वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ३/८ पृ. २३
  • गुलामगिरीच्या कुरूप गतइतिहासाला भेट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गुलामगिरीच्या कुरूप गतइतिहासाला भेट
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • “तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • स्वातंत्र्यासाठी ह्‍यूगेनॉट लोकांचे पलायन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
सावध राहा!—१९९९
g99 ३/८ पृ. २३

गुलामगिरीच्या कुरूप गतइतिहासाला भेट

सेनेगलच्या आफ्रिकन देशाच्या किनाऱ्‍यापासून काही अंतरावर डाकार शहराजवळ अल द गॉरे बेट वसलेले आहे. ३१२ वर्षांपर्यंत म्हणजे १८४८ पर्यंत हे बेट मानवी गुलामांच्या फोफावणाऱ्‍या व्यापाराचे केंद्रस्थान होते. नॅन्टेसच्या फ्रेंच बंदरातील पुराभिलेख दाखवतात की, १७६३ आणि १७७५ या सालांदरम्यान गॉरेतून नॅन्टेसच्या बंदराकरवी १,०३,००० पेक्षा अधिक गुलामांची खरेदीविक्री करण्यात आली.

आज दर दिवशी सुमारे २०० पर्यटक, मेझॉन डेझेस्लाव्ह अर्थात गुलाम गृह संग्रहालयाला भेट देतात. मार्गदर्शक जोझेफ न्डाए याने त्या असहाय बळींनी कोणकोणती अघोर कृत्ये सहन केली त्याविषयी सांगितले: “आमच्या पूर्वजांना नेले जात, त्यांची कुटुंबे वेगळी केली जात, जनावरांना देतात तसे त्यांच्या चमड्यावर डाग दिले जात.” साखळ्यांनी जखडलेली सबंध कुटुंबेची कुटुंबे आणली जात. “आई अमेरिकेला, बाप ब्राझीलला तर मुले ॲन्टेलीजला पाठवले जायचे,” असे त्याने सांगितले.

न्डाए पुढे म्हणाला, “त्यांचे वजन केल्यावर पुरुषांच्या वयानुसार आणि कुळानुसार त्यांची किंमत ठरवली जायची, काही जातींना कणखरपणासाठी किंवा प्रजोत्पादनासाठी मौल्यवान समजले जायचे. उदाहरणार्थ, योरुबा जातीतल्या पुरुषांना ‘वळू घोडा’ म्हणून किंमतीचे मानले जायचे.”

कमी वजनाच्या गुलामांची विक्री करण्याआधी त्यांना खाऊ घालून बदकांसारखे लठ्ठ केले जाई. गुलामाचे व्यापारी प्रत्येक रात्री आपली कामेच्छा तृप्त करण्यासाठी तरुण स्त्रियांना निवडायचे. बंडखोर गुलामांना गळ्याला फास लावण्याऐवजी त्यांना जास्त वेळ यातना व्हाव्यात म्हणून छातीला फास लावून मारले जायचे.

सन १९९२ मध्ये, पोप जॉन पॉल दुसरे यांनी गॉरेला भेट दिली. द न्यू यॉर्क टाईम्सने असे वृत्त दिले की, “त्यांनी गुलामाच्या व्यापारासाठी माफी मागितली आणि त्यात भाग घेतलेल्या सर्वांच्या वतीने, आफ्रिकन लोकांच्या गुलामगिरीत काही गैर नाही असे स्वीकारलेल्या कॅथोलिक मिशनऱ्‍यांच्या वतीनेही क्षमेची याचना केली.”

परंतु, जे काही घडले ते स्वीकारायला सर्वच जण तयार आहेत असे नाही. अडीच वर्षांआधी, नॅन्टेसचे अहवाल खोदून काढण्याआधी एका फ्रेंच जेसूटने असा दावा केला की, गॉरे येथे दर वर्षाला फक्‍त २०० ते ५०० गुलामांची विक्री करण्यात यायची. श्रीयुत न्डाए यांचे म्हणणे असे आहे की आतापर्यंत, “या अत्याचाराचा अघोरीपणा जगाने अजूनही कबूल केलेला नाही.”

[२३ पानांवरील चित्राचे श्रेय]

Gianni Dagli Orti/Corbis

Yann Arthus-Bertrand/Corbis

Reproduced from DESPOTISM—A Pictorial History of Tyranny

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा