वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १०/८ पृ. ४-५
  • आत्महत्या—तरुणांवर शाप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आत्महत्या—तरुणांवर शाप
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जागतिक समस्या
  • आत्महत्या—साथीचा अदृश्‍य रोग
    सावध राहा!—२०००
  • जीवनात आशा आणि प्रेम उरत नाही तेव्हा
    सावध राहा!—१९९८
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • आत्महत्या हे उत्तर आहे का?
    सावध राहा!—१९९४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 १०/८ पृ. ४-५

आत्महत्या—तरुणांवर शाप

आता तरुण लोक आत्महत्या करून स्वतःचा अंत करू लागलेत—जसे काय युद्ध, खून आणि अत्याचारांमध्ये कमीच तरुण मारले जात होते. मादक औषधांच्या आणि दारूच्या व्यसनापोटी कित्येक तरुणांची मने आणि शरीरे बरबाद होऊ लागलीत ज्यामुळे कित्येक जण दगावत आहेत. त्याचा OD झाला असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते, म्हणजेच, मुद्दामहून किंवा अपघाताने औषधाचा ओव्हरडोस होऊन एखादा वारला.

एप्रिल २८, १९९५ चे विकृती आणि मृत्यूप्रमाणाचे साप्ताहिक वृत्त (इंग्रजी) यात म्हटले होते की, “संयुक्‍त संस्थानांत १५ ते १९ वर्षांच्या वयोगटातल्या किशोरवयीनांच्या मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आत्महत्या आहे.” द डेकेड ऑफ द ब्रेन यात डॉ. जे. जे. मॅन लिहितात: “३०,००० हून अधिक [१९९५ मध्ये ३१,२८४] अमेरिकन युवक दरवर्षी आत्महत्या करतात. दुःखाची गोष्ट म्हणजे, सहसा युवकच बळी पडतात . . . त्या ३०,००० तरुणांपेक्षा दहा पटीने अधिक तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात पण मरत नाहीत. . . . आत्महत्या कोण करील हे ओळखणे म्हणजे डॉक्टरांसाठी आव्हानच आहे कारण मेजर डिप्रेशनमुळे (अति विषाद) कोणता रुग्ण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करील आणि कोणता रुग्ण करणार नाही हे ओळखणे जरा कठीणच आहे.”

यु.एस.ए., कनेटीकट येथील न्यू मिल्फोर्ड हॉस्पिटलच्या मनोदोषचिकित्सा विभागाचे प्रमुख, सायमन सोबो यांचे निरीक्षण असे होते: “गेल्या १३ वर्षांमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेली प्रकरणे मी जितकी पाहिली होती त्यापेक्षा जास्त प्रकरणे या वर्षी [१९९५] घडली आहेत.” संयुक्‍त संस्थानांमध्ये, दर वर्षी हजारो किशोरवयीन मुलेमुली आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला मदत मिळावी किंवा आपल्याकडे लक्ष द्यावे या उद्देशानेच खरे तर आत्महत्येचा प्रयत्न केला जातो. खूप उशीर होण्याआधी मदतीचा हात कोण पुढे करील बरे?

जागतिक समस्या

जगाच्या इतर भागांमधील स्थिती काही वेगळी नाही. इंडिया टुडे नुसार, भारतात १९९० साली सुमारे ३०,००० युवकांनी आत्महत्या केली. इस्राएल, कॅनडा, नेदरलंड, न्यूझीलंड, फिनलंड, फ्रान्स, स्पेन, स्वीत्झर्लंड आणि थायलंड या देशांमध्येही तरुण लोकांमधील आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. संयुक्‍त राष्ट्रे मुलांचा निधी (युनिसेफ) याच्या १९९६ च्या एका वृत्तानुसार युवकांच्या आत्महत्येचे सर्वात जास्त प्रमाण न्यूझीलंड, फिनलंड, रशिया, लिथुएनिया, लॅटव्हिया आणि स्लोव्हेनिया या देशांमध्ये आहे.

जगभरात, तरुणांच्या आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या देशांपैकी ऑस्ट्रेलिया सुद्धा एक देश आहे. या देशात, १९९५ साली तरुणांमधील २५ टक्के मृत्यू आणि तरुणींमधील १७ टक्के मृत्यू आत्महत्येने घडले होते, असे द कॅनबरा टाईम्स वृत्तपत्रातील बातमी आहे. आस्ट्रेलियन मुलांमधील “यशस्वी” आत्महत्येचे प्रमाण मुलींमधील प्रमाणापेक्षा पाच पटीने जास्त आहे. बहुतेक देशांमधील प्रमाण काही वेगळे नाही.

याचा अर्थ, मुलींपेक्षा मुले आत्महत्या करण्याचा अधिक प्रयत्न करतात का? तसे काही नाही. उपलब्ध माहितीनुसार, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या मुलांच्या किंवा मुलींच्या प्रमाणात फारसा काही फरक नाही असे दिसून येते. परंतु, “डब्ल्यूएचओच्या [जागतिक आरोग्य संघटना] अलीकडील आकडेवारीनुसार औद्योगिक राष्ट्रांमध्ये मुलींपेक्षा चार पटीने अधिक मुले आत्महत्या करतात.”—राष्ट्रांची प्रगती (इंग्रजी), युनिसेफद्वारे प्रकाशित.

पण या भयंकर आकडेवारीवरून सगळीच हकीगत कळत नाही. वैद्यकीय तज्ज्ञांच्या आणि विश्‍लेषकांच्या शास्त्रोक्‍त भाषेत व्यक्‍त केलेली तरुणांच्या आत्महत्येची आकडेवारी वाचताना काही वाटत नाही. पण हे आकडे शेवटी आकडेच असतात. या आकड्यांमागच्या एकेक शोकमग्न व गोंधळून गेलेल्या कुटुंबाचे दुःख, वेदना, निराशा सहसा कोणी पाहत नाही, कोणाला समजत नाही.

तरुणांच्या आत्महत्येसारख्या शोकांतिका टाळणे शक्य आहे का? यातील काही महत्त्वाची कारणे दृष्टीस आली आहेत आणि या दुःखद परिस्थितीला टाळायला ती मदतदायी ठरू शकतात.

[५ पानांवरील चौकट]

आत्महत्येमागची कारणे

आत्महत्या करायला लोक प्रवृत्त का होतात याची अनेक स्पष्टीकरणे आहेत. “एखाद्या व्यक्‍तीला एखादी समस्या फारच मोठी, न सुटणारी भासू लागली तर आत्महत्या घडू शकते. समाजाने वाळीत टाकल्यासारखे वाटणे, जवळच्या माणसाचा मृत्यू (विशेषतः वैवाहिक सोबत्याचा), लहानपणी विकोपाला गेलेले कौटुंबिक वितुष्ट, गंभीर शारीरिक व्याधी, म्हातारपण, बेकारी, आर्थिक समस्या आणि मादक औषधांचे व्यसन या काही भारावून टाकणाऱ्‍या समस्या असू शकतात.”—दि अमेरिकन मेडिकल असोसिएशन एन्सायक्लोपिडिया ऑफ मेडिसिन.

समाजशास्त्रज्ञ एमील द्यूरकेमनुसार, आत्महत्येचे चार मूलभूत प्रकार आहेत:

१. आत्महितवादी आत्महत्या—हा प्रकार, “समाजाशी व्यक्‍ती समरस झाली नाही तर घडतो असे मानले जाते. आत्महितवादी आत्महत्येला बळी पडणारे एकलकोंडे असल्यामुळे समाजाशी त्यांचे काहीच घेणेदेणे नसते किंवा समाजावर ते अवलंबून नसतात.” ते एकटे-एकटे राहतात.

२. परहितवादी आत्महत्या—“ही व्यक्‍ती एखाद्या गटात इतकी सामावून गेलेली असते की, गटासाठी ती काहीही अर्पण करायला तयार असते.” दुसऱ्‍या महायुद्धातील जपानी कामीकाझी विमान चालक आणि आपल्या शत्रूंचा नाश करताना स्वतःलाही ठार मारणारे धर्मवेडे ही परहितवादी आत्महत्येची उदाहरणे आहेत. याची दुसरी उदाहरणे म्हणजे, एखाद्या चळवळीकडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी आत्मदहन करून मरण पावलेले तरुण.

३. ॲनोमिक आत्महत्या—“ॲनोमिक आत्महत्या करणाऱ्‍या व्यक्‍तीला वाजवी पद्धतीने एखादा संकटप्रसंग हाताळता येत नाही आणि आत्महत्या हाच मार्ग त्याला दिसतो. त्या व्यक्‍तीच्या समाजासोबतच्या प्रस्थापित संबंधात अचानक आणि धक्केदायक बदल होतो तेव्हा [हे] घडते.”

४. निराशावादी आत्महत्या—“समाजाच्या अवाजवी नियंत्रणामुळे व्यक्‍तीच्या स्वातंत्र्यावर बंधन आल्यामुळे हे घडते” असे मानले जाते. या व्यक्‍तींना “आपल्या भविष्यात काहीच नाही असे वाटत असते.”—ॲलन एल. बर्मन आणि डेव्हिड ए. जोब्स यांचे एडोलेसेंट स्यूसाईड: असेसमेंट ॲण्ड इंटरव्हेन्शन.

[५ पानांवरील चित्र]

तरुणांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरणाऱ्‍या काही हानीकारक सवयी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा