जबाबदाऱ्यांविना हक्क?
“मानव समाजातल्या सर्व सदस्यांच्या स्वाभाविक प्रतिष्ठेला आणि समान आणि हिरवता न येण्याजोग्या हक्कांना मान्यता देणे हे जगाची स्वतंत्रता, न्याय आणि शांतीला आधारभूत आहे.” असे मानवी हक्कांची जागतिक घोषणा याच्या प्रस्तावनेत म्हटले आहे; डिसेंबर १९९८ मध्ये त्याला ५० वर्षे पूर्ण झाली. परंतु अलीकडे, सर्व खंडांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या २४ भूतपूर्व राष्ट्रपतींनी आणि पंतप्रधानांनी असे सुचवले आहे की, त्या घोषणेव्यतिरिक्त संयुक्त राष्ट्रांनी, मानवी जबाबदारींची जागतिक घोषणा प्रस्तुत करायला हवी. अशा एका धोरणाची गरज आहे असे अनेकांना का वाटते?
“हक्क आणि जबाबदाऱ्या यांचा अविभाज्य संबंध आहे. खेदाची गोष्ट म्हणजे, अर्ध्या शतकानंतर या वस्तुस्थितीचा लोकांना विसर पडला किंवा त्यांना ती अयोग्य वाटू लागली. पुष्कळजण हक्कांची मागणी करतात पण त्यांच्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची गरज त्यांना भासत नाही,” असे मानवी हक्कांच्या युरोपियन मंडळाचे सदस्य, प्राध्यापक झॉन-क्लॉड स्वाये म्हणतात. जबाबदाऱ्या टाळण्याचा हा परिणाम सर्वांना जाणवत आहे. “आज विशेषतः तरुणांना भविष्याविषयी काही स्वप्ने आहेत, त्यांचे काही प्रमाणित आदर्श आहेत हे स्पष्ट दिसून येत आहे ज्यांद्वारे ते लोभ, स्वार्थ, लोकांमध्ये स्नेहभावाचा अभाव यांमागच्या कारणांना समजून त्यांना नियंत्रणात आणू शकतात कारण जग त्यांच्या स्वाधीन होऊ लागले आहे. . . . जागतिक मूल्याची गरज असण्याविषयी वाढत चाललेल्या वादविषयावरून हेच स्पष्ट होते की कुठेतरी काहीतरी चुकत आहे,” असे पॅरिसचे दैनिक इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यून म्हणते. परिणामी, संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने “जागतिक नीतीमूल्ये प्रकल्प” असे नाव दिलेल्या या प्रकल्पाबद्दल राजकारणी लोक, तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानी चर्चा करून पोकळी भरून काढण्याचा आणि मानवी जबाबदाऱ्या काय आहेत हे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांना काही अडथळे आले आहेत.
कोणत्या मानवी हक्कांना सुरक्षित ठेवले जावे हे ओळखणे तसे सोपे असले, तरी कोणत्या मानवी जबाबदाऱ्या सबंध जगभरात स्वीकारल्या जाव्यात हे स्पष्ट करणे नेहमीच तितके सोपे नसते. तथापि, जबाबदारींची घोषणा यात प्रस्तुत केलेली काही मूल्ये येशूने सुमारे दोन हजार वर्षांआधी, काळाची मर्यादा नसलेल्या आणि सर्वांना लागू होणाऱ्या सुवर्ण नियमात आढळतात: “ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.”—मत्तय ७:१२.
मानवी हक्कांचे संरक्षण करणाऱ्या नियमांमागे बायबलची प्रेरणा असली, तरी ते व्यक्तिगत जबाबदारीच्या कल्पनेवर जोर देते. “चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे,” असे शिष्य याकोब म्हणाला. (याकोब ४:१७) येशूने जसे इतरांचे भले करण्याची संधी पाहिली तसेच खरे ख्रिस्ती देखील आपल्या साक्षीदारांचे भले करण्याचा प्रयत्न करतात. केवळ हक्क मिळाल्याचे त्यांना समाधान नसते, तर हक्कांसोबत जबाबदाऱ्याही येतात आणि आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या कार्यांसाठी देवाला जबाबदार आहोत हे त्यांना ठाऊक आहे.