वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g21 क्र. १ पृ. १२-१३
  • देवाने दिलेलं सुंदर जीवनाचं वचन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाने दिलेलं सुंदर जीवनाचं वचन
  • सावध राहा!—२०२१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देव दुष्ट लोकांचा नाश करेल
  • देव सैतानाचा नाश करेल
  • देव आजारपण आणि मृत्यू काढून टाकेल
  • देव या पृथ्वीला एका सुंदर बागेसारखं बनवेल
  • देव मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करेल
  • पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • अनंतकालचे जीवन जगणे नुसते स्वप्न नव्हे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • तुम्हाला आनंदी भवितव्य मिळवता येईल!
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२१
g21 क्र. १ पृ. १२-१३
लोक प्राण्यांसोबत शांतीने राहत आहेत, भरपूर प्रमाणात अन्‍न उपलब्ध आहे आणि संपूर्ण पृथ्वी एका सुंदर बागेसारखी आहे.

देवाने दिलेलं सुंदर जीवनाचं वचन

देवाने वचन दिलं आहे, की भविष्यात लवकरच तो काही चांगले बदल घडवून आणणार आहे; जसं की, तो सगळ्या दुःखांचा अंत करणार आहे आणि माणसांना या पृथ्वीवर सुखाचं जीवन देणार आहे. (स्तोत्र ३७:११) देवाच्या या वचनावर आपण भरवसा का ठेवू शकतो? कारण, “देव काही माणूस नाही, की तो खोटं बोलेल.” (गणना २३:१९) तर मग, देव पृथ्वीवर जे चांगले बदल करणार आहे त्यांतले काही आता आपण पाहू.

देव दुष्ट लोकांचा नाश करेल

“जेव्हा दुष्ट लोक जंगली गवतासारखे वाढतात आणि वाईट कृत्यं करणाऱ्‍यांची भरभराट होते, तेव्हा त्यांचा कायमचा सर्वनाश ठरलेला असतो!”—स्तोत्र ९२:७.

पवित्र शास्त्रात खूप आधीच सांगितलं होतं, की शेवटच्या दिवसांत लोक फार वाईट वागतील. आणि आज अगदी असंच होत आहे. याबद्दल मागच्या लेखात आपण पाहिलं होतं. वाईट कामं दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. पण देव लवकरच जगातल्या सगळ्या वाईट लोकांचा नाश करणार आहे. त्यानंतर फक्‍त चांगले लोक, म्हणजे जे देवाच्या आज्ञांप्रमाणे वागतात ते या पृथ्वीवर कायम राहतील. त्याबद्दल पवित्र शास्त्र असं म्हणतं: “नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.”—स्तोत्र ३७:२९.

देव सैतानाचा नाश करेल

‘शांती देणारा देव लवकरच सैतानाला चिरडून टाकेल.’—रोमकर १६:२०.

सैतानाचा, दुष्ट स्वर्गदूतांचा आणि सगळ्या वाईट लोकांचा नाश झाल्यावर या पृथ्वीवर शांती असेल. देव असं वचन देतो, की त्यानंतर “कोणीही [तुम्हाला] घाबरवणार नाही.”—मीखा ४:४.

देव आजारपण आणि मृत्यू काढून टाकेल

“देवाचा तंबू माणसांजवळ आहे, . . . तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.”—प्रकटीकरण २१:३, ४.

सैतानामुळे, तसंच आदाम आणि हव्वामुळे आपल्याला जो त्रास सहन करावा लागतो तो देव लवकरच दूर करणार आहे. त्यानंतर कोणीही आजारी पडणार नाही आणि “कोणीही मरणार नाही.” जे देवावर प्रेम करतील आणि त्याच्या आज्ञांचं पालन करतील ते कायम जगतील. पण प्रश्‍न असा येतो, की ते कुठे जगतील?

देव या पृथ्वीला एका सुंदर बागेसारखं बनवेल

“ओसाड प्रदेश आणि कोरडी भूमी आनंदित होईल, वाळवंट हर्ष करेल आणि केशराच्या फुलांसारखा फुलेल.” —यशया ३५:१.

जगातून सगळ्या दुष्ट लोकांचा नाश केल्यावर देव या पृथ्वीचं रूपच बदलून टाकेल. ठिकठिकाणी बाग-बागिचे असतील आणि भरपूर अन्‍नपाणी असेल. (स्तोत्र ७२:१६) समुद्राचं आणि नद्यांचं पाणी खूप स्वच्छ असेल आणि त्यात राहणाऱ्‍या जिवांना कोणताही धोका नसेल. त्या वेळी “प्रदूषण” हा शब्दसुद्धा ऐकायला मिळणार नाही. लोक स्वतः आपली घरं बांधतील आणि त्यांत राहतील. मग पुन्हा कधीच कोणी बेघर होणार नाही, उपाशी झोपणार नाही किंवा गरीब असणार नाही.—यशया ६५:२१, २२.

देव मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करेल

“सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे.” —प्रेषितांची कार्यं २४:१५.

तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांना पुन्हा जिवंत झालेलं पाहायचं आहे का? नवीन जगात आपला सर्वशक्‍तिशाली देव हे नक्कीच करणार आहे. तो तुमच्या जवळच्या माणसांना पुन्हा जिवंत करणार आहे. तेव्हा तुम्ही त्यांना ओळखाल आणि तेही तुम्हाला ओळखतील. तो क्षण खरंच किती आनंदाचा असेल याची कल्पना करा! पण असं घडेल हे आपण इतकं खातरीने कसं म्हणू शकतो? कारण बायबलमध्ये अशा कितीतरी लोकांबद्दल सांगितलं आहे ज्यांना पुन्हा जिवंत करण्यात आलं आणि ते आपापल्या कुटुंबाला पुन्हा भेटू शकले. शिवाय, येशूने बऱ्‍याचदा सगळ्यांसमोर मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केलं.—लूक ८:४९-५६; योहान ११:११-१४, ३८-४४.

आता मी खरंच खूप आनंदीए!

रवी असं म्हणतात: “मी पहिल्यांदा नवीन जगाबद्दल ऐकलं तेव्हा मी मनातल्या मनात हसलो होतो. कारण दुःख नसेल, आजार नसेल आणि कोणीही मरणार नाही, हे कसं काय शक्य असं मला वाटलं होतं. पण बायबलचा अभ्यास केल्यावर या गोष्टींवर मी भरवसा का ठेवू शकतो हे मला समजलं. आता मला खातरी पटलीए, की बायबल हे देवाचं पुस्तक आहे. आधी मी नेहमी दुःखी असायचो, माझ्या चेहऱ्‍यावर नेहमी चिंता असायची. पण आता मी खरंच खूप आनंदीए! माझ्यातला हा फरक माझ्या कुटुंबातल्या लोकांना आणि मित्रांनासुद्धा दिसून आलाय.”

रवी.

आणखी जाणून घ्या:

एका सुंदर पृथ्वीवर लोकांनी कायम जीवन जगावं अशी आपल्या निर्माणकर्त्याची इच्छा आहे. त्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी jw.org/hi ही वेबसाईट पाहा. त्यात शास्त्र से जानिए > पवित्र शास्त्र से जवाब जानिए > ज़िंदगी और मौत हा भाग पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा