वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ९/८ पृ. ३२
  • पत्रकार सावध राहाची! प्रशंसा करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पत्रकार सावध राहाची! प्रशंसा करतो
  • सावध राहा!—१९९८
सावध राहा!—१९९८
g98 ९/८ पृ. ३२

पत्रकार सावध राहाची! प्रशंसा करतो

अमेरिकेच्या कोलोरॅडो, पाओनीआमध्ये प्रकाशित होणाऱ्‍या, ऑक्टोबर १३, १९९७ च्या हाइ कँट्री न्यूझमध्ये पुढील शिफारस छापण्यात आली.

“एखादवेळी, ग्रीनपीस [एक आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था] घरोघरी जाण्याचा कंटाळा करेल, पण दुसरा एक गट दीर्घकालापासून करीत असणारा प्रचार अजूनही चालूच आहे, आणि बहुतेकदा पर्यावरणविषयक माहितींवर जोर देत आहे. हा गट, जवळजवळ ६० भाषांमध्ये [वास्तविक पाहता ८१] आपल्या साहित्यांच्या लाखो [प्रत्येक अंकाचे १९ दशलक्ष] प्रती वितरण करत आहे; यामध्ये झुलू, पिड्‌गिन व हिलिगेनोन या भाषांचा देखील समावेश आहे. जुलै ८ [१९९७] (इंग्रजी) या अंकाच्या पृष्ठावर विचारण्यात आले होते: ‘आपल्या प्राण्यांना कोण वाचवेल?,’ याच अंकात, मोठ्या प्रमाणात (तासाला तीन) लोप पावणारे प्राणी, ‘या ग्रहाचे जैविक आरोग्य,’ आणि पर्यावरणाचा होत असलेला विध्वंस, . . . या विषयांबद्दल माहिती देण्यात आली होती. ऑगस्ट २२, १९९७ च्या (इंग्रजी) अंकाने, ‘पाण्याची टंचाई: एक विश्‍वव्यापी समस्या’ आणि लोकसंख्या वाढीचे परिणाम, प्रदूषण आणि नद्यांसंबंधी होणारा आंतरराष्ट्रीय वादविवाद . . . यांवर चर्चा केली. यातील माहिती विज्ञान आधारित व विस्तृत असली, तरी बहुतेक लेखांचे सर्वसामान्य मत पर्यावरणविषयक माहिती मुळीच नाही. ते सांगतात की तुम्हालाही पृथ्वीच्या पुनर्वसनामध्ये सहभाग घ्यावयाचा असेल, ‘तर देव तुमच्याकडून काय अपेक्षितो हे बायबलच्या अभ्यासाद्वारे कृपया शिका.’

“हा गट दुसरा कोणताही नसून, खुद्द यहोवाच्या साक्षीदारांचा आहे, आणि सावध राहा! हे त्यांचे प्रकाशन आहे. ते अद्याप तुमच्या घरी आले नसल्यास Watchtower Bible and Tract Society of New York Inc., 25 Columbia Heights, Brooklyn, NY 11201-2483 येथे संपर्क साधा.”

आम्ही यापेक्षा आणखी काय सांगणार! यात इतकेच समाविष्ट केले पाहिजे, “सावध राहाच्या! पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर लिहा.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा