भावी ऋतूमान
आपल्या वातावरणातील प्रदूषण ही मानवाने निर्माण केलेल्या पर्यावरण समस्यांपैकी केवळ एक समस्या आहे. इतर समस्या म्हणजे प्रचंड प्रमाणावर निर्वनीकरण, प्राण्यांच्या जातींचे उच्चाटन आणि नद्या, सरोवरे व सागरांचे प्रदूषण. या प्रत्येक समस्येचे जवळून परीक्षण केले आहे आणि त्यांच्यामध्ये सुधार घडवण्यासाठी प्रस्ताव मांडले आहेत. या समस्या वैश्विक असल्यामुळे वैश्विक उपाययोजना हव्या आहेत. समस्या आणि त्यांच्यावरील उपाययोजना याबद्दल सगळ्यांचे एकमत आहे. प्रत्येक वर्षी काही उपाययोजना राबवण्याची आव्हाने आपल्या कानावर पडतात. पण, प्रत्येक वर्षी येरे माझ्या मागल्याची गत होते. बहुधा धोरण बनवणारे, या समस्यांबद्दल खेद तर व्यक्त करतात आणि यासाठी काहीतरी केले पाहिजे अशी सहमतीही दर्शवतात पण, सोबतच “आम्ही करू शकणार नाही, सध्या तरी नाही” असे सुचवतात.
सन १९७० मध्ये, मूळ पृथ्वी दिनी न्यूयॉर्क शहरातले आंदोलनकर्ते एक मोठाला फलक घेऊन जात होते. त्या फलकावर पृथ्वी ग्रह, “वाचवा!!” असा आक्रोश करत असल्याचे चित्र होते. त्या विनंतीला कोणी प्रतिसाद देईल का? देवाचे वचन उत्तर देते: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” (स्तोत्र १४६:३, ४) स्तोत्रकर्ता पुढे निर्माणकर्त्याकडे लक्ष वेधतो, कारण मानवजातीसमोर असलेल्या सर्व गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याची शक्ती, बुद्धी आणि इच्छा केवळ त्याच्याजवळच आहे. आपल्याला असे वाचायला मिळते: “ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही निर्माण केले.”—स्तोत्र १४६:५, ६.
निर्माणकर्त्याचे प्रेमळ अभिवचन
पृथ्वी ही देवाकडील एक देणगी आहे. पृथ्वीचे ऋतूमान सुखकारक करणाऱ्या सर्व गुंतागुंतीच्या आणि अद्भुत तंत्रांसह त्याने तिची रचना व निर्मिती केली. (स्तोत्र ११५:१५, १६) बायबल म्हणते: “[देवाने] पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली, त्याने आपल्या बुद्धीने आकाश पसरिले. तो आपला शब्द उच्चारितो तो आकाशात पाण्याचा गडगडाट होतो; तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवितो; तो पावसासाठी विजा सिद्ध करितो आणि आपल्या भांडारातून वायु बाहेर काढितो.”—यिर्मया १०:१२, १३.
मानवजातीप्रती निर्माणकर्त्याच्या प्रीतीचे वर्णन प्रेषित पौलाने प्राचीन लुस्त्रातील लोकांना दिले. तो म्हणाला: “तथापि [देवाने] स्वतःस साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु तुम्हाला दिले, आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले.”—प्रेषितांची कृत्ये १४:१७.
या ग्रहाचे भविष्य मानवांच्या प्रयत्नांवर आणि करारांवर अवलंबून नाही. ऋतूमानावर ज्याचे नियंत्रण आहे त्याने आपल्या प्राचीन लोकांना त्याविषयी असे आश्वासन दिले: “योग्य काळी तुमच्याकरिता मी पाऊस पाडीन, जमीन आपला उपज देईल व मळ्यातील झाडे आपआपली फळे देतील.” (लेवीय २६:४) लवकरच, संबंध पृथ्वीवर लोक या सुखद परिस्थितींचा अनुभव घेतील. यानंतर आज्ञाधारक मानवांना नाशकारक तूफान, भरतीच्या लाटा, पूर, अनावृष्टी किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीची भीती वाटणार नाही.
लाटा, वारा, हवामान माणसाला आनंद देतील. तेव्हाही लोक हवामानाबद्दल बोलतील पण काही करणार नाहीत. देव जे भविष्य घडवून आणील त्यातील जीवन इतके उत्तम असेल की काही करण्याची गरजच पडणार नाही.