वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g20 क्र. ३ पृ. १४-१५
  • भेदभावावर कायमचा उपाय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भेदभावावर कायमचा उपाय
  • सावध राहा!—२०२०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एक चांगलं सरकार
  • १. चांगलं शिक्षण देईल
  • २. भावनिक जखमा भरून काढेल
  • ३. चांगलं नेतृत्व करणारा निवडेल
  • ४. एकी निर्माण करेल
  • भेदभाव​—⁠हा आजार तुम्हाला झाला आहे का?
    सावध राहा!—२०२०
  • यहोवा आणि येशूसारखं आपणही एकतेत राहू या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • भेदभावांचा अंत
    सावध राहा!—२००४
  • पूर्वग्रह अस्तित्वात नसेल तेव्हा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२०
g20 क्र. ३ पृ. १४-१५
वेगवेगळ्या वयोगटातले आणि देशाचे लोक एकत्र उभे आहेत आणि आनंदी आहेत.

भेदभावावर कायमचा उपाय

आधीच्या लेखांमध्ये सुचवलेल्या गोष्टींचं पालन केल्यामुळे लाखो लोकांना भेदभावाची भावना कमी करायला बरीच मदत झाली आहे. पण खरी गोष्ट ही आहे, की आपण स्वतःहून कधीच ही भावना पूर्णपणे मनातून काढू शकत नाही. मग याचा अर्थ असा होतो का, की भेदभाव कधीच नाहीसा होणार नाही?

एक चांगलं सरकार

समाजातून भेदभावाची भावना पूर्णपणे काढून टाकण्यात मानवी सरकारं कमी पडली आहेत. मग भेदभावाच्या आजारावर कोणताच उपाय नाही का?

भेदभाव कायमचा काढून टाकण्यासाठी कोणत्याही सरकाराला पुढे सांगितलेल्या गोष्टी कराव्या लागतील:

  1. १. लोकांना आपले विचार आणि आपल्या भावना बदलायला प्रोत्साहन द्यावं लागेल.

  2. २. लोकांच्या मनातून भेदभावाच्या वाईट आठवणी काढून टाकाव्या लागतील.

  3. ३. असे नेते निवडावे लागतील जे कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान लेखतील.

  4. ४. सर्व राष्ट्रांच्या लोकांमध्ये एकी निर्माण करावी लागेल.

पवित्र शास्त्रात अशाच एका सरकाराबद्दल सांगितलं आहे. त्याला ‘देवाचं राज्य’ असं म्हटलं आहे.—लूक ४:४३.

ते सरकार कायकाय करेल हे जाणून घ्या.

१. चांगलं शिक्षण देईल

“जगात राहणारे नीतिमत्ता” शिकतील.—यशया २६:९.

“नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्वकाळचे स्वासथ्य व निर्भयता होईल.”—यशया ३२:१७.

याचा काय अर्थ होतो? देवाचं राज्य लोकांना नीतीच्या गोष्टी शिकवेल. जेव्हा लोकांना योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय यातला फरक समजेल, तेव्हा इतरांबद्दलचे त्यांचे विचार बदलतील. आणि त्यांना याची जाणीव होईल, की आपण सर्व प्रकारच्या लोकांवर प्रेम केलं पाहिजे.

२. भावनिक जखमा भरून काढेल

देव “त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल; कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”—प्रकटीकरण २१:४.

याचा काय अर्थ होतो? देवाचं राज्य, अन्यायामुळे झालेलं सर्व दुःख काढून टाकेल. मग, ज्यांच्यावर पूर्वी अन्याय झाला होता त्यांच्या मनात द्वेषाची भावना उरणार नाही.

३. चांगलं नेतृत्व करणारा निवडेल

“तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करेल, पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करेल.”—यशया ११:३, ४.

याचा काय अर्थ होतो? देवाच्या राज्याचा राजा, येशू ख्रिस्त, कोणताही भेदभाव न करता न्यायाने राज्य करेल. तो कोणत्याही एका राष्ट्राला दुसऱ्‍या राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ समजणार नाही. आणि पृथ्वीवरचे सगळे लोक त्याचे नीतीनियम पाळतील याची तो खातरी करेल.

४. एकी निर्माण करेल

देवाचं राज्य सर्व लोकांना “एक मनाचे होऊन व एकमेकांवर सारखेच प्रेम [करायला], पूर्ण एकतेत राहून व एकच ध्येय मनात ठेवून” चालायला शिकवेल.—फिलिप्पैकर २:२.

याचा काय अर्थ होतो? देवाच्या राज्याच्या नागरिकांमध्ये फक्‍त वरवर दिसणारी एकता नसेल, तर त्यांच्यात खरं प्रेम असल्यामुळे ते “पूर्ण एकतेत” राहतील.

अशा प्रकारचं सरकार खरंच येईल का?

हो नक्की येईल! याचे अनेक पुरावे आहेत. ते जाणून घेण्यासाठी:

  • यहोवाच्या साक्षीदारांना भेटा. आणि देवाचं राज्य, पवित्र शास्त्रात दिलेली वचनं पूर्ण करेल याचे काय पुरावे आहेत, याबद्दल त्यांना विचारा.

  • jw.org/mr या वेबसाईटवर देवाचं राज्य काय आहे?  हा व्हिडिओ पाहा.

  • यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला उपस्थित राहा. तिथे तुम्हाला खरं प्रेम आणि एकता पाहायला मिळेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा