वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ३/८ पृ. १०-११
  • मृत व्यक्‍तींचा सन्मान केला जावा का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मृत व्यक्‍तींचा सन्मान केला जावा का?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खोट्या समजुतीवर आधारित रितीरिवाज
  • समतोल दृष्टिकोन
  • स्तुतीसुमने वाहणे चुकीचे आहे का?
  • अंत्यविधीच्या प्रथांविषयी ख्रिस्ती दृष्टिकोन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • आदरणीय, मर्यादशील आणि देवाच्या दृष्टीने योग्य असलेले ख्रिस्ती अंत्यविधी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • अंत्यविधींबद्दल यहोवाच्या साक्षीदारांचा दृष्टिकोन काय आहे?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • देवाला असंतुष्ट करणाऱ्‍या प्रथांपासून सावध राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ३/८ पृ. १०-११

बायबलचा दृष्टिकोन

मृत व्यक्‍तींचा सन्मान केला जावा का?

“माणसाचा मृतदेह पाहिल्यावर मनात कुठेतरी दडलेल्या एका विशिष्ट भावनेमुळे, अधिकांश लोकांना त्याबद्दल एक प्रकारचा आदर वाटतो मेलेले जनावर पाहून कोणाला असा आदर वाटणार नाही.”—एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका.

कोणत्या न कोणत्या प्रकारे जवळजवळ सर्वच लोक मृत्यू पावलेल्या आपल्या प्रिय माणसांचा सन्मान करतात. कोणी वृत्तपत्रांतून मृत्यूसंबंधी सूचना देतात, तर इतरजण मृत व्यक्‍तींच्या स्मृतीप्रीत्यर्थ लेख लिहून त्यांत त्यांना स्तुतीसुमने वाहतात. काही देशांत धार्मिक किंवा पारंपरिक रीतीरिवाजांनुसार अंत्यविधी पार पाडण्यासाठी बराच खर्च केला जातो. मृत व्यक्‍तीच्या सन्मानात केले जाणारे कार्यक्रम बरेच दिवस, आठवडे, कधीकधी तर कित्येक महिने चालतात. मृत्यू पावलेल्या लोकप्रिय व्यक्‍तींच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळा, विमानतळे, रस्ते आणि शहरे यांना त्यांची नावे दिली जातात. पराक्रमी वीरपुरुषांच्या स्मरणार्थ स्मारके बांधली जातात आणि दर वर्षी त्यांच्या मृत्यूदिनी स्मरणोत्सव साजरा केला जातो.

पण आपण मृत व्यक्‍तींचा कितीही सन्मान केला तरीसुद्धा देवाचे वचन सांगते, की त्यांना कशाचीच जाणीव नसते. (ईयोब १४:१०, २१; स्तोत्र ४९:१७) मृत लोक हे केवळ त्यांना स्मरणाऱ्‍यांच्या मनांत जिवंत असतात. बायबलनुसार: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) अर्थात, बायबल एक आशा जरूर देते, ती अशी की भविष्यात मृतांचे पुनरुत्थान होईल. (योहान ५:२८, २९; ११:२५) पण तोपर्यंत, मृतजन अस्तित्वात नाहीत. ते अक्षरशः मातीत मिळालेले असतात.—उत्पत्ति ३:१९; ईयोब ३४:१५.

मृतांच्या स्थितीविषयी बायबलमध्ये इतके स्पष्ट सांगितलेले असताना, त्यांचा सन्मान करण्यात खरंच काही अर्थ आहे का? मृत आप्तेष्टांच्या अंत्यविधी आणि दफनविधी यांत पाळल्या जाणाऱ्‍या पारंपरिक रितीरिवाजांच्या बाबतीत ख्रिस्ती लोकांनी कोणती भूमिका घ्यावी?

खोट्या समजुतीवर आधारित रितीरिवाज

मृत्यूशी संबंधित असणाऱ्‍या बऱ्‍याच, नव्हे अधिकांश चालीरिती या गैर-बायबलीय धार्मिक शिकवणुकींमधून जन्माला आल्या आहेत. एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिकानुसार काही चालीरिती पाळण्यामागे अशी भावना असते की त्यामुळे “मृत व्यक्‍तीचे पिशाच्चांपासून संरक्षण होईल; तर इतर काही रितीरिवाज यासाठी पाळले गेले आहेत की त्यांमुळे जिवंतांवर मृत्यूचे सावट येऊ नये किंवा मृत व्यक्‍तीचा शाप त्यांना लागू नये.” पण मृत व्यक्‍ती कोणत्यातरी अदृश्‍य लोकांत मृत्यूनंतरही जिवंत राहते या खोट्या समजुतीवर आधारलेले कोणतेही रितीरिवाज बायबलमधील सत्याच्या अगदीच विरोधात आहेत.—उपदेशक ९:१०.

बरेच लोक मृत व्यक्‍तीची पूजाही करतात. कोणी बली अर्पण करतात तर कोणी मृत वाडवडिलांना प्रार्थना करतात. अशाप्रकारच्या प्रथा पाळणे म्हणजे उपासना नव्हे, तर हे केवळ मृत व्यक्‍तींसाठी आदर किंवा श्रद्धा व्यक्‍त करण्याचे प्रकार आहेत असे त्यांपैकी काहीजण कदाचित म्हणतील. तरीसुद्धा, मृत पूर्वजांना अशाप्रकारचे श्रद्धापूर्ण सन्मान व्यक्‍त करणे हे धार्मिक समजुतींवर आधारित असून बायबलच्या शिकवणुकींच्या विरोधात आहे. येशू ख्रिस्ताने म्हटले: “परमेश्‍वर तुझा देव ह्‍याला नमन कर व त्याचीच सेवा कर.”—लूक ४:८.

समतोल दृष्टिकोन

मृत लोकांना सन्मान आणि आदर व्यक्‍त करण्याचा खोट्या धार्मिक शिकवणुकींशी संबंध असेलच असे नाही. उदाहरणार्थ, बायबलच्या एका अहवालात हिज्किया राजाला त्याच्या मृत्यूनंतर सन्मानित करण्यात आल्याचे वर्णन आपल्याला आढळते. देवाच्या लोकांनी “त्यास दावीदवंशाच्या कबरस्तानातील उंचवट्यावर मूठमाती दिली. तो मृत्यु पावल्यावर सर्व यहूदी व यरुशलेमकर यांनी त्याच्यासंबंधाने आदर दर्शविला.” (२ इतिहास ३२:३३) आणखी एक उदाहरण येशूचेही आहे. बायबल सांगते की येशूच्या शिष्यांनी “येशूचे शरीर घेऊन यहूद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले.”—योहान १९:४०.

बायबलमध्ये आणखीही बरीच अशी उदाहरणे आहेत, ज्यांत मृत व्यक्‍तींच्या मृतदेहाच्या आणि अंत्यविधीच्या संबंधात काही खास क्रिया करण्यात आल्या होत्या. या चालीरितींना पूर्वजांची उपासना म्हणता येणार नाही; शिवाय, मृत व्यक्‍तींचा मृत्यूनंतरही जिवंत लोकांवर प्रभाव असतो या चुकीच्या समजुतीवर त्या आधारित नव्हत्या. तर या प्रसंगांत मृत व्यक्‍तीसाठी शोक करणारे केवळ आपल्या प्रिय व्यक्‍तीबद्दल मनस्वी आदर व्यक्‍त करीत होते. असा आदर व्यक्‍त करण्यास बायबल मनाई करीत नाही कारण ही मनुष्याची एक स्वाभाविक भावना आहे. अंत्यविधींच्या प्रसंगी असंतुलित भावनिक उद्रेकाला बायबल संमती देत नसले तरीसुद्धा आपल्या प्रिय व्यक्‍तीच्या मृत्युप्रसंगी ख्रिश्‍चनांनी अगदीच भावनाशून्य किंवा निर्विकार असावे असेही बायबल म्हणत नाही.

म्हणूनच कोणा प्रिय व्यक्‍तीच्या अंत्यविधी किंवा दफनविधीच्या प्रसंगी, यहोवाचे साक्षीदार मृत व्यक्‍तीला योग्य असा आदर आणि सन्मान दाखवतात. (उपदेशक ७:२) पुष्पहार, पुष्पगुच्छ न्यावेत की नाही, अंत्यविधीच्या क्रियांत आणि इतर स्थानिक रितीरिवाजांत सामील व्हावे की नाही, अशाप्रकारचे प्रश्‍न येतात तेव्हा ख्रिस्ती लोक बायबलच्या शिकवणुकींच्या विरोधात जाणाऱ्‍या चालीरिती टाळण्यासाठी फार विचारपूर्वक वैयक्‍तिक निर्णय घेतात. असे करताना चांगली निर्णयशक्‍ती आणि समतोल दृष्टिकोन आवश्‍यक आहे. दि एन्सायक्लोपिडीया ऑफ रिलिजन ॲण्ड एथिक्स यात दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, “कोणत्याही विधीची अर्थसूचकता आणि त्याचे महत्त्व कालपरत्वे बदलत असते; त्यामुळे कालांतराने त्या विधीचा जो अर्थ लावण्यात येतो तो त्याच्या मूळ अर्थापेक्षा वेगळा असू शकतो आणि आज त्याची जी अर्थसूचकता सांगितली जाते तिच्यावरून मूळ अर्थसूचकतेचा बोध होईलच असे नाही.”a

स्तुतीसुमने वाहणे चुकीचे आहे का?

मृत व्यक्‍तींविषयी प्रशंसोद्‌गार काढण्याच्या बाबतीतही समतोल दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे आहे. अंत्यविधीच्या कार्यक्रमात यहोवाचे साक्षीदार मृत व्यक्‍तीच्या शोकित कुटुंबियांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात. (२ करिंथकर १:३-५) एक औपचारिक कार्यक्रम घेतला जातो, ज्यात एखाद दोघे भाषण देऊ शकतात. पण एकापाठोपाठ एक अशा बऱ्‍याच जणांनी मृत व्यक्‍तीविषयी प्रशंसात्मक भाषणे देणे योग्य ठरणार नाही. उलट अशा प्रसंगी देवाच्या अद्‌भुत गुणांची, विशेषतः पुनरुत्थानाची आशा देऊन त्याने दाखवलेल्या दयाळूपणाची स्तुती करण्याची चांगली संधी असते.

अर्थात, अंत्यविधीच्या भाषणात मृत व्यक्‍तीच्या चांगल्या गुणांचा उल्लेख करणेच चुकीचे आहे असा याचा अर्थ होत नाही. (पडताळा २ शमुवेल १:१७-२७.) मृत्यूपर्यंत देवाला विश्‍वासू राहिलेली व्यक्‍ती इतरांना अनुकरण करता येईल असा एक उत्तम आदर्श ठेवून जाते. (इब्री लोकांस ६:१२) तेव्हा देवाच्या सेवकांनी विश्‍वासूपणे जगलेल्या जीवनाचा विचार केल्यामुळे फायदाच होतो. अंत्यविधीच्या दरम्यान अशाप्रकारचे चांगले विचार लोकांपुढे मांडल्यामुळे त्यांना सांत्वन मिळते आणि मृत व्यक्‍तीची आदराने आठवण केली जाते.

खरे ख्रिस्ती मृतांची उपासना किंवा पूजा करीत नाहीत. बायबलच्या सत्यांच्या विरोधात असणारे प्रचलित रितीरिवाज ते पाळत नाहीत. दुसरीकडे पाहता, मृत्यूनंतर शेवटी माणसाची मातीच होते, आणि त्यामुळे अंत्यविधीच्या सर्वच प्रथा अर्थहीन आणि अनावश्‍यक आहेत असा टोकाचा दृष्टिकोनही देवाचे सेवक स्वीकारत नाहीत. आपल्याला सोडून गेलेल्या माणसासाठी ते शोक करतात आणि त्याची आठवणही करतात. पण मृत लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही आणि त्यांना पुनरुत्थानाची आशा आहे ही बायबलमधील सत्ये माहीत असल्यामुळे देवाच्या लोकांचे दुःख, त्यांचा शोक सुसह्‍य होतो.

[तळटीपा]

a ऑक्टोबर १५, १९९१ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकात, पृष्ठ ३१ वर पुढील मार्गदर्शन केले आहे: “खऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीने हे विचारात घेतले पाहिजे, की आपण एखादी विशिष्ट प्रथा पाळल्यास, आपण गैरबायबलीय विश्‍वास किंवा चालीरितींनुसार चालत आहोत असे तर दुसऱ्‍यांना वाटणार नाही? ती विशिष्ट प्रथा कोणत्या कालखंडात आणि कोणत्या ठिकाणी सुरू झाली यावर हे बऱ्‍याच अंशी अवलंबून असू शकते. कदाचित हजारो वर्षांआधी किंवा कदाचित आजही दुसऱ्‍या एखाद्या देशात एखादी प्रथा (किंवा डिझाइन) खोट्या धर्माशी जोडली जात असेल. पण यावर संशोधन करण्यात वेळ घालवण्याऐवजी, स्वतःला प्रश्‍न विचारा: ‘आपण राहतो त्या ठिकाणी लोकांचे अमुक प्रथेविषयी सर्वसामान्य मत काय आहे?’—पडताळा १ करिंथकर १०:२५-२९.”

[१० पानांवरील चित्र]

स्वीडनचा सम्राट, तिसरा गुस्ताव याचे १६३२ साली निधन झाल्यानंतर निघालेली अंतयात्रा

[चित्राचे श्रेय]

From the book Bildersaal deutscher Geschichte

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा