वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ९/८ पृ. ३१
  • वनस्पतींच्या जाती नामशेष होत आहेत का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वनस्पतींच्या जाती नामशेष होत आहेत का?
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या जनुकांद्वारे आपण पूर्वनियोजित केलेले आहोत काय?
    सावध राहा!—१९९६
सावध राहा!—१९९८
g98 ९/८ पृ. ३१

वनस्पतींच्या जाती नामशेष होत आहेत का?

चीनमध्ये, सन १९४९ मध्ये गव्हाच्या जवळजवळ १०,००० जातींचे उत्पादन होत असे. पण १९७० च्या दशकामध्ये केवळ १,००० गव्हाच्या जातींचे उत्पादन घेतले जात होते. अहवालात सांगितल्यानुसार अमेरिकेत १८०४ ते १९०४ या कालावधीदरम्यान ७.०९८ जातीचे सफरचंदाचे उत्पादन घेतले जात असे, त्यांपैकी ८६ टक्के जाती आता नामशेष झाल्या आहेत. त्याशिवाय, अन्‍न आणि कृषी यांसाठी जगात वनस्पती आनुवंशिक स्रोताच्या अवस्थेवरील अहवाल (इंग्रजी) यानुसार, “९५ टक्के कोबी, ९१ टक्के मका, ९४ टक्के वाटाणा आणि ८१ टक्के टोमॅटो यांच्या जाती नामशेष झाल्याचे दिसून येते.” अशाचप्रकारच्या आकडेवारीचा जगभरातून अहवाल देण्यात येतो. या जाती इतक्या अचानकपणे का नामशेष होत आहेत? काही लोक असे म्हणतात, की याचे कारण म्हणजे आधुनिक व्यावसायिक कृषीची व्याप्ती आणि त्यामुळे कमी प्रमाणात होणारी कौटुंबिक शेती नाहीशी झाली आहे; परिणामी धान्याच्या पारंपरिक, विविध जाती नामशेष झाल्या आहेत.

वनस्पतींच्या जाती नाहीशा झाल्यामुळे धान्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, आयर्लंडमध्ये सन १८४५-४९ या वर्षांदरम्यान आलेल्या दुष्काळाचा विचार करा. या काळात सुमारे ७,५०,००० लोक कुपोषणाचे बळी ठरले होते कारण त्यावेळी वनस्पतीवरील रोगामुळे बटाट्याच्या बहुतेक पिकाची नासाडी झाली होती. या दुःखद घटनेचे जैविक कारण काय होते? “आनुवंशिक समानता,” असे संयुक्‍त राष्ट्रसंघ आपल्या अहवालात म्हणते.

सन १९७० आणि १९८० या दशकादरम्यान वनस्पती आनुवंशिक स्रोताला एकत्र करता यावे आणि सुरक्षित ठेवता यावे म्हणून संपूर्ण जगभरात १,००० पेक्षा अधिक जनुक बँका तयार करण्यात आल्या होत्या. परंतु यांपैकी पुष्कळ जनुक बँका वेगाने निकृष्ट ठरल्या आणि काही केव्हाच बंद पडल्या आहेत. असा अहवाल दिला जातो, की पुष्कळ काळापर्यंत वनस्पतींच्या बिजांना सुरक्षित ठेवण्याच्या सुविधा केवळ ३० देशांमध्ये आहेत.

बायबल असे अभिवचन देते, की ख्रिस्ताच्या राज्याधीन यहोवा “सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्‍नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी . . . उत्कृष्ट मिष्टान्‍नाची” मेजवानी देईल. (यशया २५:६) “सर्व प्राण्यांना अन्‍न” देणाऱ्‍या आणि आनुवंशिक वैविध्याचा निर्माणकर्ता यहोवा याचे आपण किती आभारी आहोत कारण तो मनुष्याच्या भोजनासंबंधी सर्व गरजा भागवेल!—स्तोत्र १३६:२५; उत्पत्ति १:२९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा