वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ७/८ पृ. ९-१०
  • सर्व प्रकारची विकलांगता नाहीशी होईल तेव्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्व प्रकारची विकलांगता नाहीशी होईल तेव्हा
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • विकलांगतेचा अंत कसा होणार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • अधू असतानाही चांगले फलदायी जीवन जगणे
    सावध राहा!—१९९९
  • उत्तम जीवनाचे अभिवचन दिले आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—२०००
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ७/८ पृ. ९-१०

सर्व प्रकारची विकलांगता नाहीशी होईल तेव्हा

दोन्ही हात आणि दोन्ही पाय लुळे पडलेल्या एका स्त्रीने एकदा असे म्हटले की, बहुतेक लोक फक्‍त “तात्पुरत्या काळासाठी सुदृढ” असतात. यात किती तथ्य आहे, कारण कालांतराने आपल्या सर्वांमध्ये शारीरिक त्रुटी उद्‌भवू लागतात! म्हणूनच, चष्मे, कॉन्टॅक्ट लेन्स, बचाळी, श्रवण यंत्रे, इलेक्ट्रॉनिक गतिकारक यंत्रे आणि गुडघ्याचे रोपण या सर्वांना बाजारात केवढी मागणी आहे. रोमकर ८:२२ म्हणते त्यानुसार, “सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.”

यास्तव, आज्ञाधारक मानवांना नीतिमान ‘नव्या पृथ्वीवर’ परिपूर्ण शारीरिक आरोग्य देण्याच्या देवाच्या अभिवचनाने आपल्या सर्वांना दिलासा मिळू शकतो. (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४) यशया ३५:५, ६ म्हणते: “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍याचे कान खुले होतील . . . लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.”

बायबल भाकीत करते की, या सद्य दुष्ट व्यवस्थीकरणाच्या नाशातून “मोठा लोकसमुदाय” बचावेल. (प्रकटीकरण ७:९, १४; स्तोत्र ३७:१०, ११, २९) त्या नाशानंतर लागलीच, गंभीर विकलांगता आणि शारीरिक समस्या असलेल्यांना आपले विकार तत्काळ बरे केले जाण्याचा अनुभव होईल! (यशया ३३:२४) देवाच्या नवीन पृथ्वीवर बरे करण्याचे जे काम घडेल त्याची एक पूर्व झलक म्हणून येशूने पृथ्वीवर असताना अशाचप्रकारे लोकांना बरे केले. (पडताळा मार्क ५:२५-२९; ७:३३-३५.) विकलांग लोक आपले कृत्रिम हातपाय, कुबड्या आणि व्हीलचेअर फेकून देतील तेव्हा केवढा अत्यानंद झालेला असेल आणि किती आनंदाश्रू ओघळतील याचे वर्णनही करता येणार नाही! सुदृढ शरीर प्राप्त झाल्यामुळे ते लोक पृथ्वीचे परादीसमध्ये रूपांतर करण्याची देवाने दिलेली नियुक्‍ती पार पाडण्यामध्ये हातभार लावण्यास तयार असतील.—लूक २३:४३.

परंतु, तोपर्यंत, विकलांग असलेल्या लोकांना संघर्ष करावा लागेल. कॅनडात असलेले नेल्सन हे विकलांग गृहस्थ म्हणतात: “मला स्वतःची कीव वाटू लागते तेव्हा मत्तय २४:१३ येथील येशूच्या शब्दांची मी आठवण करतो; तेथे म्हटले आहे: ‘जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.’” शारीरिक मर्यादा असतानाही विकलांग लोक ख्रिस्ती विश्‍वासात टिकण्याद्वारे सर्वात महत्त्वपूर्ण मार्गाने अर्थात, आध्यात्मिकरित्या, परिपूर्ण आणि सुदृढ असू शकतात.—याकोब १:३, ४.

यहोवाच्या साक्षीदारांनी लाखो लोकांना हा विश्‍वास स्वीकारण्यास मदत केली आहे. आधीच्या लेखात उल्लेख केलेले डेल हे विकलांग गृहस्थ असे म्हणतात: “माझ्यासारख्या शारीरिक समस्या फक्‍त तात्पुरत्या आहेत हे मी शिकलो तेव्हा मला किती आनंद झाला ते मी शब्दांत सांगू शकत नाही.” होय, या आशेने बळकटी प्राप्त झालेल्या डेल यांना—आणि त्यांच्यासारख्या इतर अनेकांना—खऱ्‍या अर्थाने अपंग म्हणता येणार नाही.

[१० पानांवरील चित्र]

येणाऱ्‍या नाशातून बचावणाऱ्‍या लोकांचे विकार चमत्कारिक पद्धतीने बरे केले जातील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा