वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ५/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या जनुकांद्वारे आपण पूर्वनियोजित केलेले आहोत काय?
    सावध राहा!—१९९६
  • कोण दोषी आहे आपण की आपली जनुके?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ५/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

देशांतर “देशांतर करण्याची किंमत मोजा!” (जून ८, १९९७) हा लेख मला मनापासून आवडला. तुम्ही जे काही शब्दांत मांडलं, त्या बहुतेक गोष्टी मी अनुभवत आहे. आफ्रिकेतून युरोपमध्ये देशांतर केल्यामुळे वंश, भाषा, वर्ण आणि सर्वात मुख्य म्हणजे पूर्वग्रहाचे कटू अनुभव सतत माझ्या वाट्याला येतात. प्रचलित प्रसार माध्यमांनी लोकांच्या मनात आफ्रिकन लोकांविषयी आणि सर्वसामान्यपणे इतर विदेश्‍यांविषयी एक विकृत चित्र रेखाटले आहे.

पी. ए., जर्मनी

करमणूक “काय दशा आहे करमणुकीची?” या लेखासाठी आभारी आहे. (जून ८, १९९७) मी १२ वर्षांची मुलगी आहे; शाळेच्या सुट्ट्यांमध्ये मी सतत टीव्हीपुढे बसून असते. त्या लेखानं मला हे समजण्यास मदत केली, की याशिवाय इतरही पुष्कळ गोष्टी मी करू शकते.

जे. एल., इंग्लंड

सिंगापूर “सिंगापूर—आशियाचे कलंकित रत्न” (जुलै ८, १९९७) हा लेख या आधुनिक सरकारने शांतिप्रिय ख्रिश्‍चनांना ज्या धक्कादायक प्रकारची वागणूक दिली त्यास उघड करतो. तेथील अनेक ख्रिस्ती स्त्रीपुरुषांना मी व्यक्‍तिशः ओळखतो आणि ते सगळेच सदाचरणी, प्रेमळ लोक आहेत. छळ होत असतानाही ते यहोवाची सेवा करत राहतात ही गोष्ट मला उत्तेजन देते.

आय. ओ., मलेशिया

राग “रागावर नियंत्रण का ठेवावे?” (जुलै ८, १९९७) हा लेख म्हणतो, की शिमोन आणि लेवी यांना त्यांच्या वडिलांनी शाप दिला. पण, याकोबानं त्यांच्या रागाला शाप दिला असं कुठं तरी मी वाचल्याचं मला निश्‍चित माहीत आहे.

एस. एल., संयुक्‍त संस्थाने

आमच्या वाचकाचा हा मुद्दा बरोबर आहे. जून १५, १९६२ चे “टेहळणी बुरूज” (इंग्रजी) स्पष्टीकरण देते: “अखेरचा श्‍वास घेताना याकोबाने शिमोन आणि लेवी यांना नाही तर त्यांच्या रागाला शाप दिला, ‘कारण तो भयंकर असतो;’ त्याने त्यांच्या क्रोधाला शाप दिला, ‘कारण तो निष्ठुर वागतो.’”—संपादक.

आहार “तुमचा आहार—तो प्राणघातक ठरू शकतो का?” (जुलै ८, १९९७) या लेखानं माझा जीव वाचवला. तो लेख वाचल्यानंतर मी लगेचच माझ्या पत्नीला डॉक्टरांना बोलावून घेण्यास सांगितलं; कारण सदर लेखानं अगदी माझ्याच स्थितीचं वर्णन केलं होतं. मला तपासल्यानंतर दुसऱ्‍या दिवशी सकाळीच माझ्यावर शस्त्रक्रिया करण्याचं डॉक्टरांनी ठरवलं. त्यांनी त्वरित मला रुग्णालयात दाखल केलं कारण त्या रात्री मी वाचेल की नाही अशी शंका त्यांना होती. ट्रिपल बायपास झाल्यावर आता बरा होण्यासाठी मी घरी आलो आहे.

एफ. एस., संयुक्‍त संस्थाने

कधीकधी मला आणि माझ्या पतीला आमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणं फार कठीण जातं. आहाराच्या विषयावर मी इतरही लेख वाचले आहेत, पण या लेखानं मात्र अगदी सोप्या आणि व्यावहारिक तऱ्‍हेने सदर विषयाची चर्चा केली. मला खात्री आहे, की तुमच्या सूचना लागू करून आम्हाला उत्तम स्वास्थ्य राखता येईल.

व्ही. ए., ब्राझील

“तुमचा आहार—त्याची इतकी चिंता कशाला” या श्रृंखलेसाठी आभारी आहे. स्थूलपणाचे धोके काय असतात ते समजून घेण्यास त्या श्रृंखलेनं माझी मदत केली. त्यात दिलेल्या सर्व सूचना लागू करण्यास मी सुरवात केली आहे आणि यहोवाच्या मदतीनं मी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवू शकते हे मला माहीत आहे.

व्ही. वाय. डी., लायबेरिया

चतुर “नदीकाठचे रत्न” (जुलै ८, १९९७) या सर्वस्वी आनंददायक लेखासाठी मनस्वी आभारी आहे. माझे आवडते हवाई कलाकार अर्थात, चतुर याविषयीचा तो लेख होता. मी माझ्या बागेत काम करते तेव्हा एखादा चतुर बहुधा नेहमीच तिथं घिरट्या घालत असतो किंवा जवळपास विसावलेला असतो. भूदृश्‍य बनविणाऱ्‍या एका मनुष्यास मी याचं कारण विचारलं असता तो म्हणाला, की चतुरच्या आहारात डासांचा समावेश असतो आणि डास लोकांकडे आकर्षित होतात. तर आता मी या रंगीबेरंगी जीवाला एक प्रकारचा व्यक्‍तिगत अंगरक्षकच समजते!

जे. एफ., संयुक्‍त संस्थाने

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा