचं रूपांतर अल्कधर्मी (अल्कलाईन) पाण्यात करतात. हे खूप फायद्याचं आहे. कारण आम्लधर्मी पाण्यामुळे प्रवाळ, कवच असलेले जलचर आणि इतर सागरी प्राण्यांना धोका निर्माण होऊ शकतो.
यावर केला जाणार उपाय
पुन्हापुन्हा वापरता येणाऱ्या पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्या वापरल्यामुळे समुद्रात येणारा प्लॅस्टिकचा कचरा कमी करता येईल
टाकाऊ पदार्थ जर समुद्राच्या पाण्यात गेलेच नाहीत, तर समुद्राच्या पाण्याला शुद्ध करायची गरजच पडणार नाही. म्हणून तज्ज्ञ, लोकांना असं प्रोत्साहन देतात की त्यांनी प्लॅस्टिकचं सामान एकदाच वापरून ते टाकून देण्याऐवजी, पुन्हा वापरता येतील अशा गोष्टींपासून बनवलेल्या पिशव्या, भांडी वगैरे वापरावीत.
पण अजूनही बरंच काही करणं गरजेचं आहे. अलीकडे एका पर्यावरणवादी संघटनेने एका वर्षात ११२ देशांच्या समुद्र किनारपट्टीवरून ९,२०० टन कचरा गोळा केला. हा कचरा लाटांमुळे किनाऱ्यावर जमा झाला होता. पण दरवर्षी समुद्रात जाणारा कचरा यापेक्षाही हजार पटीने जास्त आहे.
नॅशनल जियोग्राफिकने असा अहवाल दिलाय, की “[सागराचं] आम्लीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झालंय, की ते आता पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणणं जवळजवळ अशक्य आहे.” सागरी प्राण्यांना महासागराचं पाणी शुद्ध करायच्या क्षमतेसह निर्माण करण्यात आलंय. पण ‘मानवांनी इंधनाचा वापर करून समुद्राला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित केलंय, की ते आता पुन्हा शुद्ध करणं सागरी प्राण्यांना शक्य नाही.’
काही आशा आहे का?—बायबल काय म्हणतं?
“तू बनवलेल्या गोष्टींनी ही पृथ्वी भरलेली आहे. समुद्र किती मोठा, किती अफाट आहे! त्यात लहानमोठे असंख्य जीव राहतात.”—स्तोत्र १०४:२४, २५.
आपल्या निर्माणकर्त्याने महासागर बनवले आणि त्यांना स्वतःला शुद्ध करण्याची क्षमता दिली. विचार करा: जर त्याला समुद्राबद्दल आणि त्यातल्या जलचर प्राण्यांबद्दल इतकं काही माहीत आहे, तर मग महासागरांत झालेलं नुकसान तो भरून काढू शकत नाही का? पान १५ वरचा “आपली पृथ्वी टिकून राहील असं देवाने वचन दिलंय,” हा लेख पाहा.
a रिजनरेशन: एन्डींग द क्लायमेट क्रायसेस इन वन जनरेशन.