हृदय शल्यचिकित्सक—सावध राहाचे! अभिनंदन करतात
जानेवारी ८, १९९७ सावध राहा! नियतकालिकात “हृदयविकाराचा झटका—यावरील उपाय?” या शीर्षकाखाली लेखांची एक श्रृंखलाच प्रकाशित झाली होती. जर्मनीचे अग्रेसर हृदयरोपण शल्यचिकित्सक आणि एका वक्षीय, हृदय आणि वाहिनीवंत शल्यचिकित्सा क्लिनिकचे प्रमुख, प्राध्यापक टोमास स्टेगमान यांनी सदर लेख वाचले आणि प्रकाशकांना पुढील पत्र लिहिले:
“हृदयरोग आणि विशेषतः हृदयविकाराचे झटके या विषयांवरील तुमचा अहवाल मी मोठ्या आस्थेने वाचला. या क्षेत्रातील एक तज्ज्ञ असल्यामुळे मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं, की हृदयविकाराच्या झटक्यांवरील तुमचे विवरण आणि सदर विषयावर तुम्ही दिलेली माहिती अत्यंत सुरेख होती; एका बाजूला हृदयरोग झालेल्या रुग्णासंबंधी तुम्ही सहानुभूती दाखवली तर दुसऱ्या बाजूला वैद्यकीय वास्तविकतांचा एक अचूक अहवाल तुम्ही सादर केला. ते विवरण, अभ्यासपूर्ण सारांश आणि विश्वसनीय माहिती पुरवते. याशिवाय, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे लवकर ओळखण्याला तुम्ही दिलेलं खास महत्त्वही मोलाचं होतं.
“वैद्यकीय विज्ञान आणि समाजाने एकजुटीनं प्रयत्न करूनसुद्धा पाश्चिमात्त्य देशांत आर्टिरिओस्क्लेरोसिस—आणि विशेषतः हृदयविकाराचा झटका—हे मृत्यूचं सर्वात सामान्य कारण आहे. कोरोनरी आर्टिरिओस्क्लेरोसिस (काठिण्य, आकुंचन, रक्तवाहिनीतील अडथळा) यातील गंभीर बदल रोजच्या रोज हाताळणारा आणि हृदय चिकित्सेच्या विविध तंत्रांच्या साहाय्यानं या रोगांवर उपचार करणारा एक हृदय शल्यचिकित्सक या नात्यानं लोकांसाठी—शिवाय, एखाद्या संभाव्य रुग्णासाठी देखील साधार आणि वस्तुनिष्ठ विवरण किती मोलाचं असतं याची जाणीव मला आहे.
“या विषयावर माहिती सादर केल्याबद्दल मी तुमचे हार्दिक अभिनंदन करू इच्छितो; तसेच होता होईल तितक्या अधिक लोकांना हा लेख उपलब्ध केला जाईल अशी आशाही मी बाळगतो.”
तुम्हालाही नियमितपणे सावध राहा! वाचायचे असल्यास अथवा तुमच्यासोबत कोणी मोफत गृह बायबल अभ्यास करावा अशी तुमची इच्छा असल्यास, कृपया Praharidurg Prakashan Society, Plot A/35, Nr Industrial Estate, Nangargaon, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर लिहा.