वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ४/८ पृ. २१
  • पश्‍चिम आफ्रिकेचे अनोखे नाणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पश्‍चिम आफ्रिकेचे अनोखे नाणे
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • डाकमुद्राविद्या मनोवेधक छंद व मोठा व्यापार
    सावध राहा!—१९९५
  • त्यांना ‘मार्ग ठाऊक होता’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • मृत्यूनंतर जीवन—बायबल काय म्हणते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
सावध राहा!—१९९९
g99 ४/८ पृ. २१

पश्‍चिम आफ्रिकेचे अनोखे नाणे

सिएरा लिओनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

अशाप्रकारचे नाणे कधी तुमच्या पाहण्यात आले का? हे किसी नाणे आहे. फ्रीटाऊनमधील सिएरा लिओन राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात ही नाणी पाहायला मिळतात. नाण्यांची माहिती देणारी पत्रिका म्हणते: “हे नाणे अनेकांसाठी विलक्षण आणि नवीन असले तरी सिएरा लिओन आणि लायबेरियातील लोकांसाठी मात्र ते नवीन नाही. अगदी अलीकडे, म्हणजे १९४५ पर्यंत या दोन प्रांतात किसी नाण्याचा उपयोग केला जात होता. त्यावर शिराचे (गोलाकार कड) आणि पायाचे (टोकदार टोक) चिन्ह असल्यामुळे त्यात आत्मा आहे असे सर्वसामान्यपणे मानले जायचे. एखाद्या जमातीतील मान्यवर व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यास अशा नाण्यांचे तुकडे करून त्या व्यक्‍तीच्या कबरेवर ते रुतवायचे. या किसी नाण्याचा शेवटचा विनिमय दर, पश्‍चिम आफ्रिकेच्या एका शिलिंग मागे ५० किसी नाणी इतका होता.”

बॅझिल डेविडसन यांचे आफ्रिकेतील गुलामांचा व्यापार (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते, की फार पूर्वी “विशिष्ट लांबीचे लोखंडाचे तुकडे” देऊन गुलामांची खरेदी केली जायची. हे किसी नाणे तर नसावे? काही तज्ज्ञांचे तसे म्हणणे आहे; पण सगळ्यांचेच नाही. गुलामांची खरेदी करण्यासाठी या नाण्यांचा उपयोग केला जात होता की नव्हता याबाबत शंका असली तरी बायकांची खरेदी करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात होता हे मात्र नक्की.

आधी सांगितल्याप्रमाणे काही वेळा धार्मिक कारणांसाठी आणि विशेषतः, अमर आत्म्याच्या अविहित श्रद्धेच्या संदर्भात या नाण्याचा उपयोग केला जायचा. एखाद्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यास तिला तिच्या मूळ गावीच मूठमाती देणे योग्य समजले जायचे. पण, व्यक्‍तीचा मृत्यू तिच्या मूळ गावापासून दूर कुठेतरी झाला असल्यास मूळ गावी तिचे प्रेत आणणे कधीकधी शक्य नसायचे. अशा वेळी किसी नाण्यामार्फत मृत व्यक्‍तीचा आत्मा मूळ गावी पाठवला जायचा.

मृत व्यक्‍तीचा एक नातेवाईक, मृत्यू घडला त्या ठिकाणी जाऊन मांत्रिकाकडून हे नाणे विकत घ्यायचा; असे म्हटले जाते, की मांत्रिक मंत्रतंत्र करून मृत व्यक्‍तीचा आत्मा नाण्यामध्ये घालायचा. मग, नातेवाईक हा आत्मा (नाणे) घेऊन मृत व्यक्‍तीच्या मूळ गावी जाऊन वडिलोपार्जित कबरेत तो पुरायचा.

हे नाणे एका स्वच्छ कापडात गुंडाळून नातेवाईक घरची वाट धरायचा; घरी पोहंचेपर्यंत त्याला मौन धरणे आवश्‍यक होते. वाटेत तो कुणाशी जरी बोलला तरी नाण्यातला आत्मा त्यातून बाहेर पडेल आणि व्यक्‍तीचा मृत्यू घडला त्या ठिकाणी निघून जाईल असा समज होता. मग नातेवाईकाला पुन्हा माघारी जाऊन, आणखीन पैसे देऊन, मांत्रिकाकडून आत्मा पुनः प्राप्त करावा लागत असे!

वाटेत नातेवाईकाला बोलावेच लागले तर त्याला हातातले नाणे आधी काळजीपूर्वक खाली ठेवावे लागे; पण खाली म्हणजे जमिनीवर नव्हे. नाणे उचलल्यावर त्याला मौन पाळणे पुन्हा बंधनकारक व्हायचे.

हे किसी नाणे १३ ते १४ इंच लांब असल्यामुळे ते खिशात किंवा पर्समध्येही ठेवण्यासारखे नव्हते. पण, त्याचा जो आकार होता तो त्या काळासाठी सोयीस्कर होता असे म्हणता येईल कारण नाण्यांचे अगदी सहजासहजी गठ्ठे बांधून ते सोयीस्करपणे डोईवरून वाहता येत असे. श्रीमंत लोक आपल्या घरातल्या माळ्यांवर ते साठवून ठेवत असत. हवामान चांगले असले, की या नाण्यांवर साचलेले द्रव खालच्या खोलीत टप टप गळायचे. त्यामुळे जितका मोठा “पाऊस” तितकाच घरमालक पैसेवाला हे कोणीही समजून घ्यावे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा