वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ७/८ पृ. ३२
  • लाखो लोक जाणार आहेत—तुमच्याबाबत काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लाखो लोक जाणार आहेत—तुमच्याबाबत काय?
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला चुकवावेसे वाटणार नाही असे!
    सावध राहा!—२०००
  • “ईश्‍वरी जीवनाचा मार्ग” १९९८ चे प्रांतीय अधिवेशन लवकरच!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • “देवाच्या वचनावर विश्‍वास” या प्रांतीय अधिवेशनास तुमचे स्वागत!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “आनंदी स्तुतीकर्ते” यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ७/८ पृ. ३२

लाखो लोक जाणार आहेत—तुमच्याबाबत काय?

दर वर्षी, जगभरातील ऐंशी लाखांपेक्षा अधिक लोक यहोवाच्या साक्षीदारांच्या वार्षिक प्रांतीय अधिवेशनांना उपस्थित राहतात. या वर्षी, “देवाचे भविष्यसूचक वचन” या शीर्षकाचे तीन दिवसीय प्रांतीय अधिवेशन भारतात २७ ठिकाणी होणार आहे. त्यापैकी एक बहुधा तुम्ही राहता तिथे जवळपास कोठेतरी असेल. तेव्हा, शुक्रवारच्या दिवशी सकाळी ९:३० वाजता संगीताने सुरू होणाऱ्‍या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे उत्तेजन आम्ही तुम्हाला देत आहोत.

सकाळच्या कार्यक्रमात, प्रथम एक स्वागतपर भाषण आणि त्यासोबतच “देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष द्या” हे मुख्य भाषण दिले जाईल. मग, दुपारी होणाऱ्‍या, “देवाचे वचन वाचण्याचा आनंद घ्या” या परिसंवादात बायबलचे वाचन लाभदायक तसेच आनंददायक कसे बनवले जाऊ शकते यावर व्यावहारिक सल्ले दिले जातील. “देवाच्या इच्छेविरुद्ध लढणाऱ्‍यांचा निभाव लागणार नाही” हे त्या दिवसाचे शेवटचे व्याख्यान असेल; त्यात, अलीकडील काळात देवाच्या राज्याची घोषणा करणाऱ्‍यांचा कशाप्रकारे विरोध झाला आहे याचा आढावा घेतला जाईल.

शनिवार सकाळच्या कार्यक्रमात बाप्तिस्म्याचे भाषण होईल; बाप्तिस्म्यासाठी पात्र असलेल्या सर्वांना बाप्तिस्मा घेण्याची संधी मिळेल. दुपारच्या कार्यक्रमात लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि पूर्व युरोपच्या विशिष्ट देशांत तसेच कझाकस्तान या अतिशय मोठ्या आशियाई देशात बायबलच्या सत्याला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दलचे उत्तेजनपर अहवाल सांगितले जातील. सदर भागाचे शीर्षक असेल: “यहोवाचे भवन ‘निवडक वस्तूंनी’ भरत आहे.” शनिवारच्या कार्यक्रमाचा समारोप दोन व्याख्यानांनी होईल; “सावध राहण्यास भविष्यसूचक वचने आपल्याला इशारा देतात,” आणि “शेवटल्या काळातील भविष्यसूचक वचन” अशी त्यांची शीर्षके आहेत. अखेरचे भाषण बायबलमधील दानीएलाच्या पुस्तकावर आधारित असून भविष्यवाणीकडे लक्ष देण्याची कारणे काय ते या भाषणात सांगितले जाईल.

रविवारी सकाळी, “नियुक्‍त समयासाठी भविष्यसूचक वचने” या तीन भाग असलेल्या तासाभराच्या परिसंवादात हबक्कूकच्या भविष्यवाणीची चर्चा केली जाईल. या लहान पुस्तकातून ख्रिश्‍चनांना आज किती उत्तेजन मिळू शकते हे या भागातून स्पष्ट होईल. त्यानंतर, बायबलमध्ये दिलेल्या याकोबाच्या आणि एसावाच्या वृत्तान्तावर आधारित प्राचीन पोशाखातले एक नाटक दाखवले जाईल; “आपल्या आध्यात्मिक वारशाची कदर करणे” हा विषय त्यात ठळकपणे मांडला जाईल. रविवार सकाळच्या कार्यक्रमाचा समारोप होईल तो, “आपला बहुमोल वारसा तुमच्यासाठी काय अर्थ राखून आहे?” या उत्तेजनपर भाषणाने. मग दुपारी, “भाकीत केल्याप्रमाणे—सर्व काही नवे करणे” हे जाहीर व्याख्यान ऐकण्याचा आनंद तुम्ही घ्याल.

तेव्हा, उपस्थित राहण्यासाठी आतापासूनच तयारी करा. अधिवेशनाचे कोणते स्थान तुम्हाला जवळ पडेल हे निश्‍चित करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहाशी संपर्क साधा अथवा या नियतकालिकाच्या प्रकाशकांना पत्र लिहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा