वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ६/८ पृ. ११
  • ॲमरँथ ॲझ्टेक लोकांचे खाद्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ॲमरँथ ॲझ्टेक लोकांचे खाद्य
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • मुके दगड बोलतात
    सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
  • दूधाच्या धारेतून चमचाभर दूध पावडर
    सावध राहा!—१९९९
  • परीक्षांमध्येही जिवाभावाने केलेली सेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९८
सावध राहा!—१९९८
g98 ६/८ पृ. ११

ॲमरँथ ॲझ्टेक लोकांचे खाद्य

मेक्सिकोतील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

आलिग्रिआ ही पोषक वडी, मेक्सिकन बाजारांमधील रंगीबेरंगी टपऱ्‍यांमध्ये अगदी सर्रास उपलब्ध असते—तिच्या स्पॅनिश नावाचे भाषांतर “हर्ष” किंवा “आनंद” असा आहे. ॲमरँथ या गर्द लाल फुले असलेल्या उष्णकटिबंधीय वनस्पतीच्या बियांची वडी बनवली जाते. ही वडी जंगली मध घालून बनवली जाते आणि कधी कधी त्यावर अक्रोड, पाईन नट आणि मनुके पेरले जातात. ॲमरँथच्या बिया भरड्या दळून किंवा त्याचे बारीक पीठ करून त्याचे पाव आणि केक सुद्धा तयार करतात.

ॲझ्टेक लोक ॲमरँथच्या पीठाचे टॉटिल्या आणि टॅमॅलेस करायचे. त्याशिवाय, त्यांच्या धार्मिक विधींमध्ये देखील ॲमरँथचा प्रामुख्याने वापर होत असे. मेक्सिको शहराच्या द न्यूझने असे म्हटले: “एका विधीत, हे ॲझ्टेक लोक कैदेत घेऊन [वधलेल्या] शत्रूच्या रक्‍तात ॲमरँथ रोटीचा तुकडा बुडवून खात असत.” त्यांच्या दुसऱ्‍या एका रिवाजात ते ॲमरँथ बियांच्या दळलेल्या पीठात मका आणि मध मिसळून लहान मूर्तींचा किंवा देवतांचा आकार देत असत. नंतर या मूर्ती, कम्युनियनच्या कॅथलिक विधीसारख्याच एका विधीत खाल्ल्या जात असत.

हे दोन्ही रिवाज स्पॅनिश सेनापती अर्नान कोर्तेझला सहन झाले नाहीत आणि म्हणून त्याने ॲमरँथच्या लागवडीवर आणि वापरावर बंदी घातली. त्याचा आदेश मोडणाऱ्‍याला देहान्ताची शिक्षा होई किंवा त्याचा हात तोडला जाई. अशारितीने, मेक्सिकोत त्या काळी सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे ते पीक अगदी नाहीसेच झाले.

परंतु, ॲमरँथ पीक कसेबसे वाचून मध्य अमेरिकेतून हिमालयांमध्ये आले. गेल्या शतकादरम्यान, चीन, तिबेट, नेपाळ, पाकिस्तान आणि भारताच्या पर्वतांमध्ये राहणाऱ्‍या जमातींमध्ये त्याला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

मेक्सिकोत, अलीकडे संशोधक ॲमरँथ दूध तयार करण्यासाठी बियातून प्रथिन काढण्याचा प्रयत्न करत आहेत; या पेयाचे पौष्टिक मूल्य गाईच्या दूधाच्या बरोबरीचेच आहे. काही अन्‍नपदार्थांमध्ये आणि पेयांमध्ये त्याचा उपयोग करून अंडी, दूध, मासे किंवा मटण घेण्याची ज्या लोकांची ऐपत नाही अशांकरता ते उपलब्ध करणे हे त्यांचे ध्येय आहे.

ॲमरँथचा असे खडतर गतकाळ असतानाही, या बहुउपयोगी, पौष्टिक अन्‍नाचा आजही अनेकजण आस्वाद घेतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा