वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ६/८ पृ. ३
  • “मी सात वर्षांची आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मी सात वर्षांची आहे”
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • मुलांच्या घामातून
    सावध राहा!—१९९९
  • त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले मेक्सिकोमध्ये
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • कौटुंबिक सौख्यानंदाचे एखादे रहस्य आहे का?
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • “हे यहोवा, माझ्या मुलीला विश्‍वासू ठेव!”
    सावध राहा!—१९९४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ६/८ पृ. ३

“मी सात वर्षांची आहे”

नमस्ते. माझं नाव अमेल्या आहे; मी कॅरिबियनमधल्या एका द्वीपावर राहते. मी सात वर्षांची आहे. काही दिवसांआधी माझ्या गरीब आईवडिलांनी मला शहरात राहणाऱ्‍या एका श्रीमंत कुटुंबाला देऊन टाकले.

आज मी सकाळी पाच वाजता उठले; तशी दररोज पाचलाच उठते. जवळच एक विहीर आहे, तिथून मी पाणी आणलं. भरलेला हंडा डोक्यावर ठेवून आणणं फार जड आहे पण मी कसंबसं आणलं—नाहीतर मला फार मार खावा लागला असता. मग मी नाश्‍ता बनवला आणि घरातल्या सर्वांना वाढून दिला. मला नाश्‍ता द्यायला जरा उशीर झाला म्हणून मालकांनी मला चामड्याच्या पट्ट्याने फटके दिले.

मग, मी मालकांच्या पाच वर्षांच्या मुलाला शाळेत सोडून आले. मग, येऊन स्वयंपाकात मदत केली आणि दुपारचे जेवण वाढले. स्वयंपाक झाल्यावर, बाजारहाट केला, लहानमोठी कामं केली, चूल पेटवली, अंगण झाडून काढलं, धुणं-भांडी उरकली आणि स्वयंपाकघर साफ केलं. मग आमच्या मालकिणीचे पायसुद्धा धुतले. आज ती कशावरून तरी रागावलेली होती म्हणून तिने मला थोबाडीत मारली. उद्या तिला बरं वाटावं.

मला उरलंसुरलेलं जेवण खायला दिलं—पण निदान कालच्या मक्क्याच्या जेवणापेक्षा तर ते बरं होतं. माझे कपडे फाटलेले आहेत, माझ्या पायात चपला नाहीत. माझ्या मालकांसाठी मी आणते त्या पाण्यातून मला कधीच आंघोळ करायला ते देत नाहीत. काल रात्री मी बाहेर झोपले होते; कधीकधी ते मला घराच्या आत जमिनीवर झोपायला देतात. हे पत्र मी स्वतः लिहू शकले नाही कारण ते लोक मला शाळेत जाऊ देत नाहीत.

नमस्ते. अमेल्या.

अमेल्या हे तिचे खरे नाव नसले, तरी तिची ही कहाणी खरी आहे.a अमेल्यासारखीच अशी कोट्यवधी मुले आहेत ज्यांना अशी कामे करावी लागतात—बहुतेकवेळा असह्‍य परिस्थितींमध्ये. आपल्या काळात बालमजुरी ही एक मोठी समस्या आहे. एक गुंतागुंतीचा प्रश्‍न; आणि त्यावरचे उपाय काही सहजासहजी मिळवण्यासारखे नाहीत. प्रचंड प्रमाणात चालणारी, समाजाची खच्ची करणारी आणि विघातक परिणामांची ही समस्या म्हणजे मुलांवर क्रूरता आणि मानवी प्रतिष्ठेचा अपमान आहे.

बालमजुरीचे प्रमाण किती व्यापक आहे? या समस्येच्या मुळाशी काय दडलेले आहे आणि ती कोणकोणत्या रूपांत आढळते? मानवी कुटुंबाचे सर्वात कोवळे आणि असहाय सदस्य असलेल्या लहान मुलांना पुन्हा कधीही कष्ट आणि अत्याचार सोसण्यास भाग पाडले जाणार नाही अशी वेळ कधी येईल का?

[तळटीपा]

a जगातील मुलांची दशा १९९७ (इंग्रजी) यात तिच्याविषयी अहवाल आला होता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा